मंगळवार पेठ येथील विशाल कोळेकर व अपर्णा साळुंखे यांचे विवाह निमित्त पाण्याच्या टँकरवर बसून काढण्यात आलेल्या वरातीच्या बातम्या सोशल मीडियावर गुरुवार, दिनांक 7 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झाल्याच्या अनुषंगाने शुक्रवार, दि. 8 जुलै 2022 रोजी महानगरपालिका शहर पाणी पुरवठा विभागाकडील शाखा अभियंता यांनी प्रत्यक्ष नवरदेवाच्या घरी जाऊन पाणी वितरणाबाबत पाहणी केली. या पाहणीवेळी असे आढळून आले की, विशाल कोळेकर यांचे घर मुख्य जलवाहिनी पासून सुमारे 200 फूट अंतरावर असून त्यांच्या वैयक्तिक पाणी कनेक्शनची GI पाईप ही अत्यंत जुनी व जीर्ण झाली असल्याने त्यांना पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. सदर परिसरामध्ये त्यांचे लगतच्या इतर घरांमधील पाणी कनेक्शन तपासली असता या ठिकाणी पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे जागेवर आढळून आले आहे. विशाल कोळेकर यांचे वैयक्तिक पाणी कनेक्शन जुने व जीर्ण झाले असले बाबत व त्यांच्या पाणी कनेक्शनची जुनी GI पाईप बदलून नवीन PVC पाईप टाकण्याबाबत विशाल कोळेकर यांना सूचना करण्यात आल्या आहेत. हि जुनी पाईपलाईन त्यांनी बदलल्यास त्यांचा पाणी प्रश्न सुटणार असलेचे शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जल अभियंता यांनी कळविले आहे.