भारताच्या आरोग्य सेवा उद्योगक्षेत्रात १३० वर्षांचा इतिहास असलेली अग्रणी कंपनी अमृतांजन हेल्थकेअरला द इकॉनॉमिक टाईम्स बेस्ट हेल्थकेअर ब्रँड्स इव्हेंटच्या ६व्या सत्रात प्रतिष्ठेच्या सर्वोत्कृष्ट हेल्थकेअर ब्रँड्स सन्मानाने गौरविण्यात आले. गेल्या काही वर्षांमध्ये, ईटी बेस्ट हेल्थकेअर ब्रँड्सने उद्योगातील नवीनतम प्रगतींवर अर्थपूर्ण चर्चा करण्यासाठी आणि या क्षेत्रावर वैशिष्ट्यपूर्ण छाप पाडणाऱ्या आरोग्यसेवा ब्रँड्सची ओळख करून देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले आहे. काटेकोर आणि कठोर निवड प्रक्रियेनंतर अमृतांजन हेल्थकेअरची निवड १,००० ब्रँड्समधून करण्यात आली. आजवर खूप मर्यादित ओव्हर-द-काउंटर ब्रँडने निकष पूर्ण केलेले असल्यामुळे ही मान्यता, सन्मान विशेष प्रतिष्ठेचा ठरतो.
अमृतांजन हेल्थकेअर ही एक उद्देशाने चालणारी आणि नाविन्यपूर्ण संस्था असून विविध आरोग्य सेवा श्रेणींचा समावेश असलेले वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ सादर करते. या सर्वात अमृतांजन हा कंपनीचा महत्वाचा ब्रँड अग्रणी आहे. वेदना हारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपनीच्या ब्रॅंड मध्ये वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध नैसर्गिक घटकांचा वापर करून उच्च-गुणवत्तेची उत्पादने तयार करण्यात आली आहेत. आयुर्वेदात खोलवर रुजलेल्या विज्ञान आणि नैसर्गिकतेचे आयाम एकमेकांत मिसळण्यात कंपनीचे कौशल्य आहे. ब्रँड तर्फे वैज्ञानिक क्लिनिकल चाचण्यांद्वारे समर्थित कामगिरी-आधारित दाव्यांसह उत्कृष्ट वेदनाशामक उत्पादने सादर केली जातात. अमृतांजन हेल्थकेअरने डोके आणि अंगदुखीसाठी रोल-ऑन सारखे नाविन्यपूर्ण स्वरूप तसेच हायड्रोजेल पेन पॅच सारखे ग्राहकांसाठी सोयीस्कर उपाय सादर करण्यात अग्रेसर असण्याचा मान मिळवला आहे. कंपनी नैतिक मूल्याधारित व्यवसाय पद्धतींसाठी वचनबद्ध आहे आणि हानिकारक दुष्परिणाम करणाऱ्या आणि पर्यावरणाला धोका निर्माण करू शकणाऱ्या डायक्लोफेनाक सारख्या रसायनांच्या वापराविरुद्ध कठोर भूमिका घेते.
अमृतांजन हेल्थकेअरची उत्कृष्टतेप्रती असलेली बांधिलकी आणि जगभरातील ग्राहकांच्या विविध आरोग्यसेवा गरजा पूर्ण करण्यासाठीचे समर्पण हे कंपनीला मिळालेल्या ईटी बेस्ट हेल्थकेअर ब्रँड पुरस्कारामधून दिसून येते. विश्वासार्ह उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसह, अमृतांजन सतत नाविन्यपूर्णतेला आणि सर्वोत्कृष्ट काळजी सेवा सादर करण्यास प्राधान्य देत आहे.
अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. एस. संभू प्रसाद कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले, सर्वोत्कृष्ट हेल्थकेअर ब्रँड्सपैकी एक म्हणून सन्मान मिळाल्याबद्दल आम्हाला खूप कृतार्थ वाटत आहे. हे यश म्हणजे आमच्या मौल्यवान ग्राहकांच्या जीवनात लक्षणीय सुधारणा करणारे उपाय सादर करण्यात अमृतांजनच्या अतुलनीय आरोग्य सेवा देण्याच्या अथक समर्पणाची पावती आहे. आम्ही आमच्या समर्पित टीम, निष्ठावान ग्राहक आणि सहाय्यक भागीदारांचे मनापासून कौतुक करतो. त्यांनी आमच्या यशाच्या प्रवासात अविभाज्य भूमिका बजावली आहे. आमच्या विश्वासार्ह आणि उच्च-गुणवत्तेच्या आरोग्य सेवा उत्पादनांद्वारे लोकांच्या जीवनात खोलवर प्रभाव पाडण्याची आमची बांधिलकी आम्ही इथून पुढेही अविरतपणे पार पाडू.
वेदनाशामक उत्पादनांच्या जोडीलाच अमृतांजन हेल्थकेअर सर्दी आणि कंजेशन उपाय (रिलीफ कोल्ड रब, इनहेलर आणि कफ सिरप), शीतपेये (फ्रूट-बेस्ड रीहायड्रेशन ड्रिंक इलेक्ट्रो+ आणि फ्रूटनिक) आणि महिला आरोग्य उत्पादने (आरामदायी स्नग फिट सॅनिटरी नॅपकिन्स) यासारख्या इतर श्रेणींमध्येही उत्पादने सादर करते.