कोल्हापूर… राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या माध्यमातून समाजसेवेचा वारसा पुढे चालवू. यातून समाजातील वंचित उपेक्षित घटकांना न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या नूतन अध्यक्षा सौ अंजली अजित पाटील यांनी आज दिली. क्लबच्या पदग्रहण सोहळ्यातील सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
संपूर्ण देश-विदेशात शाखा असणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी आज सौ अंजली अजित पाटील यांची तर सचिव पदी सौ सुवर्णा संजय गांधी यांची एकमतांन निवड झाली या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आज रेसिडेन्सी क्लब मध्ये ज्येष्ठ सदस्य नंदा झाडबुके यांच्या हस्ते पार पडला. सौ अंजली पाटील या संस्थेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षं अधिक काळ सामाजिक सेवेत कार्यरत आहेत सन 2019 मध्ये कोल्हापुरात आलेल्या महापुरात त्यांनी पूरग्रस्तांना संघटनेच्या माध्यमातून भरीव मदत केली आहे त्यांच्या सर्व सामाजिक कार्याची आणि संघटनेतील ज्येष्ठत्व याचा विचार करून सौ अंजली पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली करण्यात आली आहे. निवडीनंतर क्लबच्या सर्व सदस्यांनी त्यांचं अभिनंदन आणि सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना सौ अंजली पाटील यांनी सर्व सदस्यांच्या माध्यमातून आणि राजश्री छत्रपती शाहूंच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण याही पुढे कार्यरत राहू अशी ग्वाही दिली. नूतन सचिव सुवर्णा संजय गांधी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं .यावेळी शैलजा पाटील, अर्चना चौगुले, सविता शर्मा यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या.