कोल्हापूर प्रतिनिधी:
इंडियन सायकियाट्रिक सोसायटी वेस्टर्न झोनल ब्रांच ची ५४ वी वार्षिक परिषद शुक्रवार दि. 13 ऑक्टो. ते 15 ऑक्टो. या कालावधीत व्हिक्टोरिया हॉल, सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे पार पडत आहे. ही परिषद कोल्हापूर सायकियाट्रिक सोसायटी आणि डी वाय पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर यांच्या सहकार्याने आयोजित केली जात आहे. परिषदेची सुरुवात शुक्रवार दि. १३ ऑक्टो. रोजी ताराराणी चौक ते गोल्ड जिम या परिसरामध्ये परिषदेसाठी उपस्थित सर्व मानसोपचार तज्ञ, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि काही स्वयंसेवकांच्या उपस्थितीत उपस्थितीत सकाळी 6:30 वाजता वॉकेथॉन ने होईल. मानसिक आरोग्यासाठी वाटचाल करत राहण्याचा संदेश या वॉकॅथॉन ने दिला जाईल.
शनिवार दि.१४ ऑक्टो. च्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे इंडियन सायकियाट्रिक सोसायटी चे उपाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत राठी, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश शर्मा असतील. इंडियन सायकियाट्रिक सोसायटी वेस्टर्न झोनल ब्रांच चे अध्यक्ष डॉ. उमेश नागापूरकर, भावी अध्यक्षा डॉ. नीना सावंत, सचिव डॉ. धनंजय अष्टुरकर, खजानिस डॉ. रवींद्र अग्रवाल, डॉ. मलय दवे, कोल्हापूर सायकियाट्रिक सोसायटीच्या वतीने डॉ. ए वाय कुलकर्णी, डॉ. सीमोन आवळे , डॉ. निखिल चौगुले, डॉ. देवव्रत हर्षे, डॉ. विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल.
या परिषदेसाठी महाराष्ट्र, गुजरात, गोवा या तिन्ही राज्यातून त्याचबरोबर देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून 400 पेक्षा जास्त मानसोपचार तज्ञ उपस्थिती दर्शविली आहे. या परिषदेची यावर्षीची थीम ‘psychiatry next gen 2.0’अशी आहे. या थीमनुसार मनोविकारांचे बदलते स्वरूप, नव्या उपचार पद्धती, मुलांमधले मानसिक आजार, अशा वेगवेगळ्या विषयांवर तज्ञ मानसोपचार तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या परिषदेसाठी प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आणि मानसिक स्वास्थ शास्त्रज्ञ डॉ. अमरेश श्रीवास्तव, यांच्यासोबत डॉ. श्री लक्ष्मी, डॉ. इरा दत्ता, डॉ. पल्लवी ढाकणे, डॉ. अविनाश डिसूजा, डॉ. भूषण शुक्ल, डॉ. अरमान पांडे, डॉ. तुषार भट, डॉ. ज्योती शेट्टी यांचं मार्गदर्शन लाभेल. या परिषदेदरम्यान सायन हॉस्पिटलचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. निलेश शहा आणि कोल्हापूरचे ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. पी.एम. चौगुले यांचा गौरव करण्यात येईल, त्यासोबतच त्यांचं व्याख्यान सुद्धा आयोजित करण्यात आलं जाईल. आत्महत्या आणि सध्याची कायदेपद्धती याबाबतच्या परिसंवादामध्ये डॉ अविनाश डिसूझा, डॉ भावेश लाकडावाला, डॉ केरसी चावडा आणि डॉ पराग शहा यांचं मार्गदर्शन लाभेल.
त्याचबरोबर जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून डॉ. सिमोन आवळे आणि डॉ. निखिल चौगुले यांनी मानसिक आरोग्य या विषयावर वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानांचं आयोजन केलं आहे. मनोविकार तज्ञ म्हणून शिक्षण घेणाऱ्या अनेक पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा या परिषदेसाठी सहभाग राहणार आहे. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी कोल्हापूर सायकियाट्रिक सोसायटीच्या वतीने डॉ.योगेश कुलकर्णी, डॉ. धनंजय पाटील, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. अश्विन शहा, डॉ. कविता शहा, डॉ. कावेरी चौगुले, डॉ. स्नेहा हर्षे यांचे आणि इतर सर्व सदस्यांचं सहकार्य लाभत आहे.