कोल्हापूर /प्रतिनिधी
राष्ट्रपती राजवटीमध्ये स्वायत्त संस्था असणाऱ्या आणि मराठी समाजातील मुलांसाठी काम करणाऱ्या सारथी संस्थेच्या कारभारावर निर्बंध आणणारा मंत्रालयातील सचिव ओ.पी.गुप्ता व उपसचिव रविंद्र गुरव यांनी पत्रक काढून काढलेला आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा.या प्रमुख मागणीसाठी आज मराठा महासंघ राष्ट्रीय समन्वयक वसंतराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज,अखिल भारतीय मराठा महासंघ आणि सारथी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दसरा चौकात निदर्शने करण्यात आलीतं.
मराठी कुणबी समाजाच्या आर्थिक ,सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी सारथी संस्थेची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र (बार्टी)च्या धर्तीवर छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी)या स्वायत्त संस्थेची कायद्यानुसार स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या कामकाजाचा आवाका मोठ्या प्रमाणात वाढत हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, राहण्याची सोय तसेच प्रशिक्षण कार्यशाळा याचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा मिळत होता.परंतु राष्ट्रपती राजवटीमध्ये मंत्रालयातील शसचिव ओ.पी.गुप्ता व उपसचिव रविंद्र गुरव यांनी पत्रक काढून या संस्थेच्या कारभारावर निर्बंध आणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.तरी हा आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज मराठा महासंघ राष्ट्रीय समन्वयक वसंतराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज,अखिल भारतीय मराठा महासंघ आणि सारथी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दसरा चौकात निदर्शने करण्यात आलीतं.यावेळी सारथी संस्थेवर निर्बंध आणणाऱ्या सचिवांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. दरम्यान सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने याकडे लक्ष देऊन मंत्रालय सचिवांनी काढलेल्या आदेशाचे पत्र तात्काळ रद्द करावे अन्यथा पुन्हा एकदा मराठा समाजातील युवकांच्या भावनांचा उद्रेक होईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलायं.
यावेळी मराठा महासंघ राष्ट्रीय समन्वयक वसंतराव मुळीक, अवधूत पाटील,संदीप देसाई,संजय काटकर, महादेव पाटील, प्रकाश पाटील, शैलेजा भोसले, संयोगिता देसाई, दिलीप सासणे, हिंदूराव गाडगीळ, मालती जाधव, अमित अडसुळे,चंद्रकांत चव्हाण, राजू सुर्यवंशी, प्रताप नाईक उपस्थित होते.