कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील गटाच्या केर्ले ता.करवीर येथील दशरथ माने यांची बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत धनगरी ढोलाच्या गजरात जल्लोष साजरा केला.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस,जनसुराज्य, स्वाभीमानी शेतकरी संघटना, शेकाप यासह इतर घटक पक्षांच्या महाआघाडी ची सत्ता आहे. आघाडी निर्णयानुसार ठरल्याप्रमाणे तत्कालीन सभापती बाबा लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदी आमदार सतेज पाटील गटाच्या दशरथ माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी करवीर प्रांत अधिकारी वैभव नावडकर होते. निवडीस सुचक सर्जेराव पाटील यांनी तर उत्तम धुमाळ यांनी अनुमोदन दिले. दरम्यान सर्व संचालकांना घेऊन शेती उत्पन्न बाजार समितीच्या विकासास प्रयत्नशील राहणार असल्याच नूतन सभापती दशरथ माने यांनी सांगितलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माने यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत धनगरी ढोलाच्या गजरात जल्लोष साजरा केला.
यावेळी शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सौ.संगिता पाटील,सचिव मोहन सालपे यांच्या सह सर्व संचालक उपस्थित होते.