कोल्हापूर /प्रतिनिधी
शिवाजी महाराजांवरुन काहीही झालं तरी तुम्ही वंशजांना विचारा म्हणता. तुमच्या पक्षाला शिवसेना हे नाव दिलं तेव्हा त्यांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? असा परखड सवाल खासदार संजय राऊत यांना नाव न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केलायं. खासदार संजय राऊतां. याद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. ‘आजके शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले पुण्यात पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केलं .
यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले, “राज्यात काही झालंतरी ब्लेम गेम होत असतो. ज्यांची लायकी नाही ती बिनपट्ट्याचं माणसं सध्या बोलत आहेत, अशा लोकांनी आपली लायकी ओळखून रहावं. शिवाजी महाराजांवरुन काहीही झालं तरी तुम्ही वंशजांना विचारा म्हणता. तुमच्या पक्षाला शिवसेना हे नाव दिलं तेव्हा त्यांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? शिवसेना आम्ही कधीही हरकत घेतली नाही. कारण शिवाजी महाराजांचे आम्ही जरी वंशज असलो तरी शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सर्व देशाला लाभला आहे. मी तर असं म्हणेन की तुम्ही सर्वजण शिवाजी महाराजांची एक्सेंडेट फॅमिली आहात. शिवसेना भवनावर शिवाजी महाराजांची प्रतिमा कुठे लावली आहे असा सवालही त्यांनी यावेळी शिवसेनेला केला?”
“महाशिवआघाडीतून ‘शिव’ हे नाव का काढलं? शिववडा हा काय प्रकार आहे? शिवाजी महाराजांचं नाव वड्याला देता, याची तुम्हाला लाज वाटत नाही का?” असे अनेक सवालही यावेळी उदयनराजे यांनी शिवसेनेला विचारले. तसेच “तुमच्या गलिच्छ राजकारणाचे खापर आमच्या माथ्यावर फोडू नका. तुम्हाला समज देतोय की पुन्हा जर असं केलंत तर त्याच्या परिणामाला तुम्हाला समोरं जावंच लागेल,” अशा शब्दांत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं.