कोल्हापूर /प्रतिनिधी
मायक्रोफायनान्स कंपनीचे महिलांसह बचतगटांना वाटप करण्यात आलेले कर्ज माफ करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले)च्या महिला अन्याय निवारण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.सदर मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळातर्फे जिल्हाप्रशासनाला देण्यात आले.मोर्चा टाऊन हाॅल पासून दसरा चौक,व्हिनस कार्नर मार्गी जिल्हाधिकारी कार्यालयावर येताच शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने करण्यात आलीतं. यावेळी मायक्रोफायनान्स कंपनीच्या वतीने महिलांसह बचत गटांना वाटप करण्यात आलेले कर्ज व त्याच्या वसुलीने त्रस्त झालेल्या महिला आणि कुटुंबींयानी आत्महत्या सारखा पर्याय अवलंबण्यापूर्वी शासनाने मायक्रोफायनान्स चे सर्व कर्ज माफ करावे, मायक्रोफायनान्स कंपनीच्या एजंटानी कर्ज परताव्यासाठीची आचार संहितेचे पालन करावे, कर्ज वसूलीसाठी दमदाटी, अरेरावी करणाऱ्या एजंटावर कारवाई करण्यात यावी,शासनाकडे कर्जमाफीची मागणी करण्यात आली असता मायक्रोफायनान्स कडून चालू असलेली सक्तीची कर्जवसुली त्वरित थांबवावी या सह विविध मागण्या करण्यात आल्या.दरम्यान महिलांच्या या न्याय मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देवून कर्जबाजारी महिलांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले)च्या महिला अन्याय निवारण संघटनेच्या वतीने देण्यात आला.
मोर्चात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले)च्या महिला अन्याय निवारण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सह कर्जबाजारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.