कोल्हापूर /प्रतिनिधी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 येऊ घातले आहे या धोरणाचा सूक्ष्मपणे आणि साकल्याने विचार केला असता यातील तरतुदी भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती तत्त्वज्ञान,ज्ञान,परंपरा आणि भाषा संविधानाने त्यातील कलम 14 ,15 (1)आणि 16 या अंतर्गत दिलेल्या समानतेचा आणि सामाजिक न्यायाचा हक्क आणि भेदभाव पासून मुक्तीचा मौलिक अधिकाराच्या विसंगत दिसून येते . या धोरणातून गरिब, बहुजन ‘, वंचित ,’ स्त्रिया , यांचे शिक्षण निकृष्ट दर्जाचे होणार असुन सरकारी शाळा, अनुदानित शाळा व महाविद्यालये बंद होण्याच्या स्थितीत ढकलली जाणार असल्यामुळे याविरोधात कोल्हापूर शहरामध्ये
बिंदू चौक येथे
नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रतीची होळी करण्यात आली.
याप्रसंगी शहरातील सर्व समविचारी संस्था संघटना शिक्षक संघटना पालक युवक संघटना विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या होत्या.
यावेळी आयफेटोचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे व समविचारी संघटना, संस्था आदींचा सहभाग होता.