मुंबई, १ फेब्रुवारी २०२६ :भारतीय अर्थव्यवस्था येत्या दोन-तीन वर्षांत जगातील तिसरी मोठी अर्थसत्ता बनू शकते आणि त्यासाठी अनुकूल संधी उपलब्ध आहेत. ब्रिटन, न्यूझिलंड, संयुक्त अरब अमिरात आणि युरोपीय महासंघासोबत झालेल्या व्यापारी करारांमुळे निर्यातवाढीस मोठा हातभार लागणार आहे. मात्र अनिवासी भारतीयांकडून भारतात गुंतवणूक वाढवणे तसेच देशातील रीटेल क्षेत्राला चालना देण्यासाठी ताज्या केंद्रीय अर्थसंकल्पात अधिक ठोस उपाय अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया दुबईस्थित अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्सचे अध्यक्ष व ‘मसालाकिंग’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. धनंजय दातार यांनी व्यक्त केली.
केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करताना डॉ. दातार म्हणाले की, “भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी ताकद देण्याची क्षमता रीटेल क्षेत्रात आहे. मात्र या क्षेत्रात व्यावसायिकांची संख्या कमी असून उच्च करांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करणे कठीण जाते. सरकारने करांचे ओझे कमी करून अनिवासी भारतीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतातील रीटेल क्षेत्रात थेट गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले पाहिजे.”
ते पुढे म्हणाले की, “प्रचंड लोकसंख्या आणि मोठी बाजारपेठ असूनही भारतात रीटेल क्षेत्रात पुरेशा प्रमाणात रोजगारनिर्मिती होत नाही. अनेक भारतीय परदेशात व्यवसाय करतात, पण देशात गुंतवणूक करण्यास पुढे येत नाहीत. एफडीआयला प्रोत्साहन आणि कर सवलती दिल्यास नव्या नोकऱ्या, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार, चांगले वेतन आणि स्पर्धेमुळे ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू उपलब्ध होतील.”
भारतातील रीटेल क्षेत्रात प्रचंड सुप्त सामर्थ्य असून आगामी काळ भारतासाठी अत्यंत आश्वासक असल्याचे नमूद करताना, काही वर्षांपूर्वी भारत हा ‘खरेदीदारांची बाजारपेठ’ होता, तर आज तो ‘विक्रेत्यांची बाजारपेठ’ बनला असल्याचेही डॉ. दातार यांनी स्पष्ट केले.
अनिवासी भारतीय व रीटेल क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी अर्थसंकल्पात ठोस उपाय अपेक्षित – मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
मा. श्री. हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते जियो-बिपीच्या इंजिन-क्लिनिंग ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी पेट्रोलचे अनावरण
, या पेट्रोलमुळे अतिरीक्त किंमत न देता प्रत्येक वर्षी 100 किमी जास्त ड्राईव्ह करता येणार
जे इंजिनच्या महत्त्वाच्या भागांमधून आधीच जमा झालेला मळ काढून टाकून शक्तिशाली इंजिन स्वच्छतेची कामगिरी करणाऱ्या क्रांतिकारी ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी पेट्रोलची प्रस्तुती
केवळ संरक्षणापासून ते ऍक्टिव्ह इंजिन स्वच्छ करण्यापर्यंतची क्षमता, ज्यामुळे भारतीय वाहनचालकांना इंजिनची कार्यक्षमता पूर्ववत करण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत होत
भारताच्या ड्रायव्हिंग पद्धतींवर आधारित, कोणताही अतिरिक्त खर्च न करता, वाहने प्रत्येक वर्षी 100 किमी* पर्यंत जास्त अंतर पार करू शकतात
पेट्रोलमधून ग्राहकांना काय मिळायला हवे याकरिता नवीन मानके तयार केले
: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, मा. श्री. हरदीप सिंग पुरी यांनी आज गोवा येथे होत असलेल्या इंडिया एनर्जी वीक 2026 मध्ये जिओ-बीपी (रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बीपी यांच्या संयुक्त उद्योगाचा रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड (RBML) चा कार्यरत ब्रँड,) येथे क्रांतीकारी ‘ऍक्टिव्ह’ टेक्नॉलॉजीचे पेट्रोलचे अनावरण केले. जिओ-बीपी येथील ‘ऍक्टिव्ह’ टेक्नॉलॉजीचे पेट्रोल इंजिनचे महत्त्वाचे भाग स्वच्छ करण्यासाठी, प्रभावी स्वच्छता क्षमता देण्यासाठी, इंजिनची कार्यक्षमता पूर्ववत करण्यासाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी, तसेच नियमित पेट्रोलच्या तुलनेत वाहनचालकांना दरवर्षी 100 किमी* पर्यंत जास्त अंतर पार करण्यास मदत करण्यासाठी याची निर्मीती करण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे, हे सर्व कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय उपलब्ध आहे.
ग्राहकांसाठी लाभ:
जिओ-बीपीचे ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी असलेले हे पेट्रोल तयार करतांना वाहनचालकांच्या दैनंदिन तसेच महत्त्वाच्या गरजा लक्षात घेता तयार करण्यात आले आहे: म्हणजेच प्रवास अधिक सुरळी व्हावा आणि प्रत्येक वेळी पेट्रोल भरल्यावर जास्त किलोमीटरची रेंज मिळावी, त्यासाठा अतिरीक्त खर्च लागू नये, तसेच इंजिनचे संरक्षण आणि स्वच्छता यांचा विचार करण्यात आला आहे.
वेगळेपणाची महत्त्वाची सूत्रे
इंजिनच्या नाजूक भागांवर चिकटलेला मळ हे पेट्रोल स्वच्छ करते, ज्यामुळे इंजिनची कार्यक्षमता सुधारते आणि ते अधिक सहजतेने चालते
स्वच्छता उत्तम दर्जाची करते आणि नियमितपणे वापरल्यास, इंजिन अधिक काळ स्वच्छ आणि अधिक विश्वासार्ह राहण्यास मदत करते
सामान्य भारतीय दुचाकी आणि चारचाकी वापरकर्त्यांसाठी, कोणताही अतिरिक्त खर्च न करता, दरवर्षी 100 किलोमीटर*पर्यंतचा अतिरिक्त ड्रायव्हिंगचा फायदा मिळू शकतो
·भारताच्या विकसित गतिशील इंधन मानकांशी सुसंगत
· देखभालीचा खर्च कमी होतो
बीपीच्या 100 वर्षांहून अधिक काळाच्या जागतिक इंधन संशोधन नेतृत्वावर आधारित, जिओ-बीपीमधील ‘ऍक्टिव्ह’ टेक्नॉलॉजीसह उच्च-कार्यक्षमतेच्या पेट्रोलचा विकास आणि प्रमाणीकरण, उद्योग-मानक चाचण्या आणि भारताच्या इंजिन परिस्थितीनुसार तयार केलेल्या विशेष पद्धती वापरून मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहे. वास्तव जगातील परिस्थितीत या पेट्रोलची स्वच्छता करण्याची परिणामकारकता सिद्ध करण्यासाठी, जिओ-बीपीने कोईम्बतूर येथील टेस्ट ट्रॅकवर 4,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी एका मोटरसायकलची चाचणी केली. हे प्रभावी प्रात्यक्षिक इंडिया एनर्जी वीकच्या प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आल
चिकट मळ काढून टाकल्यामुळे वाहनाच्या कार्यक्षमतेवर होणारा वाईट परिणाम टळतो, विश्वसनियता आणि सुरळीत कार्य वाढते, जिओ-बीपीच्या ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी असलेल्या पेट्रोलच्या वापराशी संबंधित महत्त्वाचे लाभ मिळतात. भारतीय दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या सरासरी वार्षिक मायलेजवर आधारित या पेट्रोलमुळे, प्रतीवर्षी 100 किमी* पेक्षा जास्त अधिक अंतर पार करण्याची इंजिनची क्षमता वाढते.
या क्रांतिकारी उत्पादनाबद्दल बोलताना, जिओ-बीपीचे अध्यक्ष सार्थक बेहुरिया म्हणाले: “भारतीय वाहनचालक साध्या, व्यावहारिक फायद्यांना महत्त्व देतात – जसे की, सुरळीत चालणारी इंजिने, अधिक विश्वसनीयता, कमी देखभाल खर्च आणि कमी इंधनात जास्त मायलेज. जिओ-बीपी ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, आम्ही असे पेट्रोल सादर करत आहोत जे गाडी चालवताना इंजिनला सक्रियपणे स्वच्छ करते, ज्यामुळे हानिकारक चिकट मळाचे होणारे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते. उच्च-कार्यक्षमतेच्या इंजिन स्वच्छतेची सुविधा ही एक मानक वैशिष्ट्य बनवून, इंधनाचे प्रगत टेक्नॉलॉजी सर्वांसाठी उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे, जेणेकरून संपूर्ण भारतातील ग्राहकांना दररोज याचा लाभ होईल.”
याव्यतिरिक्त, जिओ-बीपीचे CEO अक्षय वाधवा म्हणाले की: “आज गोव्यामध्ये इंडिया एनर्जी वीक 2026 मध्ये, आम्ही दोन मोटरसायकल आजूबाजूला प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत— त्यापैकी एक ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी पेट्रोलवर चालली आहे आणि दुसरी सामान्य पेट्रोलवर चालली आहे. प्रगत बोरोस्कोप इमेजिंगचा वापर करून, ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी पेट्रोलची स्वच्छता करण्याची क्षमता स्पष्टपणे दिसून येते. इंधन रसायनशास्त्रातील पाच वर्षांच्या अथक परिश्रमातून विकसित केलेले हे पेट्रोल केवळ इंधन कार्यक्षमताच वाढवत नाही, तर देखभालीचा खर्चही कमी करते. ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजीच्या पेट्रोलवर चालणारी मोटरसायकल कोईम्बतूर टेस्ट ट्रॅकवर 4,000 किमी चालवण्यात आली आणि या सुधारणांमुळे दरवर्षी 100 किमी* पर्यंत अधिक चालण्याचा लाभ होतो. हा विज्ञान आधारित अगदी स्पष्ट दिसणारा फरक आहे. आणि लॉयल्टी लाभ आणि नुकतेच सादर झालेले जिओ-बीपी मोबिलिटी+ क्रेडिट कार्ड यांसह, ग्राहकांना सातत्याने लाभ मिळतात.”
इडिया एनर्जी स्टँडवर, जिओ-बीपीने इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सोल्यूशन्स, सुधारित सुविधा, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF), घरपोच डिझेल डिलीव्हरी आणि सध्याच्या व भविष्यासाठी सज्ज असलेल्या विविध वायू इंधनांसह एक सर्वसमावेशक मालमत्ता आणि सेवा पोर्टफोलिओ देखील सादर केला. यामुळे कमी कार्बन उत्सर्जित करणारे मोबिलीटी सोल्युशन आणि भारतीय किरकोळ बाजारात ऊर्जेची प्रत्येक उदयोन्मुख रूपे आणताना, उद्योगाच्या मानकांपेक्षा प्रति युनिट ऊर्जेमागे सातत्याने अधिक मूल्य देण्याच्या जिओ-बीपीच्या स्पष्ट दृष्टिकोनाला बळकटी मिळते.
केटीएम कप सीझन 3 ची मुंबईत दमदार सुरुवात
कोल्हापूर –जगातील नंबर 1 प्रीमियम मोटरसायकल ब्रँड असलेल्या केटीएमने मुंबईत केटीएम कप सीझन 3 च्या पहिल्या राऊंडसह यशस्वी आणि उत्साहपूर्ण सुरुवात केली. ही स्पर्धा भारतातील सर्वात मोठी सिंगल-मेक रेसिंग चॅम्पियनशिप असून, या सीझनमधील ही पहिली राज्यस्तरीय फेरी ठरली.
या पहिल्या राऊंडमध्ये 120 हून अधिक तरुण आणि महत्त्वाकांक्षी रेसर्सनी सहभाग घेतला. ज्यात रायडर्सनी विविध वेळेनुसार आयोजित राउंड्स आणि स्किल टेस्टमध्ये आपली राईडिंग क्षमता दाखवली. या कार्यक्रमाला केटीएम प्रेमी आणि मोटरस्पोर्ट चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे परफॉर्मन्स रायडिंगसाठी मुंबई हे महत्त्वाचे केंद्र असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
दिवसभर चाललेल्या रोमांचक रेसनंतर सर्वोत्तम रायडर्सनी पुढील फेरीसाठी आपली जागा निश्चित केली. यामुळे ते केटीएम कप जिंकण्याच्या आणखी एक पाऊल जवळ पोहोचले.
मुंबई राउंडचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केटीएम स्टंट रायडर रोक बागोरोस यांनी थरारक स्टंट सादरीकरण केले. त्यांच्या जबरदस्त प्रदर्शनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आणि हा रेस वीकेंड सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.
या उत्साहात आणखी भर घालत, मोटो जीपीचे दिग्गज डॅनी पेड्रोसा क्वालिफायर आणि अंतिम फेरीदरम्यान रायडर्सशी संवाद साधणार आहेत. तसेच, सीझन 3 चे विजेते रायडर्सना ऑस्ट्रिया ग्रँड प्रिक्स पाहण्यासाठी सर्व खर्चासह सहल मिळणार असून, त्यात पिट एरियामध्ये प्रवेश आणि मॅटिगोफेन येथील केटीएम मोटोहॉल भेट यांचा समावेश असेल.
केटीएम कप भारतातील रेसिंगला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यात आयोजित स्पर्धा, प्रोफेशनल प्रशिक्षण आणि समुदायाशी संवाद यांचा समावेश आहे. येत्या काही आठवड्यांत 4 शहरांमध्ये राऊंड्स होणार असून, केटीएम कप सीझन 3 रायडर्स आणि चाहत्यांसाठी थरारक आणि रोमांचक अनुभव ठरणार आहे.
—
कोल्हापूर महापौर, उपमहापौर निवड ६ फेब्रुवारीला
*निवडीबाबत आज महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत होणार खलबते*
कोल्हापूर: कोल्हापूर महापालिका महापौर, उपमहापौर निवडीच्या तारखेची उत्सुकता संपली. पुणे विभागीय आयुक्तांनी कोल्हापूर महापौर व उपमहापौर निवड ६ फेब्रुवारी रोजी घेण्याचे आदेश ( शुक्रवारी दि. २३) काढले आहेत. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात ही निवड होणार आहे. महापौर व उपमहापौर या पदाच्या निवडणुकीचे कामकाज मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदी तसेच नियम २००५ व सुधारणा नियम २००६ व २०१० मधील सर्व तरतुदीनुसार पार पाडण्यात येणार आहेत.
दरम्यान महापौर, उपमहापौर निवडीसाठी उमेदवार निश्चित करणे, विषय समित्यांचे सभापती निवड यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या रविवारी महायुतींच्या नेत्यांची बैठक होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर, खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी यांच्या उपस्थित ही बैठक होणार आहे. या बैठकीत महापौर व उपमहापौर यांच्या नावावर खलबते होतील. त्यानंतर पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर महापालिकेत महायुतीने ४५ जागा मिळवून बहूमत प्राप्त केले आहे. महायुतीत भाजपला २६ जागा, शिवसेना शिंदे गटाला १५ जागा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४ जागा मिळाल्या आहेत. महायुतीतील जास्त जागाचा निकष विचारता घेता पहिला महापौर भाजपचा होणार हे निश्चित आहे. महापौर पदाचे आरक्षण हे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षीत झाले आहे. त्यामुळे भाजपकडे नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्यामध्ये विजयसिंह देसाई, प्रमोद देसाई, वैभव कुंभार यांच्या समावेश आहे. महापौर पदासाठी विजयसिंह देसाई, प्रमोद देसाई, वैभव कुंभार यासह विजयसिहं खाडे-पाटील, रुपाराणी निकम यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या संयुक्त बैठकीत या सहा नावावर चर्चा होणार आहे. महापौर निवड कोणाची करावा, याबाबत महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची मतेही जाणून घेण्यात येणार आहेत. जर भाजपाचा महापौर निवडावयाचा झाल्यास भाजपच्या तीन नगरसेवकांची नावे निवडली जातील. ही तीन नावे भाजपच्या प्रदेश समितीकडे पाठवली जातील, तिकडून महापौरांचे नाव निश्चित होईल, असे चित्र आहे.
दरम्यान शिवसेना शिंदे गटानेही महापौर पदावर दावा सांगितला आहे. तशी अपेक्षा आ. राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे. महापौर पदासाठी शिवसेनेकडून ओबीसी प्रवर्गाचा दाखला असलेले अजय इंगवले, आश्किन आजरेकर, अभिजित खतकर यांची नावे चर्चेत आहेत. पण जास्त जागांचा निकष विचारात घेता यावेळी प्रथम महापौर हा भाजपचा होईल, असे चित्र आहे. दरम्यान उद्या होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत महापौर व उपमहापौर यांच्या नावावर चर्चा होणार आहे. तसेच विषय समित्यांमध्ये स्थायी समिती, परिवहन समिती, शिक्षण समिती, महिला व बाल कल्याण समिती, गट नेता, सभागृह नेता या पदाच्याही निवडी होणार आहेत.
महापौर व उपमहापौर पदाची खांडळी होणार का
जिल्ह्यातील इचलकरंजी महापालिकेत पाच वर्षात ६ नगरसेवकांना महापौर होण्याची संधी देण्याची शक्यता आहे, त्यामुळे इचलकरंजी ८ ते ९ महिन्याचा महापौर होईल, असे चित्र आहे. त्यामुळे इचलकरंजी जर महापौर पदाची खांडोळी केली जाणार असेल तर कोल्हापूर महापालिकेत का नाही, असा प्रश्न आता नेते, कार्यकर्ते यांच्यातून विचारला जाऊ लागला आहे. यामुळे कोल्हापूरचा महापौर व सव्वा वर्षाचा होईल, अशी चर्चा आहे. महापौर पदासाठी जर सव्वा वर्षाचा कालावधी ठरला तर कोल्हापूरात पाच वर्षात चौघांना महापौर व उपमहापौर होण्याची संधी मिळू शकते. तसेच इचलकरंजी प्रमाणे जर सहा महापौर करण्याचा निर्णय झाला तर आठ ते नऊ महिन्याचा महापौर होऊ शकतो. पण हा सर्व निर्णय उद्या रविवारी होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत बरीच चर्चा होऊ शकतो. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीकडे शहरावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
स्कोडा ऑटोने भारतात नवीन कुशाक सादर केली
कोल्हापूर, २२ जानेवारी २०२६: स्कोडा ऑटो इंडियाने भारतात अपडेटेड नवीन कुशाक एसयूव्ही सादर केली आहे. इंडिया 2.0 धोरणांतर्गत ही कंपनीची महत्त्वाची कार असून, युरोपियन तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि आधुनिक फीचर्स भारतीय ग्राहकांसाठी अधिक सुलभ करण्यात आले आहेत.
नवीन कुशाकमध्ये ८-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, रेअर सीट मसाज फंक्शन, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड इलेक्ट्रिक सीट्स आणि २५ हून अधिक स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. डिझाइनमध्ये नवीन फ्रंट ग्रिल, एलईडी हेडलाइट्स, कनेक्टेड टेललाइट्स आणि तीन नवीन रंगांचा समावेश आहे.
गाडीत १०.१-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो व ॲपल कारप्ले, तसेच गूगल-समर्थित एआय कंपॅनियन देण्यात आला आहे.
नवीन कुशाकसाठी ₹१५,००० मध्ये प्री-बुकिंग सुरू असून डिलिव्हरी मार्च २०२६ च्या अखेरीस सुरू होणार आहे.
इन्सुलिन उपचारांच्या भावनिक परिणामांवर मात करणे: भारतातील मधुमेहाच्या व्यवस्थापनातील अडथळे दूर करण्यासाठी तज्ञांनी नाविन्यपूर्ण जनजागृतीचे आवाहन केले आहे
शिक्षण देत, सक्षमीकरण करत आणि गैरसमज दूर करत मधुमेह उपचारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सिप्लाने #InhaleTheChange मोहीम सुरू केली आहे.
[कोल्हापूर, बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांच्या साथीने सिप्लाने #InhaleTheChange नावाचा देशव्यापी जनजागृती उपक्रम सुरू केला असून, इन्सुलिन थेरपीशी संबंधित भावनिक आणि वर्तणुकीतील अडथळ्यांवर मात करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. भारतासमोरील सर्वात गंभीर सार्वजनिक आरोग्य आव्हानांमध्ये मधुमेहाची गणना केली जाते, मधुमेहामुळे दीर्घकालीन आजारपण आणि लक्षणीय जीवितहानी याचा सामना करावा लागतो. 10 कोटींहून अधिक भारतीय या आजाराने ग्रस्त असल्याने देशाला अनेकदा ‘जगाची मधुमेह राजधानी’ म्हटले जाते, अशा परिस्थितीत, केवळ 27.5% लोकांना त्यांच्या स्थितीची जाणीव आहे आणि फक्त 7% लोकांची रक्तातील साखर नियंत्रणात आहे, ही बाब खरोखरच चिंताजनक आहे [1], [2] या आकड्यांमुळे वैद्यकीय आव्हानांचा खडतर मार्ग तर दिसून येतोच पण त्याचसोबत भीती, सामाजिक लांच्छन किंवा आपल्या स्थितीबद्दल आणि उपलब्ध पर्यायांबद्दलच्या माहितीच्या अभावामुळे उपचारांमध्ये चालढकल करणाऱ्या किंवा उपचार बंद करणाऱ्या रुग्णांच्या दैनंदिन संघर्षांवरही प्रकाश टाकतात.
या वास्तविक जीवनातील अडथळ्यांना सामोरे जाण्याची गरज अधोरेखित करताना, डॉ. निकिता ऋषी दोशी, एंडोक्राइनोलॉजिस्ट, म्हणाले:
सोपे आणि अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देताना, या चिंता ऐकून घेण्यासाठी आणि त्यांचे सुलभ निराकरण करण्यासाठी जागा निर्माण करणे आवश्यक आहे..4 #InhaleTheChange सारखे रुग्ण-केंद्रित शिक्षणाला क्लिनिकल माहितीसोबत जोडणारे जनजागृती उपक्रम उपचारांबद्दलची भीती कमी करण्यात आणि उपचारांवर विश्वास निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. खरं तर, विशेषतः मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजारांमध्ये उपचारांचे पर्याय सोपे करून सांगणारा आणि ते अधिक सुलभ वाटतील असे करणारा कोणताही प्रयत्न स्वागतार्ह आहे.”
टाइप 1 मधुमेह असलेल्या लोकांसाठी आणि टाइप 2 मधुमेह असलेल्या अनेकांसाठीच्या मधुमेह व्यवस्थापनामध्ये इन्सुलिन हा सर्वात प्रभावी उपचारांपैकी एक आहे. असे असूनही, उपचारांमध्ये सातत्य राखणे आव्हानात्मक असू शकते, आणि याचे कारण जागरूकता किंवा हेतूचा अभाव नसून, दैनंदिन व्यवस्थापनामुळे येणारा भावनिक आणि व्यावहारिक ताण हे खरे कारण आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, भीती, तणाव, विसरभोळेपणा, गोंधळ आणि दैनंदिन दिनचर्या किंवा गोपनीयतेशी संबंधित अडचणींमुळे अनेकदा औषधांचे डोस चुकतात किंवा उशिरा घेतले जातात. [3] , [4] ह्या अडथळ्यांमुळे काळजीच्या दृष्टिकोनाची गरज अधोरेखित होते, हा दृष्टिकोन केवळ क्लिनिकल परिणामांपुरते मर्यादित न राहता रुग्णाचा अनुभव, स्वीकारार्हता आणि जीवनाची गुणवत्ता याचाही विचार करतो. #InhaleTheChange च्या माध्यमातून, सिप्ला या आव्हानांकडे लक्ष वेधण्याचा आणि रुग्णांच्या निवडीला व आत्मविश्वासाला पाठिंबा देणाऱ्या, माहितीपूर्ण व लांछनमुक्त संवाद साधण्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे.
मराठी झी ५ च्या वतीने आगामी ओरिजनल सिरीज देवखेळचा ट्रेलर प्रसिद्ध – पौराणिक कथा, गुन्हा आणि न्यायची सरमिसळ
चंद्रकांत लता गायकवाड दिग्दर्शित आणि निखिल पालांडे तसेच गौरव रेळेकर लिखित, सिने मास्टर्स प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित, कोकणी लोककथेत रुजलेला हा चित्तवेधक मानसशास्त्रीय गुन्हेगारी थरारपट 30 जानेवारी रोजी झी ५ वर प्रदर्शित होणार ~
21 जानेवारी 2026 : मराठी झी ५ ने आज त्याच्या आगामी मराठी ओरिजनल सिरीज देवखेळ चा ट्रेलर प्रदर्शित केला. कोकणातील फारशा ऐकिवात नसलेल्या लोककथांपासून प्रेरित, देवखेळ हा एक गहन मानसशास्त्रीय थरारपट आहे. जो शिमगा (होळी) सणाच्या भीतीदायक पार्श्वभूमीवर परंपरा, अंधश्रद्धा आणि गुन्हेगारी यांची सरमिसळ करतो. ही सिरीज दिनांक 30 जानेवारीपासून खास झी ५ वर स्ट्रीम होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील देवताली किनारपट्टीवरील गावावर आधारित, देवखेळ एका थरारक रहस्यावर आधारित आहे- दरवर्षी होळी पौर्णिमेच्या रात्री, एखाद्याचा मृत्यू होतो. हे मृत्यू न्यायाचे प्रतीक म्हणून स्थानिक पातळीवर पूजल्या जाणाऱ्या शंकासुर या पौराणिक लोककथा व्यक्तिरेखेनेने दिलेल्या दैवी शिक्षेची कृत्ये आहेत, असा गावकऱ्यांचा विश्वास आहे. ट्रेलरमध्ये अशा जगाची झलक दाखवण्यात आली आहे, जिथे श्रद्धा तर्कशक्तीवर मात करते. भीती ही शांततेला अधोरेखित करते आणि सत्य विधीत दडलेले असते. जेव्हा इन्स्पेक्टर विश्वास सरंजामे गावात येतो, तेव्हा तो अंधविश्वासाला स्पष्टीकरण म्हणून स्वीकारण्यास नकार देतो. ही काळजीपूर्वक लपवून केलेली हत्या असल्याचे त्याचे मत असते. त्याचा तपास सुरू करतो. या मालिकेत इन्स्पेक्टर विश्वास सरंजामेच्या भूमिकेत अंकुश चौधरी असून प्राजक्ता माळी, यतीन कार्येकर, अरुण नलावडे, वीणा जामकर आणि मंगेश देसाई यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
ट्रेलर लिंक –
दिग्दर्शक चंद्रकांत लता गायकवाड पुढे म्हणाले, “देवखेळचा जन्म शंकासुर लोककथा परंपरेबद्दलच्या आकर्षणातून झाला – एक विश्वास प्रणाली जिथे न्यायाकडे संस्थात्मक नाही तर दैवी म्हणून पाहिले जाते. आघात, श्रद्धा आणि भीती ह्यामुळे मानवी मनाचे रुपांतर मिथकात कसे होऊ शकते, हा शोध ही सिरीज घेते. ही केवळ एक गुन्हेगारी कथा नाही, तर एक भावनिक आणि मानसिक प्रवास आहे. मराठी झी ५ ने ही कथा प्रामाणिकपणे आणि निर्भयपणे सांगण्यासाठी परिपूर्ण व्यासपीठ उपलब्ध केले. प्रेक्षकांनी ती अनुभवावी यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
इन्स्पेक्टर विश्वास सरंजामेची भूमिका साकारणारा अंकुश चौधरी म्हणाला, “देवखेळ हा सिनेमा रहस्यापेक्षा खूप जास्त आहे – तो विश्वास आणि तर्क यांच्यातील संघर्ष आहे. विश्वास सरंजामे हा तर्कशास्त्र, पुरावे आणि कायद्यात खोलवर रुजलेला माणूस आहे. तरीही त्याला जिथे भीती, श्रद्धा आणि शतकानुशतके जुन्या अंधश्रद्धा लोकांच्या निवडी ठरवतात, अशा ठिकाणी काम करण्यास भाग पाडले जाते. ‘दैवी’ मुद्यावर प्रश्न उपस्थित करण्यास नकार देणाऱ्या व्यवस्थेमुळे भावनिकदृष्ट्या प्रभावित होऊन वस्तुनिष्ठ राहणे. मला अंतर्गत संघर्षाने सर्वात जास्त आकर्षित केले. कोकणातील वातावरण, शंकासुराची पौराणिक कथा आणि मानसिक तणाव या सिरीजला अविश्वसनीयपणे ‘हटके’ बनवतात. या भूमिकेसाठी संयम, असुरक्षितता आणि तीव्रता समान प्रमाणात आवश्यक होती. मला खरोखर विश्वास आहे की प्रेक्षकांना प्रत्येक भागासह तो संघर्ष जाणवेल.”
या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी प्राजक्ता माळी पुढे म्हणाली, “देवखेळ वेड लावणारा आहे. कारण आपण ज्यावर क्वचितच प्रश्न विचारतो, अशा वास्तवाला प्रतिबिंबित करतो – विश्वास, भीती, शांतता आणि अगदी अपराधीपणा किती खोलवर असतात. मी ज्या गोष्टीने प्रोजेक्टकडे आकर्षित झाले ते म्हणजे त्याची भावनिक सखोलता आणि सांस्कृतिक प्रामाणिकता! कथा अशा जगात उलगडते जिथे विधी, उत्सव आणि भीती एकत्र राहतात. माझी व्यक्तिरेखा त्या नाजूक संतुलनात राहते. तिला पदर आहेत. ती भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीची आणि परंपरा, न सांगितलेल्या सत्यांच्या वजनाने आकारलेली आहे. हा ट्रेलर केवळ आगामी मानसिक आणि भावनिक प्रवासाचे संकेत देतो. कोकणातील लोककथांमध्ये रुजलेल्या कथानकाचा भाग असणे, तरीही इतके प्रासंगिक आणि आकर्षक असणे हा खरोखरच समृद्ध करणारा अनुभव आहे.”
पहा देवखेळ , स्ट्रीमिंग खास झी ५ वर दिनांक 30 जानेवारी 2026 पासून!
झी ५ हा भारतात विकसित झालेला सर्वात मोठा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असून दक्षिण आशियातील कंटेन्टसाठी ग्लोबल डेस्टिनेशन आहे आणि या माध्यमातून 190+ देशांमधील प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते. झी एंटरटेनमेंट एंटरप्राइझ लि. या आघाडीच्या कंटेन्ट व तंत्रज्ञान पॉवरहाउसचा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या आणि अपनी भाषा, अपनी कहानिया यावर भर देणाऱ्या झी ५ तर्फे स्थानिक भाषांना प्राधान्य देण्यात येते. त्यांच्यातर्फे हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, मल्याळम, कन्नड आणि मराठी या भाषांसाठी हायपर-लोकल कंटेन्ट, भाषेशी संबंधित पॅक आणि अत्यंत वैयक्तिकृत अनुभव उपलब्ध करून देण्यात येतो. ओरिजिनल्स, भारतीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट, टीव्ही शो, मुलांसाठीचा कंटेन्ट, बातम्या, लाइव्ह टीव्ही आणि बाइट-साइझ्ड मायक्रो ड्रामांच्या प्रचंड संग्रहासह झी ५ हे जगभरातील भारतीयांसाठी वैविध्यपूर्ण, बहुभाषिक कंटेन्ट उपलब्ध करून देणारे डेस्टिनेशन आहे.
टाटा मोटर्सकडून 17 नेक्स्ट-जनरेशन ट्रक्स लाँच; सुरक्षितता, लाभक्षमता आणि प्रगतीसाठी नवीन मानक स्थापित केले
कोल्हापूर: भारतातील ट्रकिंग क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक व गतीशीलता सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने आज आपल्या 17 ट्रक्सचा नेक्स्ट-जनरेशन पोर्टफोलिओ लाँच केला. हे ट्रक्स ७ टन ते ५५ टन कन्फिग्युरेशन्समध्ये उपलब्ध आहेत. यासह सुरक्षितता, नफा व प्रगतीमध्ये नवीन मापदंड स्थापित केले आहे. या सर्वसमावेशक लाँचमध्ये ऑल-न्यू अझुरा सिरीज, अत्याधुनिक टाटा ट्रक्स ईव्ही श्रेणी आणि प्रस्थापित प्राइमा, सिग्ना व अल्ट्रा प्लॅटफॉर्म्समधील मोठ्या अपग्रेड्सचा समावेश आहे. जागतिक सुरक्षितता मानकांचे (ECE R29 03) काटेकोरपणे पालन करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले हे ट्रक्स उत्पन्न क्षमता वाढवतात, एकूण मालकीहक्क खर्च कमी करतात आणि वेईकल अपटाइम वाढवतात, ज्यामुळे वाहतूकदारांना मोठे यश मिळते.
नवीन ट्रक्स लाँच करत टाटा मोटर्स लि.चे एमडी व सीईओ श्री. गिरीश वाघ म्हणाले, “भारतातील ट्रकिंग क्षेत्रात झपाट्याने परिवर्तन होत आहे, ज्याला प्रगतीशील राष्ट्रीय धोरणे, आधुनिक पायाभूत सुविधा आणि सुरक्षित, अधिक स्वच्छ व अधिक कार्यक्षम लॉजिस्टिक्ससाठी वाढत्या मागणीने गती दिली आहे. टाटा मोटर्स मापदंड स्थापित करण्यामध्ये नेहमी अग्रस्थानी आहे, जे उद्योगाच्या भविष्याला आकार देतात. लाँच करण्यात आलेल्या आमच्या नेक्स्ट-जनरेशन पोर्टफोलिओमध्ये ऑल-न्यू अझुरा सिरीज, दोन प्रगत उच्च-कार्यक्षम पॉवरट्रेन्स, आमच्या नवीन आय-एमओईव्ही आर्किटेक्चरवर आधारित भारतातील शून्य-उत्सर्जन इलेक्ट्रिक ट्रक्स व ट्रिपर्सची व्यापक श्रेणी, युरोपियन मानक केबिन्स व उद्योग-अग्रणी सुरक्षितता वैशिष्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अपग्रेड्स, अधिक पेलोड क्षमता आणि इंधन कार्यक्षमतेचा समावेश आहे, जे सर्व फ्लीट एज डिजिटल सेवांसह एकीकृत करण्यात आले आहेत. यासह आम्ही या वारशाला अधिक पुढे नेत आहोत. ‘बेटर ऑल्वेज’ तत्त्वामधून प्रेरित आमची नाविन्यतेप्रती अविरत मोहिम, स्थानिकीकरणाप्रती दृढ कटिबद्धता आणि ग्राहकांना यशस्वी करण्यावरील निरंतर फोकस ‘आत्मनिर्भर भारत’च्या दृष्टिकोनाशी संलग्न आहेत, ज्यामुळे शाश्वत गतीशीलतेमध्ये नेतृत्व करण्याप्रती भारताचा आत्मनिर्भरपणा व महत्त्वाकांक्षा अधिक दृढ झाली आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे महानगर पालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुरंधर शिल्पकार
महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या प्रचाराला राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे पाठिंबा व्यक्त केल्याचे चित्र निकालांमुळे स्पष्ट झाले आणि त्याच बरोबर शहरी मतदाराची अचूक नस माहिती असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या विचारधारेसोबत राहण्याच्या आवाहनाला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निकालांवरून दिसले. मागील वर्षी जानेवारीत रविंद्र चव्हाण यांनी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्यांचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले होते तिथेच ते अर्धी लढाई जिंकल्याचे आज या दणदणीत विजयाने स्पष्ट झाले.
भाजपा हा धोरण आखणारा आणि धोरण राबविणारा पक्ष आहे. निवडणुकांचे नियोजन, तिकीट वाटप, सभांचे नियोजन याबरोबरच विरोधी पक्षांना जोखण्याचे कसब “देवेंद्र आणि रविंद्र” या भाजपाच्या जोडीकडे आहे. सरकार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश पक्ष यातील समन्वयाचे हे यश असल्याने हा अभूतपूर्व विजय मिळाल्याचे विश्लेषण राजकीय पंडितांनी केले आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे शीर्षस्थ नेतृत्त्व म्हणून पक्षासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात बोलून दाखवलेली. त्यांच्या रूपाने भाजपाला रस्त्यावर उतरून आंदोलन केलेला आणि मातीशी जोडलेला कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून मिळाला. निवडणूक काळातील वक्तव्याने, पेहरावाने झालेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेमुळे रविंद्र चव्हाण बिलकुल विचलित झाले नाहीत. उलट त्यांनी विरोधकांना जनतेसाठी अनावश्यक अशा विषयात गुंतवून ठेवून, भाजपासाठी विजयाची वाट अधिक सुकर केल्याचे स्पष्ट झाले. विरोधकांनी चव्हाण यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेला जनतेच्या दृष्टीने कवडीमोल किंमत असल्याचेही या निमित्ताने दिसले. २५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत रविंद्र चव्हाण त्यांच्यावर झालेल्या प्रत्येक टीकेनंतर एक पाऊल पुढे जातानाच दिसले. याचे कारणच कायम संघर्ष करून यश संपादन केलेला रविंद्र चव्हाण यांच्यासारखा नेता महाराष्ट्रातील जनतेने अजून नीटसा पाहिलेला वा ओळखलेला नाही आणि राजकीय निरीक्षकांनी अजून अभ्यासलेला नाही. रविंद्र चव्हाण हे अत्यंत मुरलेले आणि मुरब्बी राजकारणी म्हणून महाराष्ट्रात आजच्या भाजपाच्या विजयाने उदयास आलेले आहेत हे दिसले.
देवेंद्र फडणवीस यांना रविंद्र चव्हाण यांची बलस्थानं माहिती आहेत. पक्षासाठी २४ तास समर्पित अध्यक्ष म्हणून त्यांचे महत्त्व फडणवीस जाणून आहेत. रविंद्र चव्हाण यांचा शहरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव आणि त्यांची कायम “निवडणूक सिद्धता ” म्हणजेच इलेक्शन रेडीनेस अशा स्वरूपाची कार्यशैली देवेंद्र फडणवीस ओळखून आहेत. त्यातच अडीच वर्षे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना अवघा महाराष्ट्र पिंजून काढत रविंद्र चव्हाण यांनी खात्याच्या माध्यमातून विकासकामे करताना संपूर्ण महाराष्ट्रात हेरलेली आणि पेरलेली माणसं ही भाजपासाठी महत्त्वाची ठरली असं दिसत आहे. आजच्या भाजपाच्या दैदिप्यमान विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अष्टपैलू नेतृत्व जितके प्रखरतेने माध्यमांसमोर दिसलं तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा नियोजनाचा आवाका महाराष्ट्राच्या लक्षात येईल जेव्हा संपूर्ण विजयाची आकडेवारी प्रकाशित होईल.
इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी कटीबध्द : मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही*
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला जोरदार प्रतिसाद*
इचलकरंजी: इचलकरंजी शहराला मोठ्या प्रमाणावर दूषित पाणीपुरवठा होत आहे. या शहराला स्वच्छ आणि मुबलक पिण्याचे पाणी देण्यासाठी कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने इचलकरंजी शहराचा रखडलेला पाणी प्रश्न येत्या दोन वर्षात कायमचा निकालात काढू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ दिली. इचलकरंजीचा चेहरा मोहरा बदलू. शहराचा पहिला लोकनियुक्त महापौर महायुतीचाच करा, असे आवाहनही त्यांनी केले.
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या प्रभाग क्र. दोनमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ कृष्णनगर येथे आयोजित जाहीर सभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रभारी वृषभ जैन होते.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजी शहराच्या पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, वैशिष्ट्यपूर्ण कामे, पर्यावरण या मूलभूत सोयीसुविधा तर निर्माण करूच. तसेच; संपूर्ण शहराचा प्रभागनिहाय नियोजनबद्ध विकास करू.
*इचलकरंजीला देशाच्या नकाशावर आणू…….!*
श्री. मुश्रीफ म्हणाले, केंद्रासह राज्यात सत्ता महायुतीची आहे. जिल्ह्यात दहा आमदार आणि या विभागाचे खासदार महायुतीचे आहेत. इचलकरंजी महापालिकेची सत्ता महायुतीला द्या. शहरांमधील सुधारणांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. स्मार्ट सिटी बनवून येणाऱ्या काळात शहर देशाच्या नकाशावर आणू.
यावेळी नितीन जांभळे व बंडा मुसळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, माजी आमदार अशोकराव जांभळे, महायुतीचे उमेदवार सौ. शुभांगी प्रधान माळी, राजू कबाडे, श्रीमती मंगल बंडा मुसळे, सुहास जांभळे यांच्यासह कार्याध्यक्ष अमित गाताडे आणि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.*इचलकरंजी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या प्रभाग क्र. दोनमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ कृष्णनगर येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुहास जांभळे व समोर उपस्थित नागरिक.*
=========

















