Thursday, March 12, 2026
Home Blog Page 5

पुण्यात प्रथमच येत आहे पॉ पेट्रोल – फिनिक्स मार्केटसिटीमध्ये खास कार्यक्रम आयोजित

0

पुणे, जानेवारी 2026: जगभरात प्रसिद्ध आणि लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेला प्री-स्कूल शो (पी ए डब्ल्यू) पॉ पेट्रोल आता प्रथमच पुण्यात येत आहे. हा खास कार्यक्रम फिनिक्स मार्केटसिटी पुणे येथील लिबर्टी स्क्वेअर येथे 9 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी लिबर्टी स्क्वेअर हे ठिकाण अ‍ॅडव्हेंचर बे थीमवर सजवले जाणार आहे. मुले आणि कुटुंब येथे मजेदार आणि इंटरॅक्टिव्ह अनुभवाचा आनंद घेऊ शकतील. हा उपक्रम भारतात जिओस्टारकडून सादर केला जात आहे.
हा खास कार्यक्रम लहान मुलांना त्यांच्या आवडत्या पप्पी हिरोंच्या जगात घेऊन जाणार असून, विविध अ‍ॅक्टिव्हिटी झोनमध्ये आयोजित केलेल्या मजेदार आणि थीमवर आधारित मिशन्समध्ये सहभागी होण्याची संधी देणार आहे.
प्रवेश करताच प्रत्येक मुलाला पॉ पेट्रोल पासपोर्ट आणि एक अ‍ॅक्टिव्हिटी बँड दिला जाईल. प्रत्येक अ‍ॅक्टिव्हिटी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पासपोर्टवर शिक्का मारला जाईल, ज्यामुळे ते मिशन पूर्ण करण्याच्या अधिक जवळ जातील. सर्व अ‍ॅक्टिव्हिटीज पूर्ण केल्यानंतर मुलांना कम्प्लीशन सर्टिफिकेट आणि ऑफिशियल पॉ पेट्रोल गिफ्ट्स दिली जातील, ज्यामुळे हा अनुभव मुलांसाठी अधिक मजेदार, खास आणि अविस्मरणीय ठरेल.
कार्यक्रमातील खास अ‍ॅक्टिव्हिटीज

· चेससोबत केस सॉल्व्ह करा

· रबलचे कन्स्ट्रक्शन सेंटर

· मार्शलसोबत फायर फ्लाइट

· स्कायसोबत उड्डाणाचा अनुभव

· इमर्सिव्ह व्हीआर कार रेस

· आर्ट्स अँड क्राफ्ट्स झोन

· पॉ पेट्रोल स्क्रीनिंग एरिया

· पप कॅरेक्टर्ससोबत भेट आणि संवाद

· प्रोफेशनल फोटोग्राफी झोन

· अधिकृत पॉ पेट्रोल भेटवस्तू

पॉ पेट्रोल हा शो त्याच्या मनोरंजक कथाकथनासाठी ओळखला जातो. तसेच मुलांना टीमवर्क, धैर्य आणि समस्या सोडवण्याचे महत्त्व शिकवतो. हा लाईव्ह अनुभव मुलांसाठी सुरक्षित, आनंददायी आणि शिकवण देणारा आहे. येथे मुले खेळू शकतात, नवीन गोष्टी शिकू शकतात आणि आपल्या कुटुंबासोबत सुंदर व कायम लक्षात राहतील अशा आठवणी तयार करू शकतात.

कार्यक्रमाची माहिती

· दिनांक: 9 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2026

· वेळ: दुपारी 2 वाजल्यापासून

· ठिकाण: लिबर्टी स्क्वेअर, फिनिक्स मार्केटसिटी पुणे

· तिकिटे: बुकमायशो वर उपलब्ध

· तिकीट दर: 399 पासून

“शेकडो दारं, अनेक सदस्य… आणि एकच बॉस!” बिग बॉस मराठी परततोय !

0

कोल्हापूर-मराठी मनोरंजनाची ओळख बनलेला, ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र डोळे लावून पाहतो असा मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात भव्य आणि चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बाॅस मराठी’ पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. देशाचा लाडका सुपरस्टार, आपले लाडके ‘भाऊ’ रितेश देशमुख बिग बॉस मराठीचा नवा सीझन घेऊन येत आहेत. “बिग बॉस सांगू इच्छितात, बिग बॉस आदेश देत आहेत…” हा दमदार आवाज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरांत घुमणार आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’चं घर नव्या रूपात, नव्या रचनेत आणि नव्या खेळाच्या नियमांसह सादर होत असून, “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” या रोमांचक थीमसह नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी ते पूर्णपणे तयार आहे. १०० हून अधिक कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत, तब्बल १०० दिवस चालणाऱ्या या प्रवासात अतरंगी स्वभावांचे बहुरंग, नात्यांचे बदलते पदर, प्रेम-मैत्री, मतभेद, भांडणं आणि चुरशीचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
बिग बॉसच्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यातील दुवा म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक. मागील पर्वात आपल्या ठाम मतांमुळे, रोखठोक भूमिका, पण तितक्याच प्रेमळ स्वभावाने, साध्या-सहज व्यक्तिमत्त्वाने आणि गरज पडल्यास कडक शिस्तीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारे, हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय सुपरस्टार रितेश देशमुख याही पर्वात सूत्रसंचालकाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. मागील सीझनमध्ये त्यांनी कधी मित्र, कधी मार्गदर्शक बनून सदस्यांना आरसा दाखवला, परखड मत व्यक्त केली आणि खोटेपणाचे मुखवटे उतरवले. हे सगळं यंदाही पाहायला मिळणार आहे. अस्सल महाराष्ट्रीयन स्वॅगसह रितेश देशमुख यंदा हा खेळ अधिक रंगतदार करणार असून, घरातील सदस्यांसह प्रेक्षकांवरही आपल्या सूत्रसंचालनाची छाप ते नक्कीच सोडतील. बनिजे आशियाने निर्मित केलेला ‘बिग बॉस मराठी’चा सीझन ६ एका दिमाखदार सोहळ्याद्वारे ११ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता, आपल्या लाडक्या कलर्स मराठी आणि जिओ हाॅटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतरचे भाग दररोज रात्री ८ वाजता प्रसारित होतील.
बिग बॉस सुरू होण्याआधीच संपूर्ण महाराष्ट्रात या सीझनमधील स्पर्धकांबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. प्रत्येक मराठी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असताना, यंदाही आपल्या खास स्टाईल आणि दिलखुलास अंदाजाने रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत, याबाबत बोलताना रितेश देशमुख म्हणाले ,‘बिग बॉस मराठी’चं घर म्हणजे रोज नवं वळण आणि नवं आव्हान. पुन्हा एकदा या शोचं सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. यंदा कुठलं दार कुणाचं नशीब उघडेल, हे कुणालाच माहीत नाही. या शोची खरी मजा म्हणजे सदस्यांमधले लपलेले पैलू प्रेक्षकांसमोर आणणे. यंदाच्या सीझनमध्ये राडा, धुरळा, भावना आणि मस्ती सगळं काही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सहाव्या सीझनसाठी सज्ज राहा, कारण यंदा ‘बिग बॉस मराठी’ अधिक बेधडक, अनपेक्षित आणि अगदी अस्सल मराठमोळा असणार आहे.”
यावर्षीच्या सीझनबद्दल आणि थीमबद्दल बोलताना मराठी क्लुस्टारचे सतीश राजवाडे म्हणाले, “रिअॅलिटी शोच्या विश्वात ‘बिग बॉस’ची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. मराठी प्रेक्षक अतिशय चोखंदळ असून त्यांची आवड सतत बदलते. त्यामुळे सहाव्या सीझनसाठी आम्ही फक्त खेळ नाही, तर संपूर्ण अनुभव नव्याने घडवण्याचा निर्णय घेतला आहे. फॉरमॅट न बदलता कंटेंट अधिक धारदार ठेवण्यावर आणि प्रत्येक वयोगटाला सहभागी करून घेण्यावर आमचा भर आहे. २१ ते ५५ वयोगटातील विविध विचारसरणी आणि स्वभावांचे स्पर्धक यंदा घरात पाहायला मिळणार आहेत. या सगळ्याला योग्य दिशा देण्यासाठी रितेश देशमुख यांच्यासारखा ठाम आणि संवेदनशील सुपरस्टार आमच्यासोबत असणं ही आमच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. ‘दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!’ या थीममुळे यंदाचा सीझन अधिक उत्सुकता निर्माण करेल हे नक्की.”
मराठी माणूस म्हटलं की गप्पा, चर्चा हि आलीच. वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं एकत्र आली की भांडणं, रुसवे-फुगवे, मैत्री, प्रेम आणि स्पर्धा अपरिहार्य ठरते.‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदाही विविध क्षेत्रातील अतरंगी स्पर्धक एका छताखाली राहणार आहेत. यंदाच्या सीझनची सर्वात मोठी खासियत म्हणजे घराची आगळीवेगळी संकल्पना. यावर्षी १३,००० चौरस फूट भव्य जागेत विविध क्षेत्रातील १६ हून अधिक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व सदस्य म्हणून घरात जाणार आहेत. अनेक दारांनी सजलेलं हे भव्य घर केवळ राहण्यासाठी नसून, तेच या खेळाचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे. प्रत्येक दारामागे एखादं आव्हान, एखादा धक्का किंवा एखाद्याचं नशीब बदलणारा क्षण दडलेला असेल. “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” ही केवळ टॅगलाईन नसून यंदाच्या सीझनचं मुख्य वैशिष्ट्य आहे.
घराचा दरवाजा पुन्हा एकदा उघडणार आहे. दर आठवड्याला किमान एका स्पर्धकाला घराबाहेर जाण्यासाठी इतर स्पर्धक तसेच प्रेक्षकांच्या मतांद्वारे नामांकन करण्यात येईल. जो स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत बिग बॉसच्या घरात टिकेल, तो ठरेल ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ चा विजेता. नव्या पर्वाचा काउंटडाऊन सुरू झाला असून, पाहूया रितेश भाऊ यंदा या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत कसं करणार आणि कोण खेळात टिकणार! “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ – ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठी आणि JioHotstar वर.

इचलकरंजी ‘मँचेस्टर सिटी’ ला गतवैभव मिळवून देवू : मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही*

0

*इचलकरंजीला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी कटिबद्ध*
*इचलकरंजी, दि. ११:संपूर्ण देशभर वस्त्रनगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजी शहराचा “भारताचे मँचेस्टर” असा लौकिक सर्वदूर आहे. एकूणच वस्त्रोद्योग व्यवसाय अडचणीत असल्यामुळे या मँचेस्टरची रया गेलेली आहे. या शहराला गतवैभव मिळवून देण्याची ताकद आणि शक्ती उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या अंगात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या शहराच्या “मँचेस्टर सिटी” या लौकिकाला साजेस गतवैभव मिळवून देवू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठीही कटिबद्ध असल्याची ग्वाही, श्री. मुश्रीफ यांनी यावेळी दिली.
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्र. तीनमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ गणेशनगर येथे आयोजित जाहीर सभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव जांभळे होते.
मंत्री श्री. मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, येणाऱ्या काळात इचलकरंजी शहरातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावू. आमचे नगरसेवक केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना नागरिकांच्या घराघरापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करतील. इचलकरंजी शहराचा प्रभागनिहाय विकास तर होईलच. दरम्यान; सर्वच नगरसेवक नागरिकांच्या आणि विशेषता गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना घराघरापर्यंत पोहोचतील. यामध्ये वृद्ध निराधार दिव्यांगांसाठी पेन्शन योजना, बांधकाम कामगार कल्याणकारी योजना, बेघरांना मजबूत पक्की घरे, विविध आरोग्याच्या योजना अशा अनेक योजनांचा समावेश आहे.
माजी आमदार अशोकराव जांभळे म्हणाले, मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या सहयोगातून इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहू.
नितीन जांभळे यांना श्रद्धांजली……
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी या प्रभागाचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास केलेला आहे. कै. नितीन जांभळे हयात असते तर या प्रभागाची निवडणूक बिनविरोधच झाली असती. त्यांच्यासारख्या अजातशत्रू, लढवय्या आणि जिद्दी कार्यकर्त्यावर नियतीने घाला घातला. या प्रभागातील सर्वच उमेदवारांचा विजय हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, तौफिक मुजावर, इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे, उमेदवार माजी आमदार अशोकराव जांभळे, प्रियदर्शनी बेडगे, शिवाजी शिंदे, मनाली नंदुरकर यांच्यासह कार्याध्यक्ष अमित गाताडे, माजी नगरसेवक राजु खोत, विद्या जांभळे, संगीता खोत, जयदीप जांभळे, दिलीप खोत आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
*इचलकरंजी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्र. तीनमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ गणेशनगर येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार अशोकराव जांभळे व समोर उपस्थित नागरिक.*

*कॉफी विथ युथ आयकॉन कृष्णराज : रंकाळा तलावाच्या काठावर अनोखा उपक्रम*

0

कोल्हापूर (प्रतिनिधी):गर्दीने गजबजलेल्या रंकाळा तलावाच्या काठावर आज अनोखा उपक्रम रंगला. युवकांनी उपस्थित केलेल्या शहराच्या विकासासंदर्भातील प्रश्न आणि त्याला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी दिलेली समर्पक आणि अभ्यासू उत्तरे यामुळे आजची संध्याकाळ संस्मरणीय बनली. महायुतीच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी दिले.
कोल्हापूरच्या तुलनेत अनेक शहरांचा सर्वांगीण विकास होतो. मात्र कोल्हापूर शहर अजूनही तुलनेने मागे राहिले आहे. इथले प्रश्न, समस्या अजूनही ३० वर्षानंतर तसेच प्रलंबित आहेत. त्यामुळे याबाबत युवा पिढीशी संवाद साधून त्यावर सकारात्मक पावले उचलण्याच्या दृष्टीने आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रंकाळा तलावाच्या काठावरील शालिनी पॅलेससमोर कॉफी विथ युथ…. या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. युवा मोर्चा कोल्हापूर महानगरच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी युवक- युवतींशी कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर मनमोकळा संवाद साधला. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शहरात महिलांसाठी पाच स्वच्छतागृह उभारणीसाठी निधी आणल्याचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत पवार यांनी स्पष्ट करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. दरम्यान कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेत महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन भाजपा राज्य सचिव महेश जाधव यांनी केले. महापालिकेची निवडणूक लोकसभा आणि विधानसभेपेक्षा अत्यंत वेगळ्या पद्धतीची असते. त्यामुळे येथे असणारे प्रश्न, मूळ समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत. या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. किशोर पवार, यश पाटील, पार्थ हर्षद, आदिती माने, शिवम बुचडे, दिलीप पाटील, तेजस मडिवाळ, वेदांत साळुंखे यांनी विचारलेल्या प्रश्नांना युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी समर्पक उत्तरे दिली. भविष्यात कोल्हापुरात औषध, रसायन, वाहन उद्योग येण्यासाठी हददवाढ गरजेची आहे. आयटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एमआयडीसीचा देखील विस्तार होणार आहे. रस्ते दर्जेदार मोठे बनवणे आवश्यक आहे. जोतिबा आणि अंबाबाई मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी झाल्यानंतर शहरात मोठमोठे हॉटेल्स, पार्किंग सुविधा, फ्लॅट्स, खानावळी, नाष्टा सेंटर, स्वच्छतागृह होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कचरा समस्या सुटेल. तसेच त्यावर आधारित वीज आणि खत प्रकल्प होतील. खेळाडूंसाठी देशपातळीवरची फुटबॉल प्रीमियर लीग कोल्हापुरात होणार आहे. तर प्रधानमंत्री कुशल रोजगार योजना केंद्र सक्षम बनणार आहेत. छत्रपती शाहू मिल सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न होणार आहेत. जिल्हावार रोजगार मिळावे आणि नोकर्‍या उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न, प्रदूषण मुक्त पंचगंगा आणि रंकाळा तलावसाठी एसटीपी प्लांट्स उभारले जातील. वाहतूक समस्या सोडवण्यासाठी फ्लाय ओव्हर सारखे प्रकल्प कोल्हापुरात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वांसाठी महायुतीला सत्ता देण्याचे आवाहन महाडिक यांनी केले. यावेळी युवा मोर्चाचे वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, जयेश घरपणकर, शाहरुख गडवाले, अमोल पालोजी, सुरज साखरे, अजिंक्य जाधव, पृथ्वीराज मोरे, रहीम सनदी, अवधूत अपराध यांच्यासह तरूण वर्ग उपस्थित होता.

रियलमी १६ प्रो सिरीजचे अनावरण

0

कोल्हापूर, :भारतीय युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या स्मार्टफोन ब्रँड रियलमीने आज रियलमी १६ प्रो सिरीजचे अधिकृत अनावरण केले. प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये बेंचमार्क ठरलेल्या या सिरीजमध्ये रियलमी १६ प्रो प्लस आणि रियलमी १६ प्रो हे दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. परफॉर्मन्स, डिझाइन आणि पोर्ट्रेट इमेजिंगमध्ये नवे मापदंड स्थापित करण्यावर कंपनीचा भर आहे.
रियलमी १६ प्रो प्लसमध्ये इंडस्ट्रीतील पहिले बायो-बेस्ड ऑरगॅनिक सिलिकॉन बॅक कव्हर, २०० एमपी लुमा कलर पोर्ट्रेट कॅमेरा, ३.५x पेरिस्कोप लेन्स, स्नॅपड्रॅगन ७ जेन ४ चिपसेट आणि ७००० mAh टायटन बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन मास्टर गोल्ड, मास्टर ग्रे आणि भारतासाठी खास कॅमेलिया पिंक रंगात उपलब्ध असून किंमत ₹३५,९९९ पासून सुरू होते.
रियलमी १६ प्रो मध्ये २०० एमपी कॅमेरा, मीडियाटेक डायमेन्सिटी ७३००-मॅक्स ५जी चिपसेट आणि ७००० mAh बॅटरी असून याची सुरुवातीची किंमत ₹२८,९९९ आहे. यासोबतच कंपनीने रियलमी बड्स एअर ८, रियलमी पॅड ३ आणि रियलमी स्मार्ट पेनही सादर केले आहेत.

ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूर 2025 भारतभर भव्य आणि नाविन्यपूर्ण फॅशन शोसह झाला संपन्न

0

हा दौरा तीन शहरांमध्ये यशस्वीपणे पार पडला असून, इमर्सिव्ह कथाकथन आणि अत्याधुनिक डिझाइनच्या माध्यमातून फॅशन अनुभवांना नव्याने परिभाषित करण्यात आला.

ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूर 2025 चा भव्य आणि लक्षवेधी प्रवास गुरुग्राम, जयपूर आणि कोलकाता या शहरांमध्ये फॅशन अनुभवांचा नवा मापदंड ठरवत यशस्वीपणे संपन्न झाला. ‘द वन अँड ओन्ली’ या खास स्टेजच्या माध्यमातून भविष्यातील फॅशनची दिशा ठरवणारा सूर या टूरने बांधला. फॅशन कशी अनुभवली जाते, साजरी केली जाते आणि कल्पनेत उभी राहते, याच्या मर्यादा ओलांडणाऱ्या तीन क्रांतिकारी कथानकांचे सादरीकरण या दौऱ्यात करण्यात आले.प्रत्येक शहरात ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूरने फॅशनला चालना दिली. गुरुग्राममध्ये तंत्रज्ञान आणि कुट्युअर यांचा थेट संगम साधत फॅशनला ‘फ्युचरव्हर्स’मध्ये नेले गेले. जयपूरमध्ये हाय-ऑक्टेन मोटरस्पोर्ट सौंदर्यशैलीसह फॅशनला वेगवान मार्गावर आणण्यात आले, तर कोलकातामध्ये पारंपरिक हस्तकलेच्या संकल्पनांना आव्हान देत त्यांना धाडसी आणि आधुनिक रूप देण्यात आले.इमर्सिव्ह आणि बहुअनुभूती देणाऱ्या फॅशन अनुभवांचा नवा मापदंड निर्माण करत या टूरने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. गुरुग्राममध्ये डिझायनर्स फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांनी सादर केलेल्या ‘द फ्युचरव्हर्स ऑफ फॅशन’ या शोमध्ये हॉट कुट्युअरला ह्युमनॉईड रोबोट्स, होलोग्राफिक तंत्रज्ञान आणि मोशन-सेन्सिंग प्रोजेक्शन्ससोबत एकत्र करण्यात आले. या अनोख्या सादरीकरणात शाहिद कपूर आणि तमन्ना भाटिया झळकले.जयपूरमध्ये ‘हाय ऑक्टेन कुट्युअर’च्या माध्यमातून फॅशनला वेग मिळाला. डिझायनर्स नम्रता जोशीपुरा आणि अभिषेक पटणी यांनी मोटरस्पोर्ट सौंदर्यशैलीला नव्या अंदाजात मांडले. मिस युनिव्हर्स हरनाज संधू आणि रॅपर रफ्तार यांच्या उपस्थितीत क्रोमने सजवलेल्या सुपरकार्स आणि तीन फेऱ्यांच्या रॅम्प वॉकने हा शो अधिकच थरारक झाला.कोलकात्यातील अंतिम सादरीकरणात ‘फ्युचर इज क्राफ्टेड’ ही संकल्पना मांडत पारंपरिक हस्तकलेच्या चौकटी मोडून काढणारी कथा सादर करण्यात आली. हावडा ब्रिजच्या पार्श्वभूमीवर एके | ओके अनामिका खन्ना यांनी फ्युचरिस्टिक टेलरिंगच्या माध्यमातून पारंपरिक कलेचे नव्याने विघटन केले. शोस्टॉपर म्हणून ईशान खट्टर झळकला आणि हुगळी नदीला जणू फॅशनचे तरंगते रंगमंचच बनवण्यात आले.पर्नोड रिकार्ड इंडियाच्या सीएमओ देबश्री दासगुप्ता म्हणाल्या, “एफडीसीआयच्या सहकार्याने साकारलेला ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूर हा भारतीय फॅशनमधील सर्वात आयकॉनिक मंच राहिला आहे. ‘द वन अँड ओन्ली’ या आमच्या ध्येयाने प्रेरित होत आम्ही भारतातील उत्कृष्ट डिझायनर्ससोबत भागीदारी करून फॅशन आणि स्टाईलच्या प्रवासाला नवे मापदंड देत आहोत. ‘मेकिंग फॅशन मूव्ह’ या संकल्पनेतून ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूर भविष्यातील फॅशन घडवणारी एक प्रभावी ताकद म्हणून स्वतःची भूमिका ठामपणे मांडतो, नव्या कल्पना, सहकार्य आणि अनुभवांच्या माध्यमातून पुढे काय येणार आहे ते ठरवतो. सर्जनशीलता, संस्कृती आणि नवोन्मेष यांना केंद्रस्थानी ठेवत हा ब्रँड फॅशन कशी विकसित होते, कशी जोडते आणि पुढील पिढीला कशी प्रेरणा देते, याची दिशा सातत्याने ठरवत आहे.”सुनील सेठी, अध्यक्ष, एफडीसीआय यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले, “ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूरसोबतच्या सहकार्याबद्दल एफडीसीआयला अतिशय आनंद आहे. फॅशन क्षेत्रातील दोन ताकदवान मंच एकत्र आल्याने फॅशनचे भविष्य घडवण्याविषयीची आमची बांधिलकी अधिक बळकट झाली आहे. या आवृत्तीत विविध डिझाइन दृष्टीकोन एकत्र आले असून, सर्जनशीलता आणि संस्कृतीचा उत्सव साजरा करत भारतातील फॅशनच्या भविष्यासाठी वेग आणि दिशा ठरवली जात आहे.”तीन शहरांमध्ये 2100 हून अधिक प्रभावशाली उपस्थितांची उपस्थिती लाभलेल्या ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूर 2025 मध्ये डिझायनर्स, सेलिब्रिटी, सांस्कृतिक ट्रेंडसेटर्स, फॅशन क्षेत्रातील नेते, इन्फ्लुएन्सर्स आणि माध्यम प्रतिनिधी यांचा काळजीपूर्वक निवडलेला संगम पाहायला मिळाला. यामुळे हा टूर एक वेगळ्या दर्जाचा सांस्कृतिक मंच असल्याची त्याची ओळख अधिक भक्कम झाली.हा दौरा संपताना केवळ भव्य सादरीकरणांची आठवण न ठेवता, फॅशन कधीही वाट पाहत नाही, तर ती स्वतः पुढे सरकते, असा ठाम दृष्टिकोन देऊन जातो. ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूरसोबत फॅशन पुढच्या दिशेने वाटचाल करते आणि पुढे येणाऱ्या ट्रेंड्सचा सूर निश्चित करते.

मकर संक्रांत : जुनी परंपरा आणि तिळ-गुळ खाण्यामागील आरोग्यशास्त्र

0

चीफ डायटिशियन स्वाती अवस्थी, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर यांचे तज्ज्ञ मार्गदर्शन

भारतामध्ये मकर संक्रांत हा सण साजरा करण्याची तयारी सुरू झाली की घराघरात तिळ आणि गुळाचा सुगंध दरवळू लागतो. शतकानुशतके चालत आलेली तिळ-गुळ खाण्याची ही जुनी परंपरा केवळ सांस्कृतिक प्रथा नसून आपल्या आहार आणि आरोग्याबद्दलच्या जाणिवेचे उत्तम उदाहरण आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरच्या मते, सण हे केवळ आनंद साजरा करण्याची संधी नाही, तर आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची संधी देखील आहे.
मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यामुळे दिवस मोठे होऊ लागतात, शरीरात नवी ऊर्जा येते आणि हळूहळू थंडी कमी होऊ लागते. परंपरेनुसार, या ऋतूबदलाच्या काळात शरीर गरम ठेवणारे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आणि एकूण आरोग्यास पूरक असे अन्न खाणे योग्य मानले जाते. तिळ आणि गुळ यांचे पारंपरिक मिश्रण यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर येथील चीफ डायटिशियन स्वाती अवस्थी सांगतात की, तिळ हे नैसर्गिकरित्या उष्णता निर्माण करतात आणि त्यामध्ये चांगले फॅट्स असतात. त्यामुळे शरीर उबदार राहते, सांध्यांचे आरोग्य सुधारते आणि थंडीत ऊर्जा टिकून राहते. गुळामध्ये लोह, झिंक आणि मॅग्नेशियमसारखी महत्त्वाची खनिजे असतात, जी रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि हंगामी आजारांचा धोका कमी करतात.
रोगप्रतिकारशक्तीव्यतिरिक्त तिळ-गुळ त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. तिळातील पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला आतून पोषण देतात आणि हिवाळ्यात होणारा कोरडेपणा आणि निस्तेजपणा कमी करतात. गुळ रक्त शुद्ध करण्यास मदत करतो, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येते आणि त्वचा निरोगी राहते.
पचनाच्या दृष्टीनेही तिळ-गुळ खूप उपयुक्त आहे. गुळ पचनक्रिया सुधारतो आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतो, तर तिळामधील फायबर पचनासाठी चांगले असते. सणासुदीच्या जेवणानंतर तिळ-गुळ खाल्ल्याने पोट हलके राहते. तसेच तिळ हे कॅल्शियमचा उत्तम शाकाहारी स्रोत असून हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात, विशेषतः महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी.
रिफाइंड साखरेपासून बनवलेल्या अनेक सणासुदीच्या गोड मिठाईंपेक्षा तिळ-गुळ अधिक आरोग्यदायी आहे. गुळामुळे शरीराला हळूहळू ऊर्जा मिळते आणि साखरेची पातळी अचानक वाढत नाही, तर तिळातील प्रथिने आणि चांगले फॅट्स शरीराला पोषण देतात. त्यामुळे तिळ-गुळ हे चवदार तसेच आरोग्यासाठीही पौष्टिक ठरते.
“तिळ-गुळ घ्या, गोड गोड बोला” ही पारंपरिक म्हण आपल्याला नात्यांमध्ये गोडवा वाढवण्याचा संदेश देते. आरोग्याच्या दृष्टीनेही ही म्हण योग्य ऋतूत योग्य अन्न खाण्याचे महत्त्व सांगते. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर येथे आम्ही संस्कृती आणि आधुनिक पोषणशास्त्र यांचा संगम असलेल्या अशा पारंपरिक आहारपद्धती अंगीकारण्याचा सल्ला देतो.
तिळ-गुळ अनेक चवदार प्रकारांमध्ये खाता येतो, जसे की तिळ-गुळाचे लाडू, चिक्की, गरम गुळाच्या पाकात मिसळलेले भाजलेले तिळ, महाराष्ट्रात लोकप्रिय असलेली तिळाची पोळी आणि तामिळनाडूमधील इल्लू उरुंडई. हे पदार्थ प्रमाणात खाल्ले तर सणासुदीच्या आनंदात चवही वाढते आणि आरोग्यही टिकून ठेवते.
या मकर संक्रांतीला, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली प्रेम, गोडवा आणि चांगल्या आरोग्यासह पारंपरिक पद्धतीने सण साजरा करूया.
लेखिका : डायटिशियन स्वाती अवस्थी, चीफ डायटिशियन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर

लग्नपंचमी’ या धमाल विनोदी नाटक चा ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आनंद भवन कोल्हापूर, येथे शुभारंभ

0

मधुगंधा कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी यांचे लेखन व दिग्दर्शन आणि स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर यांचा अभिनय यांसाठी चर्चेत असलेल्या ‘लग्नपंचमी’ या धमाल विनोदी नाटक चा शुभारंभाचा प्रयोग आनंद भवन कोल्हापूर येथे रविवारी ११ जानेवारी २०२६ रोजी
कोल्हापूर : मराठी रंगभूमीवरची दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा कुलकर्णी आणि निपुण धर्माधिकारी यांचे अनुक्रमे लेखन व दिग्दर्शन तसेच स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर यांच्या भूमिका यांमुळे चर्चेत असलेले नवे मराठी नाटक ‘लग्नपंचमी’चा शुभारंभाचा प्रयोग आनंद भवन कोल्हापूर येथे रविवारी ११ जानेवारी २०२६ रोजी पार पाडत आहे. मराठी नाट्यसृष्टीत प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या या नाटकाचे सलग तीन प्रयोग कोथरूड, पुणे येथे पार पडणार असून त्यानंतर मुंबईत ते जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत.
चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील उत्तुंग यश मिळविलेले नाट्यकर्मी या नाटकाच्या माध्यमातून एकत्र येत असल्याने मराठी रंगभूमीवर आणि रसिकांमध्येसुद्धा कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मधुगंधा यांचे लेखन व निर्मिती आणि निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन व जोडीला स्वप्नील जोशी यांचे तब्बल बारा वर्षांनी रंगभूमीवर होत असलेले पदार्पण यामुळे रसिक या नाटकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याशिवाय मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ग्लॅमरस चेहरा अमृता खानविलकर या नाटकाच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर पदार्पण करत आहे. त्यामुळे या नाटकाची चर्चा सध्या रसिकांमध्ये आहे. या माध्यमातून मराठी रंगभूमीला एक ताजेतवाने, मनमोकळे आणि वास्तववादी नाटक लाभणार आहे, हे नक्कीच.‘लग्नपंचमी’ हा लग्नातील विरोधाभास, भावना, विनोद आणि नात्यांचा बहुरंगी प्रवास अत्यंत मनमोकळ्या पद्धतीने मांडणारा नवीन मराठी प्रयोग म्हणून या नाटकाकडे पाहिले जात आहे.
स्वप्नील आणि अमृता यांच्यासह या नाटकात सुनील अभ्यंकर, मधुगंधा कुलकर्णी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. ‘मयसभा’निर्मित ‘लग्नपंचमी’चे नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाश शीतल तळपदे, वेशभूषा पूर्णिमा ओक यांची असून नितीन नाईक सहनिर्माता आहेत. मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर आणि तृप्ती पाटील या नाटकाचे निर्माते आहेत.
“नवरा म्हणे ‘पंच मी’, बायको म्हणे, ‘लग्नपंचमी” या टॅगलाईनसह हे नाटक रंगभूमीवर येत आहे.
“जशी रंगपंचमीला रंगांची उधळण होते, तशीच लग्नात भावभावनांची पंचमी असते. लग्न म्हणजे केवळ एका व्यक्तीशी नातं जोडणं नाही… तर त्याच्या अनेक व्यक्तिमत्त्वांशी नातं जोडणं! हे नाटक प्रेक्षकांना नक्कीच भावेल. त्याच्या पहिल्या प्रयोगाबद्दल आम्हाला सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे आहे,” मधुगंधा म्हणतात.
निपुण धर्माधिकारी सांगतात, “लग्न या विषयावर विनोद न ऐकलेला माणूस दुर्मिळ. ‘लग्नपंचमी’मधील पात्रे सुखी संसाराचा साधा मंत्र वारंवार विसरतात आणि त्यातून जी गंमत जमत घडते ती यात अनुभवायला मिळणार आहे. प्रेक्षकांप्रमाणे आम्हालाही पहिल्या प्रयोगाची उत्सुकता आहे.”
स्वप्नील जोशी म्हणतो, “गेली कित्येक वर्षे मला माझे चाहते जो प्रश्न विचारात होते, की ‘तू नाटकात कधी दिसणार’, त्याचे उत्तर या नाटकाच्या माध्यमातून मिळते आहे. माझे आवडते लेखक, दिग्दर्शक माझ्याबरोबर आहेत आणि माझी मैत्रीण अमृता नाटकात प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे एक उत्तम प्रयोग या निमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.”
अमृता या नाटकाबद्दल बोलताना म्हणाली, “या नाटकाच्या तालमी करताना आम्हाला खूप मजा येते आहे. आमच्या सर्वांचे सूर जुळून आले आहेत आणि ते नाटकामाध्येही दिसून येईल. हे माझे पहिलेच नाटक आहे.
माझ्या आवडत्या नाट्यकर्मींबरोबर काम करायला मिळते आहे. चित्रपट आणि मालिका-शोंप्रमाणे रसिक या नाटकामध्येही मला उत्तम प्रतिसाद देतील याची खात्री आहे.”

0

कोल्हापूर-नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात आणि आनंदात करण्यासाठी प्रेक्षकांवर अफाट प्रेम मिळवलेला कार्यक्रम “महाराष्ट्राची हास्यजत्रा” पुन्हा एकदा हास्याची धमाल घेऊन परत येत आहे. महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या शोचा नवीन सीझन ५ जानेवारीपासून दर सोम आणि मंगळवार रात्री ९ वा. सोनी मराठी वर प्रदर्शित होणार आहे. “आपल्या हसण्याचा नवा रिजन कारण येतोय नवा सिझन!”
नव्या वर्षात नवा सीझन – धमाल दुप्पट, एंटरटेनमेंट दुप्पट! नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला हास्याचा ताजातवाना डोस देण्याची जबाबदारी या शोने पुन्हा एकदा उचलली आहे. गेल्या अनेक सीझन्सपासून कुटुंबांना एकत्र बसून बिनधास्त हसण्याचं कारण देणाऱ्या या शोचे कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक नव्या ऊर्जेसह सज्ज झाले आहेत.
या सीझनमध्ये प्रेक्षकांसाठी खास असे नव्या संकल्पनेवर आधारित नवे स्किट्स, नवीन व्यक्तिरेखा आणि खास नवीन ट्विस्ट आणि अर्थातच प्रेक्षकांच्या मनात घर केलेली मराठमोळी विनोदाची शैली, नवे विषय आणि नव्या प्रहसनासह हा सीझन आणखी भव्य, रंगतदार आणि मनोरंजक ठरेल अशी खात्री प्रेक्षकांना आहे. प्रेक्षकांचा आवडता ओंकार भोजने याने नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पुनरागमन केले होते. त्याच्या नवीन प्रहसनाची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते आणि ततेच नवे विषय घेऊन ओंकार ५ जानेवारीपासून आपल्या भेटीस येत आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. दिवसातील सगळी धावपळ, ताणतणाव विसरून लोक या शोसोबत मनमुराद हसतात. त्यामुळेच नवीन वर्षात शोच्या पुनरागमनाची घोषणा होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण आहे.
या शोमधील कलाकारांची केमिस्ट्री, त्यांचे लयबद्ध पंचेस, लोकजीवनाशी जोडणारे विषय आणि मानवी भावनांना स्पर्श करणारे विनोद हे सगळं असल्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचा पसंतीस पडत आहे. नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात आणि नवीन उत्साह. याच उत्साहाला सलाम करत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा नवा सीझन प्रेक्षकांसमोर येत आहे. या कार्यक्रमाचा प्रयत्न नेहमीच कुटुंबांना एकत्र आणणे, हास्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा आहे. नवीन सीझन प्रेक्षकांना दुप्पट मजा आणि दुप्पट एंटरटेनमेंट देईल.
५ जानेवारीपासून, दर सोम–मंगळवार, रात्री ९ वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – फक्त सोनी मराठीवर! नव्या वर्षाची सुरुवात नव्या हसण्याने करा… कारण येतोय आपल्या हसण्याचं कॉमन रिजन! नव्या वर्षात, नव्या जोमाने सुरु होणार नवा सिझन!

स्कोडा ऑटोच्या २५ व्या वर्धापनदिनी ७२,६६५ कार विकल्या, ज्यामुळे वार्षिक १०७ टक्के नोंदवली वाढ

0

कोल्हापूर, ३ जानेवारी २०२६ : स्कोडा ऑटो ने आतापर्यंतच्या भारतातील प्रवासात २०२५ हे आपले सर्वात निर्णायक वर्ष म्हणून ठरवले. त्यांनी देशात त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात मजबूत विक्री कामगिरीसह आपला २५ वा वर्धापनदिन साजरा केला. या ब्रँडने २०२५ मध्ये ७२,६६५ कारांची विक्री करून वर्ष समाप्त केले, जे २०२४ मध्ये विकलेल्या ३५,१६६ युनिट्सच्या तुलनेत १०७ टक्के वार्षिक वाढ दर्शवते. या असाधारण कामगिरीमुळे २०२५ हे स्कोडा ऑटो इंडियाचे आतापर्यंतचे सर्वात मोठे वर्ष ठरले आहे, जे उत्पादने, बाजारपेठा आणि ग्राहक संपर्कबिंदूंमध्ये वाढलेल्या गतीचे प्रतिबिंब दर्शवते.
२०२५ मध्ये स्कोडा ऑटो इंडियाचे प्रदर्शन स्पष्ट उत्पादन आणि नेटवर्क धोरणावर आधारित होते. कायलॅक हे एक प्रमुख वाढीचे प्रेरक म्हणून उदयास आले, ज्यामुळे ब्रँडची उपलब्धता लक्षणीयरीत्या वाढली, तर कुशक आणि स्लाव्हिया च्या मर्यादित आवृत्त्यांनी संपूर्ण लाइनअपमध्ये मूल्य आणि ताजेपणा वाढविला. कोडियक,ने प्रीमियम एसयूव्ही क्षेत्रात स्कोडाची उपस्थिती अधिक दृढ केली, आणि ऑक्टाव्हिया आर.एस च्या परतीने ब्रँडच्या कामगिरीच्या वारशाला पुन्हा नवजीवन दिले. या वर्षात, स्कोडा ऑटो इंडिया ने २०२१ पासून स्थानिक पातळीवर उत्पादित २००,००० पेक्षा अधिक कार विकण्याचा टप्पा पार केला, तसेच १८३ शहरांमध्ये आपली उपस्थिती ३२५ पेक्षा अधिक ग्राहक संपर्कबिंदूंपर्यंत वाढवली, ज्याद्वारे भारतात युरोपियन अभियांत्रिकीचे लोकशाहीकरण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला बळकटी मिळाली. नेटवर्क विस्ताराचा मोठा भाग भारतातील स्कोडा ऑटो च्या दीर्घकालीन डीलर भागीदारांसह पार पाडण्यात आला आहे, तसेच ग्राहककेंद्रिततेचा सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या नवीन भागीदारांनाही यात समाविष्ट करण्यात आले आहे.