Thursday, March 12, 2026
Home Blog Page 2

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज कोल्हापुरात होणार कार्यकर्त्यांच्या रॅलीद्वारे जल्लोषी स्वागत

0

भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचेआज रविवारी १ मार्च रोजी कोल्हापुरात आगमन होत आहे. यानिमित्त त्यांचे करवीर नगरीत दुचाकी रॅलीने जल्लोषी स्वागत करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला आहे. या संबंधी खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये २ हजार दुचाकी स्वारांची रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक हे गेल्या पाच वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची ओळख दूरवर पसरली आहे. यापुर्वी त्यांनी फॉर्म्युला थ्री या आंतरराष्ट्रीय कार रेसिंगमध्ये उज्वल कामगिरी करत देश-विदेशातील लाखो नागरिकांची मने जिंकली आहेत. सर्वच क्षेत्रात खर्‍या अर्थाने युथ आयकॉन ठरलेल्या कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीवेळी सांगितले होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदी निवड केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान ठेवत, त्यांना युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं. या निवडीनंतर राज्यभरातील नागरिकांकडून कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तसेच राज्यभरातील पक्ष कार्यकर्ते, युवा वर्गात उत्साहाचं वातावरण आहे. युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवार १ मार्च रोजी मुंबईहून कोल्हापुरात आगमन होत आहे. त्यांचे जल्लोषी स्वागत करण्याच्या दृष्टीने आज भाजपा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कृष्णराज महाडिक  यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड होणे हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. पक्षाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ते आपल्या कार्यक्षमतेने योग्य पध्दतीने पार पाडतील, तसेच पक्षाची भूमिका पटवून देणे आणि विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूरच्या परंपरेला साजेल असेच त्यांचे स्वागत व्हावे, अशी अपेक्षा देखील खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी स्वागत रॅलीसंबंधी माहिती दिली. दुपारी ४ वाजता छत्रपती ताराराणी चौकातून कृष्णराज महाडिक यांच्या स्वागत रॅलीला सुरूवात होणार आहे. या रॅलीत २ हजार पेक्षा अधिक दुचाकी स्वारांचा समावेश आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित होईल. त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कृष्णराज महाडिक पक्ष कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमात जनतेने उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे. कृष्णराज महाडिक यांची निवड हा संपूर्ण कोल्हापूरचा सन्मान असल्याचेही विजय जाधव यांनी सांगितले. दरम्यान कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसंच विविध समित्यांवर निवड झालेल्यांचा सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते झाला. यामध्ये विजय जाधव, सुनील वाडकर, हेमंत आराध्ये, आप्पा लाड, प्रा. जयंत पाटील, प्रशांत मोरे, प्रसाद जाधव, तानाजी पाटील यांचा समावेश होता. यावेळी जिल्हा परिषद राजवर्धन नाईक-निंबाळकर, नाथाजी पाटील, गटनेते मुरलीधर जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

ट्रायडंट ग्रूपची भारतभरातील भरती मोहिमेसह विकसित भारत मिशनसोबत वाटचाल

0

रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि राष्ट्र उभारणीवर सातत्याने भर देणाऱ्या या ग्रूपतर्फे ३००० हून अधिक कर्मयोगींची नियुक्ती होणार
कोल्हापूर —-ट्रायडंट लिमिटेड ही ट्रायडंट ग्रूपची मुख्य कंपनी आणि भाारतातील एक आघाडीचा उद्योग समूह आहे. या कंपनीने आपल्या उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भरतीची प्रक्रिया जाहीर केली असून यातून ३००० हून अधिक कर्मयोगींना कामावर घेतले जाणार आहे. कापड उत्पादन क्षेत्रात कौशल्य विकासाला बळकटी आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याच्या राष्ट्रीय धोरणाला अनुसरून ही भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
या घोषणेबद्दल ट्रायडंट ग्रूपच्या ग्रूप सीएचआरओ पूजा बी. लुथ्रा म्हणाल्या, “ट्रायडंटमध्ये आमचा ठाम विश्वास आहे की भारताच्या उत्पादन क्षेत्रातील बदलांचा पाया प्रतिभावान मनुष्यबळात आहे. या मोठ्या प्रमाणावरील भरती प्रक्रिया मोहिमेद्वारे आम्ही आमच्या मनुष्यबळाला बळकटी देत आहोत आणि त्याचवेळी लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज उत्पादन परिसंस्था निर्माण करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला हातभार लावत आहोत. व्यवसायवृद्धीपलिकडे दीर्घकालीन करिअर जोपासणे, समुदायांना बळकटी देणे आणि जागतिक उत्पादन नेतृत्व बनण्याच्या भारताच्या प्रवासात अर्थपूर्ण साह्य देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.”
या उपक्रमाचा भाग म्हणून ऑपरेटर, विणकर, शिवणकाम कारागीर, फिटर, इलेक्ट्रिशियन आणि इतर कौशल्यांसोबतच विविध तांत्रिक आणि कार्यचलन जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव याआधारे निवड केली जाईल. विविध कौशल्य पात्रता आणि अनुभव यासाठी साजेशी अशी मानधन रचना ट्रायडंटने केली आहे. २-३ वर्षांपर्यंतचा अनुभव असणाऱ्या प्रोफेशनल्सना मासिक २५००० रु. मानधन दिले जाईल. तीन ते पाच वर्षांपर्यंतच्या अनुभवासाठी मासिक ३६००० रु. तर पाच ते सात वर्षांचा तज्ज्ञ अनुभव असलेल्यांना मासिक ५०००० रु. मानधन दिले जाणार आहे.
या स्पर्धात्मक पगारासोबतच कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स-लिंक्ड इन्सेंटिव्ह्स म्हणजे कामातील उत्कृष्टतेसाठी प्रोत्साहने, व्हेरिएबल पे, रचनात्मक शिक्षण आणि विकास कार्यक्रम, मोफत हॉस्टेल, कमी दरातील खाद्यपदार्थ, क्रीडा आणि जीम सुविधांची सोय, वैद्यकीय साह्य, प्रॉव्हिडंट फंड आणि ईएसआय सुविधा तसेच विशिष्ट कालावधीने बक्षीस आणि सन्मान असे फायदेही कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ट्रायडंटने आपल्या धोरणात्मक प्रगतीचा मूळ भाग म्हणून मनुष्यबळातील गुंतवणूक कायम राखली आहे. सर्वसमावेशक प्रगती, आपल्या उत्पादन क्षमतांना बळकटी देणे आणि त्याचवेळी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा आणि करिअरमधील प्रगतीचाा मार्ग आखणे ही बांधिलकी या ग्रूपने कायम जपली आहे.

झी5 वर 27 फेब्रुवारी 2026 रोजी क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा प्रीमियर होणार

0

चित्रपटगृहात घवघवीत यश मिळवल्यानंतर मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी या लोकप्रिय मराठी चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर होणार ~
कोल्हापूर: या वर्षाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. आता हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे. मराठी झी5 वर 27 फेब्रुवारी 2026 रोजी या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि क्षिती जोग व विराज गवस, उर्फी काझमी आणि अजिंक्य धमाल यांची निर्मिती केलेला क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा संवेदनशील सामाजिक विषयावरील चित्रपट आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याचा आनंद, जिद्द, शाश्वतता आणि सांस्कृतिक अभिमान यांचा गौरव या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. समकालीन आव्हानांना सामोरे जाताना आपली मुळे आणि ओळख जपणाऱ्या एका मराठी शाळेचा आणि या शाळेशी संबंधित माणसांचा भावनिक प्रवास या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. मराठी भाषा गौरव दिनी या चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर होणार असल्यामुळे या प्रसंगाला अधिक अर्थ प्राप्त झाला आहे. मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व आजही तितकेच कायम असल्याचा संदेश या निमित्ताने अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यात आला आहे.
सचिन खेडेकर, अमेय वाघ, प्राजक्ता कोळी (मराठी चित्रपटातील पदार्पण), क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि कादंबरी कदम अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी असलेल्या या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या मनाला भावला. आता डिजिटल प्रीमियरच्या माध्यमातून तो आणखी अनेकांना प्रेरणा देण्यासाठी सज्ज झाला आहे. सशक्त कथानक, प्रभावी अभिनय आणि मराठी माध्यम शिक्षणसंस्थांना दिलेली भावनिक मानवंदना यामुळे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 पासून केवळ मराठी झी5 वर पाहता येणार आहे.
चित्रपट मराठी झी5वर आणण्याबाबत झी मराठीच्या मुख्य चॅनल अधिकारी आणि मराठी झी5च्या बिझनेस हेड हेमा व्ही. आर. म्हणाल्या, “मराठी भाषा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. पिढ्यान् पिढ्या चालत आलेली संस्कृती, ओळख आणि कथा सांगण्याची परंपरा जपणाऱ्या भाषेचा हा उत्सव आहे. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाच्या मराठी झी5वरील प्रदर्शानाच्या माध्यमातून, या राज्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत मराठी भाषा आणि मराठी शाळांचे महत्त्व अधोरेखित करणारी कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा मान आम्हाला लाभत आहे. झी5मध्ये आमची बांधिलकी केवळ कंटेंट उपलब्ध करून देण्यापुरती मर्यादित नाही. मराठी प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत उत्कृष्ट कथा जाणून घेता येतील, अनुभवता येतील आणि त्यांच्याशी जोडता येईल, असे व्यासपीठ उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. या दिशेने आमचा ‘लँग्वेज पॅक’ उपक्रम हे महत्त्वाचे पाऊल आहे. या उपक्रमामुळे वापरकर्त्यांना मराठीत सहजपणे कंटेंट पाहता येतो आणि भाषा ही अडथळा न ठरता, दर्जेदार मनोरंजनापर्यंत पोहोचण्याचा दुवा ठरते. मराठी कंटेंट इकोसिस्टिम अधिक भक्कम करण्यासाठी आणि प्रेक्षकांना रुचतील अशा अर्थपूर्ण कथा सादर करण्यासाठी आम्ही सातत्याने कटिबद्ध आहोत.”
निर्माती आणि अभिनेत्री क्षिती जोग म्हणाल्या, “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाची निर्मिती एका खोल भावनिक जाणीवेतून झाली आहे. एक निर्माती म्हणून मला नेहमीच असे वाटत आले आहे की सिनेमामध्ये संस्कृती जपण्याची, संवाद सुरू करण्याची आणि आपण कोण आहोत याची आठवण करून देण्याची ताकद आहे. हा चित्रपट अत्यंत प्रेमाने आणि या चित्रपटातून देण्यात आलेल्या संदेशावर असलेल्या ठाम विश्वासातून साकारण्यात आला आहे. मातृभाषेतील शिक्षण हे केवळ भाषेपुरते मर्यादित नसून ओळख, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक सातत्याशी जोडलेले आहे, हा त्याचा गाभा आहे. आता हा चित्रपट चित्रपटगृहांतून मराठी झी5सारख्या जागतिक व्यासपीठावर पोहोचताना पाहणे अत्यंत खास आहे. यामुळे ही कथा काय उपलब्ध असेल, नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि आपल्या परंपरेचा अभिमान निर्माण करताना प्रादेशिक शिक्षणाच्या भविष्यासंदर्भातील वैचारिक संवादालाही चालना मिळेल, अशी मला आशा आहे.”
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी पुढे सांगितले, “हा चित्रपट मराठी माध्यम शाळांचा आणि त्यांच्याशी जोडलेल्या भावनिक विश्वाचा उत्सव आहे. अभिमान, आपलेपणा आणि आपला भाषिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्व या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. चित्रपटगृहांत प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम भारावून टाकणारे होते. आता मराठी झी5च्या माध्यमातून असंख्य घरांपर्यंत आणि मनांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे.”
मुख्य अभिनेता सचिन खेडेकर म्हणाले, “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो आपल्या सामूहिक स्मृतींचे प्रतिबिंब आहे. आपल्यापैकी अनेकांनी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेतले असून, त्या शाळांनी आपली मूल्ये आणि व्यक्तिमत्त्व घडवले आहे. त्या परंपरेचा सन्मान करणाऱ्या या कथेत सहभागी होता आले, याचा मला मनापासून आनंद आहे. आता जगभरातील प्रेक्षकांना हा प्रवास मराठी झी5वर अनुभवता येणार आहे, याबद्दल मी विशेष उत्साहात आहे.”
अमेय वाघ म्हणाले, “या चित्रपटातील भावनिक सच्चेपणा आणि शांत व प्रभावीपणे मांडलेला संदेश मला खूप भावला. मराठी माध्यमाच्या शाळा या केवळ संस्था नसून, त्या मूल्य घडविणाऱ्या, आत्मविश्वासाची जोपासना आणि सांस्कृतिक ओळख मजबूत करणाऱ्या जागा आहेत. हा भावनिक संबंध चित्रपटात अतिशय सुंदररीत्या मांडण्यात आला आहे, तसेच आज या संस्थांना भेडसावणाऱ्या वास्तव अडचणींचाही वेध घेण्यात आला आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक होता. डिजिटल प्रीमियरमुळे हा चित्रपट आणखी अनेक कुटुंबांपर्यंत पोहोचेल आणि आपली भाषा जपणे, प्रगती स्वीकारणे आणि या दोहोंमध्ये समतोल साधणे याबाबत अर्थपूर्ण संवादाला चालना मिळेल, असा मला विश्वास आहे.”
मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना प्राजक्ता कोळी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या, “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणे, हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि समाधान देणारा अनुभव ठरला आहे. मराठी ही माझ्या घरी बोलली जाणारी भाषा आहे. माझे बालपण, आठवणी आणि आपलेपणाची भावना या सगळ्याशी ही भाषा घट्ट जोडलेली आहे. मराठी कथाकथनात एक आपुलकी आणि प्रामाणिकपणा आहे, जो मनाला थेट भिडतो. इतका महत्त्वाचा आणि समकालीन आशय असलेल्या चित्रपटातून मी पहिले पाऊल टाकत आहे, याबद्दल मला विशेष कृतज्ञता वाटते. ओटीटीवरील प्रीमियरमुळे हा चित्रपट आता जगभरातील घराघरांपर्यंत पोहोचणार असून, स्वतःच्या आयुष्याची झलक ज्यात दिसते अशा प्रेक्षकांशी तो जोडला जाईल, याचा मला मनापासून आनंद आहे.”
27 फेब्रुवारी 2026 रोजी झी5वर होणारा क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर चुकवू नका.

एसएमएफजी इंडिया क्रेडिटने “सर्वोत्तम सेवा” उपक्रमांतर्गत पशु विकास दिनाद्वारे 1.55 लाखांहून अधिक ग्रामीण जीवनांवर सकारात्मक प्रभाव साधला

0

मुंबई, 23 फेब्रुवारी 2026: भारतातील अग्रगण्य एनबीएफसींपैकी एक असलेल्या एसएमएफजी इंडिया क्रेडिटने 14 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या प्रमुख पशुधन कल्याण आणि ग्रामीण उपजीविका उपक्रमाचा 8 वा पशु विकास दिन (PVD) यशस्वीरीत्या पूर्ण केला. ‘सर्वोत्तम सेवा: पशु, परिवार आणि प्रगती’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाने पशुधनाचे आरोग्य, कुटुंबाचे कल्याण आणि शाश्वत प्रगती यांना बळकटी देत सर्वांगीण ग्रामीण विकासाबाबत संस्थेची बांधिलकी अधिक दृढ केली.
2014 मध्ये सुरू करण्यात आलेला पशु विकास दिन हा उपक्रम पशुपालन करणाऱ्या व्यक्तींच्या अत्यावश्यक आरोग्य गरजांकडे लक्ष देतो आणि त्यांना मोफत पशुवैद्यकीय सेवा व तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देतो. गेल्या काही वर्षात हा उपक्रम देशातील सर्वात मोठ्या एकदिवसीय पशुधन कल्याण कार्यक्रमांपैकी एक म्हणून विकसित झाला आहे.
एसएमएफजी इंडिया क्रेडिटने 1.55 लाखांहून अधिक जीवनांवर सकारात्मक प्रभाव साधला असून, यात सुमारे 1.4 लाख गुरांवर उपचार तसेच 14,000 हून अधिक लोकांना आरोग्यसेवा सहाय्य देण्यात आले. त्यायोगे 30,000 हून अधिक कुटुंबांना लाभ झाला. हा उपक्रम 16 राज्यांमध्ये आणि एसएमएफजी ग्रामशक्तीच्या 510 शाखांमध्ये राबविण्यात आला. त्यातून कंपनीची ग्रामीण भारतातील सखोल पोहोच दिसून येते.
महाराष्ट्रात पशु विकास दिन 59 ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि 19,000 हून अधिक जनावरांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. त्याचा लाभ 5,200 हून अधिक कुटुंबांना झाला. प्रत्येक शिबिरात स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून मोफत तपासणी, जनावरांसाठी मोफत औषधांचे वितरण व लसीकरण, तसेच दूध देणाऱ्या पाळीव गुरांचे उत्पादन वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन अशा सेवा देण्यात आल्या.
उपक्रमाच्या यशस्वी समारोपाबद्दल भाष्य करताना एसएमएफजी इंडिया क्रेडिटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवी नारायणन म्हणाले, “‘सर्वोत्तम सेवा’ म्हणजे सेवेला तिच्या सर्वोच्च मानकांवर पोहोचवणे. अशा वेळी सह अनुभूती परिणामांशी जोडली जाते आणि हेतू वा उद्दिष्टाचे चीरकालीन बदलामध्ये रुपांतर होते. ग्रामीण भारतात पशुधनाचे आरोग्य, कुटुंबांची सुरक्षितता आणि आर्थिक प्रगती या सगळ्या गोष्टी परस्परांशी घट्ट जोडलेल्या आहेत. जनावरांची काळजी घेऊन, उपजीविका बळकट करून आणि समुदायाच्या स्वास्थ्याला पाठबळ देऊन पशु विकास दिन हा या परिसंस्थेला पोषक बनविण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. या उपक्रमाद्वारे शेती करणाऱ्या कुटुंबांना सक्षम करतील आणि तळागाळातून सर्वसमावेशक विकासाला चालना देतील असे शाश्वत परिणाम निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.”
गेल्या काही वर्षात या उपक्रमाला त्याची पोहोच आणि परिणामकारकता याबद्दल अनेक राष्ट्रीय आणि जागतिक मान्यताप्राप्त सन्मान मिळाले आहेत. PVD ची 2015 मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, 2018 मध्ये बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स, 2019 मध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि 2024 मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड्स युनियनमध्ये देशभरातील सर्वात मोठ्या एकदिवसीय पशुधन सेवा शिबिरांच्या आयोजनाबद्दल नोंद करण्यात आली. या परंपरेला पुढे नेत जेव्हा पशु विकास दिनाने भारतातील विविध ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आलेल्या ‘Largest Cattle Welfare Lesson’ साठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला तेव्हा एसएमएफजी इंडिया क्रेडिटने 2025 मध्ये एक महत्त्वपूर्ण जागतिक टप्पा गाठला. यातून ग्रामीण कल्याण, पशुधन देखभाल आणि समुदाय-आधारित व्यापक विकासासाठी कंपनीची दीर्घकालीन बांधिलकी अधिक दृढ झाली.

लोकमंगल प्रथम कृषी राज्यस्तरीय पुरस्काराचे थाटात वितरण

0

शेतकऱ्यांना आधार आणि सन्मान देण्याची गरज —आ.सुभाष देशमुख,
शेतकऱ्यांनी पिकाच्या उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रित करावे – पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. श्रीरंग लाड, परभणी
शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता आणि त्यांच्या सन्मानासाठी प्रत्येक संस्था आणि राजकीय नेत्यांनी पुढे येण्याची गरज आहे. राज्यामध्ये समृद्ध शेतकऱ्यांचा एक समूह तयार केला, तर राज्य आणि देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करेल. तरुणांनी शेती व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून शेतीचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे तसेच पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी एक दिवस सोलापूर येथे येऊन आमच्या परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची देखील त्यांनी विनंती केली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत लोकमंगल समूहाचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
लोकमंगल समूह आयोजित ,लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालय पूरस्कृत लोकमंगल कृषी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी आमदार देशमुख हे बोलत होते. पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. श्रीरंग लाड परभणी (ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ) व सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विलास शिंदे (नाशिक )हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम ग्रामीण संशोधन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या लोकमंगल कृषी पुरस्काराचे महत्त्व आणि नियोजन सांगितले यंदाचे हे प्रथम वर्ष असून, ज्या शेतकऱ्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्या सर्व शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देत त्यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आणि ही पुरस्काराची परंपरा यापुढेही कायम राहणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी बोलताना पद्मश्री श्रीरंग लाड म्हणाले की, शेतकऱ्याने पारंपरिक पद्धतीने पिकाची लागवड न करता आधुनिक पद्धतीने लागवड करून सतत देखभाल करणे गरजेचे आहे. कपाशीची लागवड केल्यानंतर त्या झाडाला किती फांद्या आहेत.? किती बोंड लागलेत.? त्याचे वजन किती? .त्यातून मिळणारा कापूस किती.? या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून जमिनीकडच्या बाजूला येणाऱ्या फांद्या कट केल्या तर झाडाच्या वरील इतर फांद्याच्या बोंडाचे वजन वाढते, पर्यायी उत्पादनामध्ये वाढ होते. एकरी पाच ते सहा क्विंटल कापूस निर्माण करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये १२ ते १८ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते. अशा छोट्या, छोट्या गोष्टीची दक्षता घेऊन शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविणे गरजेचे असल्याचे मतही लाड यांनी व्यक्त केले.
यावळी नाशिकचे सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड चे डॉ. विलास शिंदे, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर राजेंद्र दहातोंडे, ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सचिन फुगे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजित कुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख, संस्थेच्या सचिवा डॉ. अनिता ढोबळे, प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, प्राचार्य सागर महाजन प्राचार्य डॉ. राणी मेत्रे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गायकवाड, प्राचार्य डॉ. बाळासाहेब बिराजदार, अजित राठोड, सचिन परमशेट्टी, सलमान शेख, प्रथमेश बाळपुरी, संकेत बिराजदार व सर्व महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

पर्नोड रिकार्ड इंडिया कडून महाराष्ट्रात सीग्राम्स एक्सक्लेमेशन! चा शुभारंभ

0

भारताचे पहिले मल्टी-कॅटेगरी ब्रँडेड हाऊस; एकाच प्रभावी ब्रँडखाली पाच स्पिरिट्स प्रकार
कोल्हापूर : पर्नोड रिकार्ड इंडिया ने महाराष्ट्रात सीग्राम्स एक्सक्लेमेशन! या नव्या ब्रँडचा शुभारंभ जाहीर केला आहे. गेल्या 30 वर्षांतील कंपनीची ही सर्वात महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण घोषणा मानली जात आहे. सिग्राम्स एक्सक्लेमेशन! हा भारतातील एकमेव असा ब्रँड पोर्टफोलिओ आहे, ज्यामध्ये एकाच ब्रँडअंतर्गत पाच वेगवेगळ्या स्पिरिट्स प्रकारांचा समावेश आहे, व्हिस्की, व्होडका, जिन, रम आणि ब्रँडी. हे सर्व प्रकार प्रीमियम अॅडमिक्स सेगमेंटमध्ये समान किंमत श्रेणीत उपलब्ध असतील.
हा ब्रँड एंट्री-लेव्हल प्रीमियम किंमत श्रेणीतील मोठ्या संधीच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक पद्धतीने सादर करण्यात आला असून, भारतातील वेगाने वाढणाऱ्या तरुण प्रौढ ग्राहकवर्गाला लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. या ब्रँडचा लक्ष्यित ग्राहकवर्ग 26 ते 30 वर्षे वयोगटातील आहे. हे ग्राहक सहजपणे आपली वेगळी ओळख निर्माण करणारे असून, वेगळेपणाकडे आकर्षित होतात. ते आपल्या मित्रपरिवारासोबत गटांमध्ये जोडलेले असतात आणि जेव्हा मिश्र गटांमध्ये एकत्र येतात, तेव्हा प्रत्येकाची पेयाची आवड वेगवेगळी असते. त्यामुळे व्हिस्कीबरोबरच जिन, व्होडका, रम आणि ब्रँडी यांसारख्या इतर श्रेणींची मागणीही वाढत असल्याचे दिसून येते.
दरवर्षी 20 दशलक्षांहून अधिक ग्राहक कायदेशीर मद्यपान वयोगटात प्रवेश करत असताना, एक्सक्लेमेशन! सहज परवडणाऱ्या प्रीमियम किंमत श्रेणीत दर्जेदार स्पिरिट्सची अपूर्ण राहिलेली बाजारपेठेतील गरज पूर्ण करण्याचे काम करते. “इट्स टाइम फॉर एक्सक्लेमेशन!” या ब्रँडच्या संकल्पनेद्वारे, भारतातील नव्या पिढीच्या ग्राहकांसाठी साध्या क्षणांना असामान्य अनुभवांमध्ये रूपांतरित करणारा प्रेरक घटक म्हणून या ब्रँडची मांडणी करण्यात आली आहे.
पर्नोड रिकार्ड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीन टुबूल म्हणतात, “गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून पर्नोड रिकार्ड इंडिया देशातील प्रीमियम स्पिरिट्स उद्योगाच्या घडणीत अग्रस्थानी राहिले आहे. एक्सक्लेमेशन! हा ब्रँड ग्राहकांच्या सखोल समजुतीतून तयार करण्यात आला असून, मिश्र गटातील सामाजिक प्रसंगांसाठी प्रीमियम दर्जा आणि विविधतेची अपेक्षा ठेवणाऱ्या भारतातील नव्या पिढीच्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे. एक्सक्लेमेशन! म्हणजे धाडस, नवकल्पना आणि उत्सवाचा एकत्रित अनुभव आहे. या लाँचद्वारे प्रीमियम अॅडमिक्स सेगमेंटमध्ये व्हिस्की, व्होडका, जिन, रम आणि ब्रँडी या पाच स्पिरिट्स श्रेणींना एकत्र आणणारा आमचा पहिला एकात्मिक ब्रँड सादर करण्यात आला आहे, जो येत्या दशकात उद्योगाच्या वाढीपेक्षा अधिक वेगाने प्रगती करेल, अशी अपेक्षा आहे. एक्सक्लेमेशन! हा केवळ एक ब्रँड नसून, उत्कृष्ट चवीसाठी जागतिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या सर्वोत्तम भारतीय स्पिरिट्सचे मिश्रण आहे.”
एक्सक्लेमेशन! ची “वर्ल्ड क्राफ्ट फॉर एक्सेप्शनल टेस्ट” ही बीटीएल संकल्पना अतिशय परवडणाऱ्या किंमत श्रेणीत उत्कृष्ट चव देण्याच्या तत्त्वावर आधारित आहे. एकात्मिक ब्रँड अंतर्गत पाचही श्रेणींचा समावेश असून, प्रत्येक उत्पादन वेगळ्या डिझाइन, चव आणि स्थानिकतेसह उत्कृष्ट मूल्य देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. व्हिस्की ही स्पेसाईड येथील स्कॉच मॉल्ट्सपासून तयार करण्यात आली असून, ड्युअल कास्कमध्ये मॅच्युअर करून भारतीय ग्रेन स्पिरिट्ससोबत ब्लेंड केल्यामुळे मऊ आणि समृद्ध अनुभव मिळतो. ब्रँडी ही भारतीय आणि फ्रेंच द्राक्षांच्या उत्तम मिश्रणातून तयार करण्यात आली असून, फ्रेंच लिमुझिन कास्कमध्ये मॅच्युअर केल्यामुळे परिष्कृत चव प्राप्त होते. रममध्ये भारतीय गुळापासून तयार केलेली रम आणि एज्ड जमैकन स्पिरिट यांचे मिश्रण असून, कॉपर स्टील पॉट्समध्ये तयार केल्यामुळे ठसठशीत चव मिळते. व्होडका भारतीय टेरोइरच्या वैशिष्ट्यांसह तयार करण्यात आली असून, रशियन मूनस्टोन तंत्रज्ञानाद्वारे ट्रिकल फिल्ट्रेशन केल्यामुळे अप्रतिम शुद्धता मिळते. जिनमध्ये जर्मनीतील जुनिपर बेरीजच्या नैसर्गिक स्वादासोबत भारतीय बोटॅनिकल्सचे मिश्रण करून सात वेगवेगळे फ्लेवर्स तयार करण्यात आले आहेत.
एक्सक्लेमेशन! हा केवळ एक ब्रँड नाही, तर धाडस, नवकल्पना आणि उत्सवाचे प्रतीक आहे. त्यावरील ठळक “!” चिन्ह हे फक्त डिझाइनचा भाग नसून एक मानसशास्त्रीय संकेत आहे, कारण “!” हे चिन्ह दिसल्यावर मानवी मेंदू स्वाभाविकपणे थांबून पुन्हा एकदा पाहण्याची प्रतिक्रिया देतो. त्यामुळे गर्दीच्या रिटेल वातावरणात एक्सक्लेमेशन! ला वेधक आणि वेगळेपणाची ओळख मिळते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित युवाची ए4 लाँगबुक्स आणि मराठी ‘सुविचार’ पेन्सिली महाराष्ट्रभरातील दुकानांत उपलब्ध

0

महाराष्ट्र,:महाराष्ट्रभरात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर स्टेशनरी ब्रँड ‘युवा’तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शालेय साहित्याची विशेष मालिका सादर करण्यात आली आहे. सतराव्या शतकातील मराठा राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्मृतीत अत्यंत महत्त्वाचे असून, या उत्पादनांच्या माध्यमातून परिचित ऐतिहासिक संदर्भ थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतात.
शाळांमधील विविध वयोगटांच्या गरजा लक्षात घेऊन ही श्रेणी साकारण्यात आली आहे. मोठ्या आकाराची ए4 लाँगबुक्स माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरांवरील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतात, तर पेन्सिली सर्वच वयोगटांतील विद्यार्थ्यांच्या वापरासाठी अनुकूल आहेत.
या सर्व ए4 लाँगबुक्सवर छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रसंग आणि प्रतीकांचे चित्रात्मक सादरीकरण करण्यात आले आहे. तसेच या पेन्सिलींवर छोटे मराठी सुविचारही देण्यात आले आहेत, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचे वर्णन करणारे सुविचारही समाविष्ट आहेत.
दैनंदिन शालेय साहित्यामध्ये प्रादेशिक आणि सांस्कृतिक संदर्भ समाविष्ट करण्याचा वाढता ट्रेंड या उपक्रमातून दिसून येतो. समाज माध्यमांचा प्रभाव अधिकाधिक जागतिक स्वरूपाचा होत असताना, विद्यार्थ्यांच्या रोजच्या आयुष्यात सांस्कृतिक ओळख जपली जावी, यासाठी शिक्षक आणि पालकांकडून अशा उपक्रमांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
युवा स्टेशनरीचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर अभिजीत सान्याल म्हणाले की, आधुनिक विचारसरणी आणि सांस्कृतिक संदर्भ यांचा संगम साधण्याचा हा प्रयत्न आहे. “विद्यार्थी दररोज या वस्तूंचा वापर करतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या नेतृत्वाशी जोडलेल्या शिस्त, धैर्य यांसारख्या गुणांची त्यांना सतत आठवण करून देण्याचे काम या वस्तू करू शकतात,” असे ते म्हणाले.
विक्रेत्यांच्या मते, अशा संकल्पनांवर आधारित उत्पादनांना सहसा जयंतीदिनी किंवा विशेष प्रसंगांच्या काळात अधिक मागणी असते. मात्र, विद्यार्थ्यांना ती आवडल्यास संपूर्ण शैक्षणिक वर्षात त्यांची विक्री सुरू राहते. नवीन शैक्षणिक सत्र जवळ येत असल्याने, ही उत्पादने ‘बॅक-टू-स्कूल’ खरेदीचा भाग ठरण्याचीही शक्यता आहे.

मुथूट एक्झिमने महाराष्ट्रातील कोल्हापुरात जिल्ह्यात सुरु केले आहे गोल्ड पॉईंट सेंटर

0

कोल्हापूर, १७ फेब्रुवारी २०२६: १३८ वर्षांच्या परंपरेचा वारसा असलेल्या मुथूट पप्पाचन ग्रुप (मुथूट ब्लू)च्या मौल्यवान धातू विभाग असलेल्या मुथूट एक्झिम (प्रा.) लि. यांनी कोल्हापुरातील त्यांच्या नवीन गोल्ड पॉइंट सेंटरच्या भव्य उद्घाटनाची अभिमानाने घोषणा केली आहे.ही नवीन शाखा मुथूट गोल्ड पॉइंट, दुकान क्र. १, तळमजला, भानू कृपा अपार्टमेंट, बाबुजमाल रोड, पुष्कराज चौक, कोल्हापूर, महाराष्ट्र – ४१६००२ येथे सुरू करण्यात आली आहे.या उद्घाटनासह भारतातील ही ८८वी शाखा असून महाराष्ट्रातील ९वी शाखा ठरली आहे.
कोल्हापुरात येथे सुरु करण्यात आलेल्या या गोल्ड पॉइंट सेंटरमुळे स्थानिक लोकांच्या आर्थिक जीवनात आमूलाग्र बदल घडणार आहेत. यामुळे त्यांना सोन्याच्या स्वरूपातील मालमत्ता विकण्याची सुविधा मिळणार आहे आणि या विश्वासार्ह व पारदर्शक केंद्राद्वारे आर्थिक सेवा अधिक सुलभ होतील. मुथूट एक्झिमचे गोल्ड पॉइंट सेंटर्स पारदर्शकता आणि ग्राहकांच्या विश्वासाप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ओळखले जातात. या केंद्रांवर, ग्राहक त्यांच्या जुन्या आणि वापरलेल्या सोन्याच्या वस्तूंचे योग्य आणि अचूक मूल्य मिळेल, या खात्रीने विकू शकतात. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जाते, ज्यामुळे ग्राहकाला स्वतः मूल्यांकन प्रक्रिया पाहता येते. १०,००० रुपयांपर्यंतच्या सोन्यासाठी त्वरित रोख भरणा केला जातो, मात्र त्यापेक्षा जास्त रकमेसाठी आयएमपीएस, एनईएफटी किंवा आरटीजीएस द्वारे प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे एक सुरळीत आणि विश्वासार्ह व्यवहाराचा अनुभव ग्राहकांना मिळतो.
मुथूट पप्पाचन ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि मुथूट एक्झिमचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस मुथूट म्हणाले, “समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि प्रगतिशील दृष्टिकोनासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात आमचे गोल्ड पॉइंट नेटवर्क विस्तारताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या नव्या केंद्राच्या माध्यमातून कोल्हापूरच्या नागरिकांसाठी वैज्ञानिक आणि पारदर्शक सोन्याच्या पुनर्वापराची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा आमचा उद्देश आहे.मुथूट एक्झिममध्ये आम्ही असा विश्वास ठेवतो की जबाबदार पुनर्वापरामुळे व्यक्तींना त्यांच्या सोन्याचे खरे मूल्य प्राप्त होते आणि त्याचबरोबर भविष्यासाठी शाश्वत व नैतिक पर्यावरणीय व्यवस्था उभारण्यास मदत होते. विश्वास आणि नवकल्पना यांचा संगम घडवणे हा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे, आणि हा विस्तार त्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
मुथूट एक्झिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) केयूर शाह म्हणाले, “कोल्हापुरातील आमच्या गोल्ड पॉइंट सेंटरचे उद्घाटन हे भारतभर जबाबदार सोन्याच्या पुनर्वापराला सुलभ करण्याच्या आमच्या ध्येयातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. संस्कृती आणि आधुनिक विकासाचा अनोखा संगम असलेले कोल्हापूर हे सोन्याच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि विश्वास दृढ करण्यासाठी योग्य वातावरण प्रदान करते.या केंद्राच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना त्यांच्या निष्क्रिय पडून असलेल्या सोन्याचे सुरक्षित, वैज्ञानिक आणि शाश्वत प्रक्रियेद्वारे आर्थिक मूल्यात रूपांतर करण्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. लोक आणि पर्यावरण या दोघांच्याही हिताचा विचार करून उपाययोजना निर्माण करणे हा आमचा सातत्यपूर्ण भर राहिला आहे.”

*शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट करण्याची क्षमता एआयमध्ये : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांचे उदगार

0

*शहरातील सुविधा ग्रामीण भागात मिळाल्या तर लोकांचे स्थलांतर थांबेल आणि शेतीची प्रगती होईल : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांचे उदगार*

*भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यास चार दिवसात झाला गर्दीचा उच्चांक*
*शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील लोकांनी दिला प्रचंड प्रतिसाद चार दिवसात सुमारे १८ कोटींची उलाढाल*
*किशोर वसंत चव्हाण मुंबई कांदिवली यांचा पाच फुटाचा इगवाना सरडा हा बेस्ट ऑफ द शो ठरला आहे. तर श्री कुलदीप सिंह बळीराम लाड रा माळसोना ता,जिल्हा परभणी यांचा लाल कंधारी वळू हा चॅम्पियन ऑफ द शो ठरला आहे*
कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना प्रगतशील करण्याचे काम सरकार करत आहे.शहरातील सुविधा ग्रामीण भागात मिळाल्या तर लोकांचे स्थलांतर थांबेल आणि शेतीची प्रगती होईल.शिवाय एआय ही जादू आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट करण्याची क्षमता एआय मध्ये असल्याचे उद्गार
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभप्रसंगी काढले.
यावेळी बोलताना ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी धनंजय महाडक यांनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यासपीठ उभे केल्याचे सांगितले.केंद्र व राज्य सरकार शेतीच्या विकासासाठी काय करत हे भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून समोर आले असून ज्या पद्धतीने ऊसापासून साखर निर्माण करण्यासाठी साखर कारखाने ४० वर्षापूर्वी सुरू झाले त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या विविध पिकांसाठीही वेगवेगळी सुविधा गाव पातळीवर सुरू होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी बोलताना खासदार धनंजय महाडिक दरवर्षी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन भरवतात आणि नवनवीन माहिती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात या प्रदर्शनाचा लाभ अनेक शेतकरी घेतात. मात्र शेतकऱ्यांनी याचा उपयोग आपल्या शेतीसाठी करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादनावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले. आज शेतकरी मातीचे परीक्षण करत नाहीत त्यामुळे पिकांना याचा फटका बसतो तर शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी खूप काही करायचे आहे. अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. कोल्हापूर हा कृषीप्रधान जिल्हा आहे याठिकाणी ऊस पिक मोठ्या पद्धतीने घेतले जाते शेतकऱ्यांनी इतरही पिके घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी प्रास्ताविकपर बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केलेल्या टिपू सुलतान बद्दलच्या वक्तव्याचा ही खरपूस समाचार घेतला.आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याशी इथले स्थानिक नेते काँग्रेसचे नेते आणि खासदार सहमत आहेत का याचं त्यांनी जाहीर रित्या उत्तर द्याव असे आव्हान ही खासदार महाडिक यांनी यावेळी दिले. आणि जोपर्यंत सपकाळ माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना कोल्हापुरात प्रवेश दिला जाणार नाही असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतीसाठी विविध योजना आणल्या जात आहेत किसान योजना आहे याचा १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे. साडेचार लाख करोड रुपये या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले गेले आहेत असे सांगितले अनेक योजनांच्या माध्यमातून २७ प्रकारचे व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे.शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोअरेजसाठी ९० टक्के सबसिडी दिली गेली आहे त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले.
गेली १८ वर्ष भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती दिली जात आहे. परिपूर्ण असे प्रदर्शन भरविले जात आहे. कृषी प्रदर्शनात रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती असे सांगितले.
समारोपप्रसंगी विशेष अतिथी म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर श्री. उदय धांतुडे ,उपमहापौर अनिल डाळ्या यांची उपस्थिती होती.त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
आ.अशोकराव माने,शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाडगे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक बी न्यूज चे कार्यकारी संचालक पृथ्वीराज महाडिक, भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक आदींची उपस्थिती होती.यावेळी आभार पृथ्वीराज महाडिक यांनी मानले.
मेरी वेदर मैदानावर १३ ते १६ फेब्रुवारी भरविण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या चारही दिवशी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी लहान मुलांसह आबालवृद्धांसह शेतकऱ्यांचा आणि लोकांचा झाला होता गर्दीचा उच्चांक. पाच फूट सरडा आणि एकाच मैदानावर तेरा वेळा रेकॉर्ड केलेला हिंदकेसरी हरण्या बैल,अन्य जनावरे पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह लोकांनी प्रचंड गर्दी चार दिवस केली होती.शतकवीर हिंदकेसरी शर्यतीमधील हरण्याबैल, तीन वर्षाची राधा गाय,मारवाडी जातीचा स्टेलियन गब्बर नावाचा काळा रंगाचा घोडा,३५० किलोचे डुक्कर १२० आणि ९० किलो वजनाचे बोकड,३३ इंचाचा घोडा,एक टनाचा लाल कंधारी बैल,मुरा रेडे,१० डझनाचा केळी घड,११ किलोचा भोपळा,१० किलोचा कोहळा प्रदर्शनाचे आकर्षण ठरले.
चार दिवसात शेती साठी आवश्यक साहित्याची नोंदणी व खरेदी मोठ्या प्रमाणात झाली.याचबरोबर शेती साहित्य,बी.बियाणे यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली गेली आहे.
चार दिवसात सुमारे १५ कोटींची उलाढाल ही झाली.तर तिला बचत गटाच्या माध्यमातून २५ लाखाची उलाढाल झाली. बेगम राजू मुजावर यांनी बिर्याणी मधून १ लाख १० हजार रुपये विक्री केली, अमृता उमेश भोकरे यांनी १ लाख रुपयाचे मासे विकले तर ज्योती धावडे यांनी ५४ हजार ७०० रुपयांची विक्री केली. कल्याणी भिमगोंडा यांनी ४२ हजार रुपयांचे वस्तू विकल्या. या सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. तर प्रगतशील शेतकरी सर्जेराव धनवडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
*किशोर वसंत चव्हाण मुंबई कांदिवली यांचा पाच फुटाचा इगवाना सरडा हा बेस्ट ऑफ द शो ठरला आहे. तर श्री कुलदीप सिंह बळीराम लाड रा माळसोना ता,जिल्हा परभणी यांचा लाल कंधारी वळू हा चॅम्पियन ऑफ द शो ठरला आहे*
*शतक वीर हिंदकेसरी शर्यतीमधील *हरण्याबैल*
*तीन वर्षाची राधा गाय आकर्षण*मारवाडी जातीचा स्टेलियन गब्बर*
*भारतातील सर्वात मोठा अमेरिकन सरडा प्रदर्शनाचे खास आकर्षण चंदगड येथील ७५ हजार रुपये किंमतीचे ३५० किलो वजनाचे ब्रीड लार्ज व्हाईट मेल आणि फिमेल(पिग डुक्कर) पन्हाळा येथील ९० किलोचा बोकड भादोले येथील १२० किलो वजनाचा बिटल बोकड,७५० किलो वजनाचा एचएफ अडीच वर्षाचा कागल चिमगाव येथील सचिन लाड यांचा रेडा, साडेसात लाख रुपये किंमत असलेला चॉकलेटी रंगाचा अडीच वर्षाचा एक टन लाल कंधारी बैल प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.आजरा दरडेवाडी येथील पाच वर्षाचा सर्जा काळा बैल,दहा महिन्याचा गीर बैल,१४ महिन्याचे ब्ल्यू गोल्ड मकाऊ पोपट (पॅरोट) हरियाणाचा मुरा जातीचा युवराज रेडा,साडेचार वर्षाचा २८ महिन्याचा गडहिंग्लजचा सुलतान रेडा, हसुर बुद्रुक येथील २८ महिन्याचा एक टन वजनाचा मुरहा रेडा, १४७० किलो वजनाचा ४ वर्षाचा गोलू मुरा रेडा,८०० किलो वजनाचा जाफराराबादी पंढरपूर रेडा, खास आकर्षण ठरले. आहेत.याचबरोबर चार फूट लांब शिंगाचा पाच वर्षाचा पंढरपूर जातीचा भैरु रेडा, राशीवडे बुद्रुक येथील काँकरेज वळू,नरेंद येथील २ वर्षे १ महिना २ दाती स्टूलवर उभा राहणारा मुरा रेडा स्थानिक भाज्यासह विदेशी भाजीपाला पहावयास मिळाला.भाज्यांमध्ये फळ,वांगी,टोमॅटो,शेंग,मिरची,दुधी भोपळा,मोठा भोपळा,हळद,धान्य,लसूण, शिरोळ कोंडीग्रे येथील हिरवी कारली, शिरोळ कुटवाड येथील काजल काकडी, ऑर्किड फुले, झेंडू फुले, गलांडा, शामली फुले, बालिंगा येथील जरबेरा आदींचा समावेश आहे. तर शंभर रुपये एक ऊस असलेला देशी शिवकालीन काळा ऊस खास आकर्षण ठरले.
सुळकुड येथील मुलगोंडा पाटील यांचा अकरा किलोचा वजनाचा भोपळ, हालोंडी येथील पाच किलो वजनाचा (पपनस ईडलिंबू), शिरोळ येथील १५ किलो वजनाची हळद गठ्ठा,२५ किलो वजनाचा दहा डझनाचा देशी केळीचा घड, एवढे येथील वळीवडे येथील अर्धा किलोची कांदा पात, भोगमवाडी येथील यांच्या शेतातील एक फुटाचे रताळ, मांजरी गेळा येथील एक किलोचे वांगे, महाकवे येथील दीड किलो वजनाचे रताळ, हुपरी येथील प्रकाश अण्णा माळी यांचा अकरा किलोचा भोपळा, जंगलात उगवणारी रानकेळी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले पहावयास चार दिवस शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.
प्रदर्शनामध्ये अमेरिकन शेळ्या, बोकड, तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी झाल्या होत्या. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई आल्या आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी आले आहेत.शिवाय कागल मधील हैदर अली यांचा ब्रँड ब्रिडिंग फार्म मांडण्यात आली आहे.
ज्यात अमेरिकन बेंटम बोकड पांढरे रंगीबेरंगी पक्षी, कबुतरे, ब्लॅक ऍस्ट्रोलॉक कोंबडी, जापनीज बेन्टेस कोंबडी, कडकनाथ चिनी कोंबडी, कोलंबियन ब्रम्हा कोंबडा, पर्शियन मांजर, रनर बदक, मरकवी बदक, घुस, हेडलॉक पांढरे उंदीर, हंगस्टर पक्षी, राजहंस,लवबर्ड,पोपट कागल येथील अमेरीकन १८ इंचाची बिल्टन बोकडे, टर्की कोंबडी बदक व्हाईट पीकॅन बदक, हेमस्टर जातीचे पांढरे उंदीर,हेज टॉग पांढरा उंदीर,टर्की कोंबडा,प्रदर्शनाचे आकर्षण ठरली.एक टनाचा कानाच्या पुढे वळलेल्या शिंगांचा जाफराबादि सुलतान रेडा आदी जनावरे प्रदर्शनात आकर्षण ठरली.
*आज झालेली व्याख्याने*
१६ फेब्रुवारी रोजी भाजीपाला सुधारित लागवड व परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. श्री. भरत तुकाराम पाटील भाजीपाला पैदासकर व प्रमुख फलोद्यान विभाग महात्मा फुले विद्यापीठ राहुरी, जि. अहिल्यानगर हे विचार व्यक्त करणार आहेत. तर कृषी विभागाच्या विकासात्मक योजना व वापर या विषयावर तालुका कृषी अधिकारी करवीरचे श्री. युवराज पाटील आणि कृषी अधिकारी कागलचे श्री. शेखर थोरात यांनी मार्गदर्शन कृषी विभागाच्या विविध योजना सोबत पिक उत्पाद वाढीबाबत तंत्रज्ञान व ऊस पाच ट व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांचा डिजीटल मित्र महा विस्तार एआय या मोबाईल अँप्लिकेशन बद्दल माहिती सांगितली.
भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर, वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या प्रदर्शनासाठी प्रा. जे.पी.पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ.सुनील काटकर, सर्जेराव धनवडेदादा, अशोक सिधनेर्ले,दिलीप दळवी,सुजित चव्हाण ,किरण रणदिवे, डॉ.निवृत्ती पाटील, डॉ.सुखदेव साबळे, डॉ.अंकुश काळे,. डॉ.अजय कुरणे,डॉ.किरण उनउणे,प्रा.ऋतुराज चव्हाण, डॉ.मंगलसिंग जाधव,डॉ. वर्षा मिंड कृषी विभागाची टीम आदींनी परिश्रम घेतले त्यांचा सन्मान करण्यात आला.
भीमा कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात दोन दिवसात विक्री झालेला शेतमाल :
१) सेंद्रीय गूळ : एक किलोचे एक पंधराशे रवे
२) इंद्रायणी तांदूळ : ४९०० kg
३) आजरा घनसाळ : २७०० kg
४) इंद्रायणी कणी : २२०० kg
५) रत्नागिरी २४ : ४८०० kg
६) सेंद्रीय हळद : ७०० kg
७) नाचणी : ९५० kg
८)हात सडीचा काळा तांदूळ १५०० kg
*जनावरांचा निकाल*

सहा दाती खिलार गाय गट

१)कृष्णात श्रीमंत मस्के रा. नांदगाव (प्रथम क्रमांक)

२)ऋषिकेश उत्तरेश्वर कोळी रा. गादेगाव ता.पंढरपूर (द्वितीय क्रमांक)

३)चंद्रकांत अशोक शिराळे रा. तळंदगे ता. हातकणंगले (तृतीय क्रमांक)

जुळूक गाय गट

१)रियांश रवी गवळी राहणार करवीर कोल्हापूर

मुरा रेडा गट

१) मनोज आण्णासो जगताप
रा. कवठे बुलंद तालुका शिरोळ (प्रथम क्रमांक)

२) स्वप्निल अशोक पोवार रा. हसुर चंपू (द्वितीय क्रमांक)

३)सोहेल सय्यदअली पटेल रा.बसतवडे तालुका कागल (तृतीय क्रमांक)
जाफराबादी रेडा
१)फिरोज सरदार शेख रा. करनूर ता. काग
पंढरपुरी रेडा गट
१) संजय अर्जुन जाधव रा. येलूर ता. वाळवा (प्रथम क्रमांक)
२).अमर आप्पाजी केंबळेकर रा. खुपिरे ता. करवीर (द्वितीय क्रमांक)
देवणी वळू गट
१)सौरभ परशराम सापनर रा. लिंबोटी ता. लोहा जिल्हा नांदेड
गिर वळू गट
१)कस्पक रघुनाथ सामंत रा. दरडेवाडी ता. आजरा जिल्हा कोल्हापूर (प्रथम क्रमांक)
२)बाळकृष्ण श्रीपाद सामंत रा. दरडेवाडी ता. आजरा जिल्हा कोल्हापूर (द्वितीय क्रमांक)
कंकरेच वळू गट
१)प्रविण शिवाजी गायकवाड रा.राशिवडे ता. राधानगरी
काल कंधारी वळू गट
१)कुलदिप बळीराम लाड रा. माळसुना ता. जिल्हा परभणी (प्रथम क्रमांक)
२)बळीराम मारुती लाड रा. माळसुळा ता. जिल्हा परभणी (द्वितीय क्रमांक)
३)परशराम नागनाथ सापनर रा.लिंबोटी ता. लोहा (तृतीय क्रमांक)
लाल कंधारी गाय गट
१) आनंदा नागुराव डोईफोडे रा. लिंबोटी ता.लोहा (प्रथम क्रमांक)
२)संभाजी पंडित गाडगीळ रा. लिंबोटी ता. लोहा द्वितीय क्रमांक
मुरा रेडी गट
१)शिवनाथ लक्ष्मण जगताप
बिटल बोकड
१)नितीन अनिल वड्ड राहणार भादोले (प्रथम क्रमांक)
२)प्रकाश आनंदराव घारगे राहणार गुडे तालुका पन्हाळा (द्वितीय क्रमांक)
अमेरिकन बॅनटम बोकडगट
१)अबुजर इनायन समाधान राहणार कागल
अमेरिकन बॅनटम शेळी गट
१अबुजर इनायन समाधान राहणार कागल
वराहगट
१)चंद्रकांत रामू ओऊळकर
वनराज कावेरी कुकुट पक्षी
१ अंडी उबवणी केंद्र
विविध प्रकारचे पक्षी
१)हैदरअली समाधान
लहान छोटे विविध प्राणी
१)खादिजा हैदरअली समाधान रा.कागल
अश्वगट
१) मंदार संजय इंगवले (प्रथम क्रमांक)
२)सुचित शिवकुमार हिरेमठ (द्वितीय क्रमांक)
३)संजय भगवान चौगुल (तृतीय क्रमांक)
४)असिफ अल्लबक्ष बागवान (तृतीय क्रमांक)
भीमथडी अश्वगट
१)कार्तिक दिपक बादूंग
एच एफ गाय गट
१)विनायक भारत जंगम
२)भारत सदाशिव जंगम
जर्सी वळू गट
१)संदिप सात्ताप्पा एकल
जर्सी गाय गट
१)मंदाकिनी सदाशिव जंगम (प्रथम क्रमांक)
२)अरविंद निवृत्ती यादव (द्वितीय क्रमांक)
पुंगनूर गाय गट
१)सुचित शिवकुमार हिरेमठ
इगवाना सरडा
१)किशोर चव्हाण
*भीमा कृषी प्रदर्शन कृषी विभाग अंतर्गत घेण्यात आलेल्या पीक स्पर्धा मध्ये*
१)रोहन प्रमोद चौगुले आणि शिवाजी धोंडीराम तोडकर यांच्या केळी घडास विभागून प्रथम क्रमांक
२) महादेव शामराव पाटील चिकू क्रिकेट बॉल ( द्वितीय क्रमांक) ३)जयसिंग गजानन जाधव कसबा बावडा सुपारी मंगला (तृतीय क्रमांक)
अन्नधान्यांमध्ये
१)कृष्णात केरबा भोगम (नाचना) (प्रथम क्रमांक)
२)नारायण मारुती पाटील (स्वीट कॉर्न)(द्वितीय क्रमांक)
३)वसंत रामचंद्र यरोळकर नाचना (तृतीय क्रमांक)
फुले मध्ये
विनायक आनंदा कांबळे जरबेरा (प्रथम क्रमांक) अनिता अनंत उठवणेकर आर्किटस फुले (द्वितीय क्रमां) युवराज बाळू पाटील झेंडू फुले (तृतीय क्रमांक)
भाजीपाला कंदवरनीय मसाला
१)विनायक नरहरी कोचरे हळद (प्रथम क्रमांक)
२)शितल शिवराज धर्माधिकारी सेंद्रिय आले (द्वितीय क्रमांक)
३) विकास अशोक गोडसे सेंद्रिय हळद (तृतीय क्रमा
भाजीपाला
१)दिलीप बाबागोंडा पाटील कोबी (प्रथम क्रमांक)
२)प्रदीप येलगुंडा खोत (वांगी) (द्वितीय क्रमांक)
३)दीपक मारुती डाफळे (ढोबळी मिरची) (तृतीय क्रमांक)
कंदवरनीय भाजीवाला
१)सागर रावसो मिनचे (बीट प्रथम क्रमांक
२) मधुकर केरबा भोगम (रताळी द्वितीय क्रमांक)
३) प्रकाश शामराव पडवळ (बीट) (तृतीय क्रमांक)
मसाले पीक
१) आप्पान्ना निजलिंग गुरव आप्पा (शंकेश्वरी मिरची) प्रथम क्रमांक
२)सुनील रावसो पाटील (कांदा विजय क्रमांक)
३) विठ्ठल मारुती पाटील (लसुन तृतीय क्रमांक)
१)प्रकाश अण्णा माळी (भोपळा प्रथम क्रमांक)
२)मलगोंडा भिमगोंडा पाटील (भोपळा विभागून प्रथम क्रमांक) ३)शंकर खोत दुधी (भोपळा द्वितीय क्रमांक)
४) अमोल दादासो चौगुले (कोहळा तृतीय क्रमांक)
मॉडेल कृषीमध्ये
१)तालुका कृषी अधिकारी करवीर (प्रथम क्रमांक)
२)प्रकल्प संचालक आत्मा द्वितीय क्रमांक
३)तालुका कृषी अधिकारी (हातकणंगले तृतीय क्रमांक)
भिमा कृषी पशु पक्षी प्रदर्शन
भिमा आदर्श गुणवंत पशुवैद्यक पुरस्कारमध्ये
१))मा. डॉ. श्री. यशवंत वाघाय सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,गोदिंया
२)मा. डॉ. श्री. मंगलसिंह जाधव
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,यवतमाळ
३)मा. डॉ. श्री. किरण उणउने
पशुधन विकास अधिकारी,कोल्हापूर
४)मा. डॉ. श्री. आनंदा पोवार
पशुधन विकास अधिकारी,गगनबावडा
५)मा. डॉ. श्री. बाबासो पुजारी
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,करवीर
६)मा. डॉ. श्री. सुखदेव साबळे
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,चंदगड
७)मा. डॉ. श्री. अंकुश काळे
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,राधानगरी
८)मा. डॉ. श्री. प्रमोद झेंडे
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,शिरोळ
९)मा. डॉ. श्री. भास्कर कुराडे
पशुधन पर्यवेक्षक,करवीर
१०)मा. डॉ. श्री. शशिकांत काटकर
पशुधन पर्यवेक्षक,हातकणंगले
११)मा. डॉ. सौ. गितांजली येरुडकर,पशुधन पर्यवेक्षक,राधानगरी,
१२)मा. श्री. संतोष टिपुगडे वर्णउपचारक,राधानगरी. आदींचा सन्मान करण्यात आला.
*भिमा कृषी पशु पक्षी प्रदर्शन २०२६ पशुसंवर्धन संयोजक कमिटी मधील*
डॉ. अजित शिंदे, डॉ. सुनिल काटकर,डॉ. निवृत्ती पाटील,श्री. विलास इंगवले,श्री. सर्जेराव धनवडे
श्री. दिलीप दळवी,श्री.सुजित चव्हाण,श्री. अशोक सिध्दनेर्ले,श्री. किरण रणदिवे,
श्री. किरण सुर्यवंशी आदींचा सन्मान करण्यात आला.

*भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तिसऱ्या दिवशी मेरी वेदर मैदानावर अफलातून गर्दीचा महापूर,तीन दिवसात सुमारे १२ कोटींची उलाढाल

0

*आज होणार समारोप,प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस शेतकऱ्यांनी भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन*
*एकाच मैदानावर तेरा वेळा रेकॉर्ड केलेला हिंदकेसरी हरण्या बैल,अन्य जनावरे पाहण्यासाठी लोकांची अफलातून गर्दी*
*३५० किलोचे डुक्कर १२० आणि ९० किलो वजनाचे बोकड,३३ इंचाचा घोडा,एक टनाचा लाल कंधारी बैल,मुरा रेडे प्रदर्शनाचे आकर्षण*
*१० डझनाचा केळी घड,११ किलोचा भोपळा,१० किलोचा कोहळा आकर्षण*
कोल्हापूर/प्रतिनिधी : मेरी वेदर मैदानावर भरविण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी लहान मुलांसह आबालवृद्धांनी आणि शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केली होती.पाच फूट सरडा आणि एकाच मैदानावर तेरा वेळा रेकॉर्ड केलेला हिंदकेसरी हरण्या बैल,अन्य जनावरे पाहण्यासाठी लोकांची अफलातून गर्दी,महापूर मेरी वेदर मैदानावर लोटला होता.याचबरोबर शतकवीर हिंदकेसरी शर्यतीमधील हरण्याबैल, तीन वर्षाची राधा गाय,मारवाडी जातीचा स्टेलियन गब्बर नावाचा काळा रंगाचा घोडा,३५० किलोचे डुक्कर १२० आणि ९० किलो वजनाचे बोकड,३३ इंचाचा घोडा,एक टनाचा लाल कंधारी बैल,मुरा रेडे,१० डझनाचा केळी घड,११ किलोचा भोपळा,१० किलोचा कोहळा प्रदर्शनाचे ठरत आहेत आकर्षण.
कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून दरवर्षी आम्हा शेतकऱ्यांना नवनवीन कृषी विषयक माहिती.शासनाच्या वतीने वेगवेगळ्या शेतीसाठी उपयुक्त असलेल्या प्रकल्पांची माहिती मिळते.शिवाय विविध शेती तज्ञ यांनी शेतीविषयक मार्गदर्शन केले ज्याद्वारे आम्हाला शेतीची माहिती मिळाली असल्याचे भेट देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.तीन दिवसात शेती साठी आवश्यक साहित्याची नोंदणी झाली आहे.याचबरोबर शेती साहित्य,बी.बियाणे यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली गेली आहे.
आज तिसऱ्या दिवशी सुमारे १२ कोटींची उलाढाल ही झाली आहे.आज १६ फेब्रुवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने दुपारी ४ वाजता सांगता समारंभ व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
आज कृषी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावे असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
भीमा कृषी प्रदर्शनात रिंगन सोहळा आयोजित पार पडला. ज्यामध्ये गोमाता पूजन माजी खासदार अण्णासाहेब जोले,खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी परीक्षक डॉ.सुनील काटकर, डॉ.शिंदे,किरण रणदिवे,इंद्रजीत जाधव आदी उपस्थित होते.
आज प्रदर्शनस्थळी खासदार धनंजय महाडिक,युथ आयकॉन कृष्णराज महाडिक,सी चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक,भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक,भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष सौ.अरुंधती महाडिक,माजी खासदार अण्णासाहेब जोले यांनी भेट दिली.आजही शेतकऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीने पाच हजार शेतकऱ्यांना मोफत झुणका भाकरीचे वाटप करण्यात आले.
आज १५ रोजी नृत्य मल्हार हा कार्यक्रम झाला.तर १६ फेब्रुवारी रोजी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे.
शतक वीर हिंदकेसरी हरण्या बाई पाहण्यासाठी गर्दी*
*शतक वीर हिंदकेसरी शर्यतीमधील *हरण्याबैल* कृषी *प्रदर्शनात दाखल झाला असून त्याला पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मेरी वेदर मैदानावर प्रचंड अफलातून गर्दी केली आहे. लोकांची भिंत म्हणून संबोधला जाणारा हा बैल जुना बुधवार पेठ येथील संदीप विश्वास पाटील यांचा आहे.तो अकरा वर्षाचा असून त्याने शंभर वेळा एक नंबरची बक्षीस मिळवली आहेत. १३९ शर्यतीमध्ये भाग घेतलेला आहे.१७ वेळा दोन नंबरचा मानकरी ठरला आहे. तो रोज पाच लिटर दूध पितो व भरडा हिरवी वैरण खातो. वजनाने ६०० किलोचा असून त्याची शिंगे साडेतीन फूट आहेत. तर लांबी ७ फुट आहे. याच्याशिवाय दुसरा बैल शर्यतीत कोणताच नाही महाराष्ट्रात आणि कर्नाटकात ज्यावेळी मोठी शर्यत असते त्यावेळी त्याचा सहभाग असतो. दोन ट्रॅक्टर आणि पाच मोटरसायकल त्याने जिंकल्या आहेत.एकसंभा येथे १७ लाखाचे बक्षीस मिळविलेले आहे. एकाच मैदानावर त्याने तेरा वेळा रेकॉर्ड केलेला आहे.*
*तीन वर्षाची राधा गाय आकर्षण*
सचिन शिवकुमार हिरेमठ यांची तीन वर्षाची राधा गाय प्रदर्शनाची आकर्षण ठरत असून या गाईचे दूध तिरुपती देवाच्या अभिषेकासाठी वापरले जाते. आतापर्यंत तीन वेळा भीमा कृषी प्रदर्शनाची आकर्षण ठरली आहे. चेतक नावाचा तीन वर्षाचा घोडा भीमा कृषी प्रदर्शनात चॅम्पियन ठरला आहे.चार वर्षे सहा महिने वयाचा पंजाबी काठेवाडी गुलाबी नूखरा जातीचा आहे.
*मारवाडी जातीचा स्टेलियन गब्बर* नावाचा काळा रंगाचा घोडा चार वर्षाचा असून त्याची उंची ६२ इंच आहे. तर ७ फूट लांबी आहे. त्याच्या तोंडावर पंचकल्यांनी पांढरा नाम असून अमोल भास्कर हे त्याचे मालक आहेत.त्यांच्याकडे तो तीन वर्षापासून आहे. हरभरा उडीद डाळ, चार लिटर दूध सकाळी संध्याकाळी पितो त्याची किंमत दीड लाख रुपये इतकी आहे. अकलूज मध्ये चॅम्पियन ठरला असून वेगवेगळ्या शेती प्रदर्शनामध्ये त्याचा सहभाग असतो.
*खास आकर्षण जनावरे पाहण्यासाठी लोकांची गर्दी*
*भारतातील सर्वात मोठा अमेरिकन सरडा प्रदर्शनाचे खास आकर्षण चंदगड येथील ७५ हजार रुपये किंमतीचे ३५० किलो वजनाचे ब्रीड लार्ज व्हाईट मेल आणि फिमेल(पिग डुक्कर) पन्हाळा येथील ९० किलोचा बोकड भादोले येथील १२० किलो वजनाचा बिटल बोकड,७५० किलो वजनाचा एचएफ अडीच वर्षाचा कागल चिमगाव येथील सचिन लाड यांचा रेडा, साडेसात लाख रुपये किंमत असलेला चॉकलेटी रंगाचा अडीच वर्षाचा एक टन लाल कंधारी बैल प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.आजरा दरडेवाडी येथील पाच वर्षाचा सर्जा काळा बैल,दहा महिन्याचा गीर बैल,१४ महिन्याचे ब्ल्यू गोल्ड मकाऊ पोपट (पॅरोट) हरियाणाचा मुरा जातीचा युवराज रेडा,साडेचार वर्षाचा २८ महिन्याचा गडहिंग्लजचा सुलतान रेडा, हसुर बुद्रुक येथील २८ महिन्याचा एक टन वजनाचा मुरहा रेडा, १४७० किलो वजनाचा ४ वर्षाचा गोलू मुरा रेडा,८०० किलो वजनाचा जाफराराबादी पंढरपूर रेडा, खास आकर्षण आहेत.याचबरोबर चार फूट लांब शिंगाचा पाच वर्षाचा पंढरपूर जातीचा भैरु रेडा, राशीवडे बुद्रुक येथील काँकरेज वळू,नरेंद येथील २ वर्षे १ महिना २ दाती स्टूलवर उभा राहणारा मुरा रेडा खास आकर्षण*
*देशी विदेशी भाजीपाला,फळे व फुलांचा समावेश*
स्थानिक भाज्यासह विदेशी भाजीपाला पहावयास मिळत आहे.भाज्यांमध्ये फळ,वांगी,टोमॅटो,शेंग,मिरची,दुधी भोपळा,मोठा भोपळा,हळद,धान्य,लसूण, शिरोळ कोंडीग्रे येथील हिरवी कारली, शिरोळ कुटवाड येथील काजल काकडी, ऑर्किड फुले, झेंडू फुले, गलांडा, शामली फुले, बालिंगा येथील जरबेरा आदींचा समावेश आहे. तर शंभर रुपये एक ऊस असलेला देशी शिवकालीन काळा ऊस प्रदर्शनात विक्री होत आहे.*
*तर भाज्यांमध्ये सुळकुड येथील मुलगोंडा पाटील यांचा अकरा किलोचा वजनाचा भोपळ, हालोंडी येथील पाच किलो वजनाचा (पपनस ईडलिंबू), शिरोळ येथील १५ किलो वजनाची हळद गठ्ठा,२५ किलो वजनाचा दहा डझनाचा देशी केळीचा घड, एवढे येथील वळीवडे येथील अर्धा किलोची कांदा पात, भोगमवाडी येथील यांच्या शेतातील एक फुटाचे रताळ, मांजरी गेळा येथील एक किलोचे वांगे, महाकवे येथील दीड किलो वजनाचे रताळ, हुपरी येथील प्रकाश अण्णा माळी यांचा अकरा किलोचा भोपळा, जंगलात उगवणारी रानकेळी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.*
प्रदर्शनात अशी आहेत जनावरे,पक्षी*
प्रदर्शनामध्ये अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी झाल्या आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई आल्या आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी आले आहेत.शिवाय कागल मधील हैदर अली यांचा ब्रँड ब्रिडिंग फार्म मांडण्यात आली आहे.
ज्यात अमेरिकन बेंटम बोकड पांढरे रंगीबेरंगी पक्षी, कबुतरे, ब्लॅक ऍस्ट्रोलॉक कोंबडी, जापनीज बेन्टेस कोंबडी, कडकनाथ चिनी कोंबडी, कोलंबियन ब्रम्हा कोंबडा, पर्शियन मांजर, रनर बदक, मरकवी बदक, घुस, हेडलॉक पांढरे उंदीर, हंगस्टर पक्षी, राजहंस,लवबर्ड,पोपट कागल येथील अमेरीकन १८ इंचाची बिल्टन बोकडे, टर्की कोंबडी बदक व्हाईट पीकॅन बदक, हेमस्टर जातीचे पांढरे उंदीर,हेज टॉग पांढरा उंदीर,टर्की कोंबडा,प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. एक टनाचा कानाच्या पुढे वळलेल्या शिंगांचा जाफराबादि सुलतान रेडा आदी जनावरे प्रदर्शनात आली आहेत. ती आकर्षण ठरत आहेत.
आज १६ फेब्रुवारी रोजी होणार समारोप*
प्रदर्शनाचा भीमा कृषी प्रदर्शनाचा आज सोमवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता सांगता व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. यासाठी विशेष अतिथी म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर श्री. उदय धांतुडे ,उपमहापौर अनिल डाळ्या यांची उपस्थिती असणार आहे. तर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. चंद्रदीप नरके, आ.अशोकराव माने,आ. शिवाजीराव पाटील, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाडगे, माजी आ. संजयबाबा घाडगे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक, बी न्यूज चे कार्यकारी संचालक पृथ्वीराज महाडिक, भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे
*आज झालेली व्याख्याने*
आज १५ फेब्रुवारी रोजी प्रा.ऋतुराज सयाजीराव चव्हाण तज्ञ व तांत्रिक सल्लागार यांनी सेंद्रिय शेतीसाठी अचूक निविष्ठांचा वापर काळाची गरज विषयावर विचार मांडताना
शेण खताविना शेती पिकेना
माती मायेची सुपीकता जाईना
दहा गाड्यांच्या एवजी एकही ना
तुका म्हणे जमिनीचा कस जाईना
अशी तुकाराम महाराजांची ओवी सांगत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध निविष्ठा त्याचबरोबर नैसर्गिक दृष्ट्या उपलब्ध होणाऱ्या व कमी खर्च असणाऱ्या तसेच रासायनिक खतांवरील खर्च कमी करणाऱ्या सेंद्रिय निविष्ठां संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.तसेच शेतीकडे व्यापारी दृष्टिकोन शाश्वत पर्यावरणाशी निगडीत उत्पादनविषयी मार्गदर्शन केले.
माजी मृदा शास्त्रज्ञ व प्रमुख प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र कोल्हापूरचे प्रा. डॉ जे.पी.पाटील यांनी सध्या बिघडलेल्या जमिनीचे आरोग्य सुस्थितीत आणण्यासाठी जमीन व्यवस्थापन विशेष करून सेंद्रिय घटकांचा वापर पिकांची फेरपालट व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. श्री. सॅम लुद्रिक (पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र शासन) यांनी दुधाळ जनावरांची निगा व संगोपन या विषयावर विचार मांडताना शेतीशी निगडीत दुय्यम दुग्ध व्यवसाय विषयी मार्गदर्शन करताना दुधाळ जनावरांची निगा निवड व खाद्य व्यवस्थापन तसेच लसीकरण याविषयी सखोल मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असून लंपीची लस शासनाच्या मार्फत तयार करण्यात आली आहे.तिचा उपयोग आपल्या जनावरांसाठी करावा असे आवाहन शेतकऱ्यांना केले.यावेळी युवा प्रगतशील शेतकरी युवराज तुकाराम माने राहणार कोपार्डे यांचा सन्मान करण्यात आला.
*उद्या १६ रोजी होणारी व्याख्याने*

१६ फेब्रुवारी रोजी भाजीपाला सुधारित लागवड व परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. श्री. भरत तुकाराम पाटील भाजीपाला पैदासकर व प्रमुख फलोद्यान विभाग महात्मा फुले विद्यापीठ राहुरी, जि. अहिल्यानगर हे विचार व्यक्त करणार आहेत. तर कृषी विभागाच्या विकासात्मक योजना व वापर या विषयावर तालुका कृषी अधिकारी करवीरचे श्री. युवराज पाटील मार्गदर्शन करणार आहेत आणि तालुका कृषी अधिकारी कागलचे श्री. शेखर थोरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
*कृषी विभागाची माहिती*
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्माच्या वतीने शेती उपयुक्त डेमो या ठिकाणी सादर करण्यात आले आहेत.ज्यामध्ये सुपर केन नर्सरी, क्षारपड जमीन सुधारणा मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, आत्माच्या वतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या अंतर्गत योजनेची उद्दिष्टे योजना काय आहे याचा प्रकल्प या ठिकाणी सादर करण्यात आला आहे. गोशाळा कशी असावी याची प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या अंतर्गत ठिबक सिंचन, आंबा लागवड,गांडूळ युनिट दाखविण्यात आले आहेत. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, कीटकनाशके फवारताना काय करू नये याबाबत माहिती देण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजना यामध्ये महाडीबीटी अर्ज एक योजना अनेक काय आहेत हे मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर मातीचा नमुना कसा घ्यावा अन्नपौष्टिक तृणधान्य याबाबत माहिती मांडण्यात आली आहे.ड्रोन माध्यमातून शेती कशी करावी याचीही माहिती दिली जात आहे.कीटकनाशके फवारताना कामगंध सापळा पक्षी थांबे रोपांत द्वारे ऊस लागवड, पौष्टिक तृणधान्याच्या पासून तसेच प्रदर्शनात पाचट व्यवस्थापन ए आय तंत्रज्ञानचा वापर करून स्मार्ट शेती उपयोग, ड्रोनद्वारे फवारणी सेंसरचा वापर कृत्रिम रेतन ए.आय किटचा वापर याबाबत प्रदर्शनात मार्गदर्शन होत आहे.
भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर, वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. आज शेवटचा दिवस प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.प्रदर्शनासाठी या प्रदर्शनासाठी प्रा. जे.पी.पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ.सुनील काटकर, सर्जेराव धनवडेदादा, अशोक सिधनेर्ले,दिलीप दळवी,सुजित चव्हाण ,किरण रणदिवे, डॉ.निवृत्ती पाटील, डॉ.सुखदेव साबळे, डॉ.अंकुश काळे,. डॉ.अजय कुरणे,डॉ.किरण उनउणे,प्रा.ऋतुराज चव्हाण, डॉ.मंगलसिंग जाधव,डॉ. वर्षा मिंड कृषी विभागाची टीम आदी परिश्रम घेत आहेत.
भीमा कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात दोन दिवसात विक्री झालेला शेतमाल :

१) सेंद्रीय गूळ : एक किलोचे एक पंधराशे रवे
२) इंद्रायणी तांदूळ : ४१०० kg
३) आजरा घनसाळ : २५०० kg
४) इंद्रायणी कणी : १७०० kg
५) रत्नागिरी २४ : ४६०० kg
६) सेंद्रीय हळद : ६०० kg
७) नाचणी : ९०० kg
८)हात सडीचा काळा तांदूळ १२०० kg