*भारतातील सर्वात मोठा अमेरिकन आठ वर्षाचा साडेपाच फुटाचा इग्वाना (सरडा,चार वर्षाचा आणि पाच महिन्याचा सरडा आकर्षण आहे. हे तीन सरडे प्रदर्शनात आणण्यात आला असून हे तीन सरडे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहेत. पहिल्याच दिवशी सरडा पाहण्यासाठी लोकांनी, शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. प्रदर्शनात आलेला हिरवा सरडा चार महिन्याचा असून त्याची लांबी दोन फूट आहे चार वर्षानंतर तो चार फुटाचा आणि आठ वर्षानंतर तो सहा फुटाचा होतो. यात पाच महिन्याचा सरडा पाव किलो वजनाचा आहे.चार वर्षाचा सरडा चार फुटाचा ९ किलो वजनाचा आहे. तर आठ वर्षाचा सरडा पाच फुटाचा असून त्याचे वजन २२ किलो आहे. हे पूर्ण शाकाहारी असून भोपळा, कोथिंबीर, मेथीची भाजी, आणि अन्य भाजीपाला खातात. दिवसातून दोन वेळा सकाळी दहा वाजता आणि रात्री आठ वाजता त्यांना खाद्य पदार्थ द्यावे कोल्हापूर मधील किशोर वसंत चव्हाण सध्या मुंबईत राहत असून त्यांनी मुंबई येथे हे सरडे लहानपणापासून पाळले आहेत. या सरड्यांना मालकाची बोलीभाषा समजते हे सरडे विषारी नसून ते वर्षातून दोन वेळा ३५ अंडी घालतात. यांचे रक्त थंड असल्याने त्यांना उष्णतेची गरज असते.*
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भिमा कृषी व पशु प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादनावर भर द्यावा भीमा कृषी प्रदर्शनात खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलेट ची संकल्पना आणली आहारामध्ये मिलेटचा वापर करावा खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
आधुनिक तंत्रज्ञानाचा ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर शेतकऱ्यांनी शेतीमध्ये करावा खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
भारतातील सर्वात मोठा पाच फुटाचा इग्वाना (सरडा) कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी गर्दी
कोल्हापूर/प्रतिनिधी : कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान ऑरगॅनिक शेतीवर भर कसा द्यावा यावर वेगवेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन नेहमीच भीमा कृषी प्रदर्शनात मिळते शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी शेतीवर अधिक भर द्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलेटची संकल्पना आणली आहारामध्ये मिलेटचा वापर होणे गरजेचे असल्याचे मतही खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी व्यक्त केले.
याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर शेतकऱ्यांनी शेतीमध्ये करावा खासदार धनंजय महाडिक यांनी आवाहन केले.
खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा भिमा कृषी व पशु प्रदर्शनाचे आज फीत कापून थाटात उद्घाटन संपन्न झाले.यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादनावर द्यावा असे सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी शेतीमध्ये नवे प्रयोग, बदल स्वीकारण्यासाठी आवश्यक माहितीपूर्ण असणाऱ्या भीमा कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन भीमा कृषी प्रदर्शनात उद्घाटनप्रसंगी केले. शेतकरी म्हटले की नुकसान आणि कृषी क्षेत्र म्हटले की तोटा हे नेहमी ऐकत आलो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत आलो आहे. यामुळेच गेल्या अठरा वर्षांपूर्वी भीमा कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी सुरू केले. आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन माहिती तंत्रज्ञान याची माहिती मिळते. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न दरवर्षी असतो. नवनवीन बी बियाणे, ड्रोन टेक्नॉलॉजी, एआय चा वापर करून सेंद्रिय शेती कशी करावी,यावर भर दिला जातो. असे परिपूर्ण प्रदर्शन गेले अठरा वर्षे सातत्याने भरवले जात आहे असे सांगितले.
राज्यात केंद्रात महायुतीची सत्ता आली तसेच आता कोल्हापूर जिल्ह्यात देखील महायुतीने चांगली कामगिरी केलेली आहे.महायुतीच्या माध्यमातून भरपूर प्रकल्प कोल्हापूरला मिळणार आहेत तसेच कोल्हापूर मुंबई विमानसेवा दोन वेळा सुरुवात झाली असून कोल्हापूर मिरज दुहेरी मार्गासाठी ९८४ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम कोल्हापुरात होणार आहे तसेच सर्किट बेंचचा पाठपुरावा केल्याने आज कोल्हापूरला सर्किट बेंच मिळाले आहे अजून नवनवीन अशी १५ कार्यालय कोल्हापुरात येणार असून रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरचा चेहरा मोहरा महायुतीच्या काळात बदलला जाणार आहे अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
तर महायुतीचा महापौर म्हणून आपण जबाबदारी स्वीकारली असून, कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांचं मार्गदर्शन आणि खासदार धनंजय महाडिक, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून विविध प्रकल्प राबवून येत्या दोन वर्षात शहराचा कायापालट करू, अशी ग्वाही महापौर रूपाराणी निकम यांनी दिली.
कोल्हापूर महापालिकेच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला.भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी आभार मानले.
उद्घाटनप्रसंगी माजी आमदार महादेवरावजी महाडिक, उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून महापौर सौ. रूपाराणी निकम,उपमहापौर श्री अक्षय जरग यांची उपस्थिती उपस्थिती होती.भाजपा प्रदेश सचिव श्री.महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. नाथाजी पाटील, गोकुळ संचालक अमरीश घाडगे, भागीरथी महिला संस्था अध्यक्षा मा. सौ. अरुंधती महाडिक,नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,महापालिका नगरसेवक आदींची उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार देण्यात आले.भीमा कृषी महिलांसाठी जिजामाता पुरस्कार देण्यात आले. यामध्ये मुक्काम पोस्ट नांदोली येथील सौ विद्या बळीराम पाटील, कागल येथील सौ वंदना दिनेश मुसळे, जळगाव येथील सौ.उषा विठ्ठल पाटील, मळगे खुर्द येथील सौ प्रज्वला पांडुरंग आडमूळ, मौजे सांगाव येथील सौ जयश्री आप्पासाहेब पाटील यांचा समावेश आहे.तर भीमा कृषी शेतीभूषण पुरस्कार मध्ये महाळुंगे येथील संभाजी शिवाजी चौगुले, काळजवडे येथील श्री रामचंद्र धोंडीराम पाटील, पोरले येथील मी बाजीराव दगडू साळुंखे, नुल येथील श्री प्रकाश बाबुराव सावंत आदिना पुरस्कार देण्यात आले. आदर्श शेतकरी पुरस्कार चौडाळ येथील श्री युवराज विष्णू पाटील, अकलूर येथील श्री अनिकेत साताप्पा माने, स्वानापुर अमोल आनंदराव पाटील, सरवडे येथील श्री जयसिंग अनंत पाटील, इंजोळे येथील मानसिंग राजाराम पाटील, जाधववाडी येथील रघुनाथ पांडुरंग जाधव आदींना पुरस्कार देण्यात आले.तर युवा शेतकरी पुरस्कार सुळकुड येथील प्रदीप यलगोंडा खोत, वाळकेवाडी येथील किशोर संभाजी कुंभार, तिरपन येथील श्री शरद बाजीराव पाटील यांना पुरस्कार देण्यात आले.
*भारतातील सर्वात मोठा अमेरिकन सरडा प्रदर्शनाचे खास आकर्षण*
*भारतातील सर्वात मोठा अमेरिकन आठ वर्षाचा साडेपाच फुटाचा इग्वाना (सरडा,चार वर्षाचा आणि पाच महिन्याचा सरडा आकर्षण आहे. हे तीन सरडे प्रदर्शनात आणण्यात आला असून हे तीन सरडे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहेत. पहिल्याच दिवशी सरडा पाहण्यासाठी लोकांनी, शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. प्रदर्शनात आलेला हिरवा सरडा चार महिन्याचा असून त्याची लांबी दोन फूट आहे चार वर्षानंतर तो चार फुटाचा आणि आठ वर्षानंतर तो सहा फुटाचा होतो. यात पाच महिन्याचा सरडा पाव किलो वजनाचा आहे.चार वर्षाचा सरडा चार फुटाचा ९ किलो वजनाचा आहे. तर आठ वर्षाचा सरडा पाच फुटाचा असून त्याचे वजन २२ किलो आहे. हे पूर्ण शाकाहारी असून भोपळा, कोथिंबीर, मेथीची भाजी, आणि अन्य भाजीपाला खातात. दिवसातून दोन वेळा सकाळी दहा वाजता आणि रात्री आठ वाजता त्यांना खाद्य पदार्थ द्यावे कोल्हापूर मधील किशोर वसंत चव्हाण सध्या मुंबईत राहत असून त्यांनी मुंबई येथे हे सरडे लहानपणापासून पाळले आहेत. या सरड्यांना मालकाची बोलीभाषा समजते हे सरडे विषारी नसून ते वर्षातून दोन वेळा ३५ अंडी घालतात. यांचे रक्त थंड असल्याने त्यांना उष्णतेची गरज असते.*
शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी १८ वे भव्य कृषी व पशूप्रदर्शन मेरी वेदर मैदानावर १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भरविण्यात आले आहे. प्रदर्शनामध्ये अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी झाल्या आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई आल्या आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी आले आहेत.
या प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात आहे यामध्ये प्रॉम्प्ट इक्विपमेंट प्रा. लि., कर्नाटका सोप ॲन्ड डिटर्जंट लि., डेक्कन फार्फ ईक्विपमेंट प्रा. लि, टाटा सोलर, ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट्स, लक्ष्मी पंप्स प्रा. लि., शेरखान लिमिटेड, चितळे उद्योग समूह, राजाराम बापू सहकारी दूध संघ, सावंत ऑरगॅनिक फार्म, डीजे कोकोनट फॉर्म प्रा. लिमिटेड अश्या भरपूर नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत तसेच कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांनी देखील या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कंपन्यांची उत्पादने पाहावयास व खरेदी करता येणार आहेत.
प्रदर्शनात तांदूळ महोत्सव अंतर्गत विविध प्रकारचा तांदूळ उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी चोवीस, भोगावती, इंद्रायणी तसेच बाजरी, नाचणी, संद्रिय गुळ, हळद आदींची उपलब्धता करण्यात आली आहे.ज्याची पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात विक्री ही झाली आहे.आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जात आहे.शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती,मत्स्यपालन कसे करावे याची प्रात्यक्षिके, ए. आय तंत्रज्ञान याची
दिली जात आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती याठिकाणी दिली जात आहे. विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी-बियाणे पाहावयास मिळत आहे. तरी शेतकऱ्यासाठी परिपूर्ण असणारे हे भीमा कृषी व पशू प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मा. सौ. अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना दरवर्षी भिमा कृषी प्रदर्शनात संधी मिळते,यावर्षीही दोनशे बचत गट आपली विविध प्रकारची उत्पादने या स्टॉलद्वारे लावली आहेत. महिलांनी बनविलेल्या उत्पादनाला भिमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून थेट बाजारपेठ मिळवून दिली गेली आहे.याचबरोबर प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना चार दिवस तज्ञ व्यक्तींकडून शेतीविषयक माहिती दिली जाणार आहे आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत ज्याद्वारे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे.
प्रदर्शनामध्ये उद्या दुपारी १२ ते ४ या वेळेत क्षारपड जमिनीची एकात्मिक सुधारणा नवी दिशा या विषयावर तर डॉ. संग्राम धर्माजी काळे सह प्राध्यापक, मृदा, शास्त्र ,कृषी संशोधन केंद्र, कसबा डिग्रज, जि.सांगली यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. आणि आंबा लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर डॉ. केशव हरी पुजारी माजी प्रमुख फलोद्यान सहयोगी अधिष्ठाता डॉ.बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे मार्गदर्शन करणार आहेत.आज कराओके गीत गायन स्पर्धा हा सांस्कृतिक कार्यक्रम याठिकाणी पार पडला.
तर १४ फेब्रुवारी रोजी राधानगरी येथील गंध महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे. यावर्षीच्या भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर, वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. प्रदर्शन चार दिवस सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.याचबरोबर लाईव्ह डेमॉस्ट्रेशन पहाण्यास मिळत आहे.
चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या या कृषी व पशू प्रदर्शनाचा कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे आज होणार पालकमंत्री ना.प्रकाशजी आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन
१३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी वेदर मैदान येथे प्रदर्शन आयोजित
चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात शेतीविषयक नामांकित कंपन्यांचा सहभाग, शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल,
१२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय असणार खास आकर्षण
कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे भिमा कृषी व पशु प्रदर्शन १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी १८ वे भव्य कृषी व पशूप्रदर्शन मेरी वेदर मैदानावर भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर पालकमंत्री ना.श्री. प्रकाशजी आबिटकर यांच्या हस्ते आज शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.यावेळी अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सांगली ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
या प्रदर्शनात खास आकर्षण कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय, अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण असणार आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी होणार आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई येणार आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी होणार आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी असणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफसो, माजी आमदार महादेवरावजी महाडिक यांच्या हस्ते विविध पुरस्कार वितरण होणार आहेत.उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून महापौर सौ. रूपाराणी निकम,उपमहापौर श्री अक्षय जरग यांची उपस्थिती असणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष ना.श्री.राजेश क्षीरसागर,मा. खासदार श्री. धैयशील माने,
मा. आ. श्री. विनय कोरे, आ.राहुल आवाडे,मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर श्री. अमोल येडगे,पोलिस अधीक्षक श्री .योगेशकुमार गुप्ता,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री, एस.कार्तिकेयन,मा. आयुक्त श्रीमती के. मंजूलक्ष्मी,भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. विजय जाधव,भाजपा प्रदेश सचिव श्री.महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. नाथाजी पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष पूर्व मा. श्री. राजवर्धन निंबाळकर पूर्व, आणि मा. श्री. विजय पाटील अध्यक्ष, कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन श्री.विजय पाटील,भगिरथी महिला संस्था अध्यक्षा मा. सौ. अरुंधती महाडिक आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
याचबरोबर प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना चार दिवस तज्ञ व्यक्तींकडून शेतीविषयक माहिती दिली जाणार आहे आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत ज्याद्वारे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात आहे यामध्ये प्रॉम्प्ट इक्विपमेंट प्रा. लि., कर्नाटका सोप ॲन्ड डिटर्जंट लि., डेक्कन फार्फ ईक्विपमेंट प्रा. लि, टाटा सोलर, ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट्स, लक्ष्मी पंप्स प्रा. लि., शेरखान लिमिटेड, चितळे उद्योग समूह, राजाराम बापू सहकारी दूध संघ, सावंत ऑरगॅनिक फार्म, डीजे कोकोनट फॉर्म प्रा. लिमिटेड अश्या भरपूर नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत तसेच कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांनी देखील या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कंपन्यांची उत्पादने पाहावयास व खरेदी करता येणार आहेत.
प्रदर्शनात तांदूळ महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी चोवीस, भोगावती, इंद्रायणी तसेच बाजरी, नाचणी, संद्रिय गुळ, हळद विक्रीसाठी असणार आहे.शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती,मत्स्यपालन कसे करावे याची प्रात्यक्षिके, ए आय तंत्रज्ञान याची
माहिती मिळणार आहे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती याठिकाणी दिली जाणार आहे. विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी-बियाणे पाहावयास मिळणार आहेत असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मा. सौ. अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना दरवर्षी भिमा कृषी प्रदर्शनात संधी मिळते, यामध्ये दोनशे बचत गट आपली विविध प्रकारची उत्पादने या स्टॉलद्वारे लावतात. महिलांनी बनविलेल्या उत्पादनाला भिमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून थेट बाजारपेठ मिळवून दिली जाते. शिवाय चार दिवस भागीरथी महिला संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत झुणका-भाकरी दिली जाते.
याचबरोबर कृषीविषयक आधारित २०० हून अधिक स्टॉल याठिकाणी आहेत.
प्रदर्शनामध्ये कृषी तज्ञांची व्याख्याने चार दिवस दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहेत. यात १४ फेब्रुवारी रोजी क्षारपड जमिनीची एकात्मिक सुधारणा नवी दिशा या विषयावर डॉ. संग्राम धर्माजी काळे सह प्राध्यापक, मृदा, शास्त्र ,कृषी संशोधन केंद्र, कसबा डिग्रज, जि.सांगली यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. त्याचदिवशी आंबा लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर डॉ. केशव हरी पुजारी माजी प्रमुख फलोद्यान सहयोगी अधिष्ठाता डॉ.बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे मार्गदर्शन करणार आहेत.
१५ फेब्रुवारी रोजी प्रा.ऋतुराज सयाजीराव चव्हाण तज्ञ व तांत्रिक सल्लागार हे सेंद्रिय शेतीसाठी अचूक निविष्ठांचा वापर काळाची गरज विषयावर विचार मांडणार आहेत. डॉ. श्री. सॅम लुद्रिक (पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र शासन) हे दुधाळ जनावरांची निगा व संगोपन या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत.
१६ फेब्रुवारी रोजी भाजीपाला सुधारित लागवड व परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. श्री. भरत तुकाराम पाटील भाजीपाला पैदासकर व प्रमुख फलोद्यान विभाग महात्मा फुले विद्यापीठ राहुरी, जि. अहिल्यानगर हे विचार व्यक्त करणार आहेत. तर कृषी विभागाच्या विकासात्मक योजना व वापर या विषयावर तालुका कृषी अधिकारी करवीरचे श्री. युवराज पाटील मार्गदर्शन करणार आहेत आणि तालुका कृषी अधिकारी कागलचे श्री. शेखर थोरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
भिमा कृषी प्रदर्शनामध्ये शेतीभूषण ५ पुरस्कार तर शेतीनिष्ठ शेतकरी १०, जिजामाता ५ पुरस्कार, तर युवा शेतकरी ५, आदर्श शेतकरी ५ आणि शेती तंत्रज्ञ पुरस्कार ५ दिले जाणार आहेत आणि कृषी विभागाच्या वतीने ही उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, पीक स्पर्धा, जनावरे यांच्या स्पर्धांना बक्षीसे दिली जाणार आहेत.
दररोज सायंकाळी ६ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस या ठिकाणी होणार आहेत. यात १३ फेब्रुवारी रोजी कराओके गीत गायन स्पर्धा,
१४ फेब्रुवारी रोजी राधानगरी येथील गंध महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १५ रोजी नृत्य मल्हार हा कार्यक्रम होणार आहेत. १६ फेब्रुवारी रोजी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सांगता समारंभ व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
विशेष सहकार्य असणाऱ्या वृंदावन फाउंडेशनविषयी
वृंदावन फाउंडेशनमार्फत महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न, ग्रामीण भागातील गरीब होतकरू शेतकन्यांकरीता अवजारे खरेदी करणेसाठी प्रयत्न व मदत, गरीब व होतकरू नवीन तरुण उद्योजकांसाठी व्यवसायासाठी प्रयत्न व मदत, भटक्या जनावरांसाठी अन्नदान व उपचार करीता प्रयत्न व मदत, अनाथ मुलांसाठी शिक्षणाकरिता मदत, ग्रामीण विकासासाठी प्रयत्न, सांस्कृतीक व आर्थिक विकास, स्वयंसेवी संस्थाना मदत, पर्यावरण प्रयत्न, समाजातील वंचित घटकांना उच्चाटनासाठी विविध कार्यक्रम राबवणे, आरोग्यविषयक सुवीधा पुरवणे तसेच शिबिरे आयोजीत करणे असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. वृंदावन फाउंडेशनची याच वर्षी नोंदणी झाली आहे. अशी माहिती वृंदावन फाउंडेशनच्या संचालिका सौ. गौरी सुजित चव्हाण व संचालिका जाई संजय भोसले यांच्या वतीने सुजित चव्हाण यांनी दिली.
यावर्षीच्या भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर, वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या या कृषी व पशू प्रदर्शनाचा कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
ड्रोवीच्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वामध्ये होणार चिमुकल्या स्वप्नांची रंगीबेरंगी उधळण
पहिल्या पर्वाला लहान मुलांकडून भरभरून मिळालेल्या प्रतिसादानंतर, ड्रोवी पुन्हा सज्ज आहे चिमुकल्यांच्या पसंतीस पडलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे दुसरे पर्व म्हणजेच सीझन २ घेऊन येण्यासाठी. यानिमित्ताने त्यांना आपल्या मुक्त छंद विचारातून आणि कलेच्या माध्यमातून आपली कलाकृती साकारण्याची आणि व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे.
मागील वर्षाप्रमाणे यावर्षीच्या स्पर्धेची थीम आहे “Bored? Good! Ideas Flood!”. याच थीमच्या सहाय्याने ‘ड्रोवी बॉय’ म्हणजेच, ड्रोवी या ब्रँडच्या खेळकर अशा मॅस्कॉटसोबत चिमुकल्यांना विविध रंगांच्या माध्यमांतून मनावरची मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि कंटाळवाणी दिनचर्या मजेदार बनवण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये जसे की मुंबई, पुणे, संभाजी नगर, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, नाशिक आणि सातारा इथे आयोजन केले जाणार आहे. यासोबतच मध्य प्रदेशातील इंदूर, रतलाम, खंडवा तसेच निजामाबादसारख्या इतर शहरांमध्येही याचे आयोजन करण्यात येणार आहे. या शहरांतील नामांकित बालरोगतज्ञांच्या सहयोगाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्यांचा सक्रिय पाठिंबा या स्पर्धेला असणार आहे. या आयोजनात संबंधित शहरांतील नामांकित बालरोगतज्ज्ञ सहकार्य करत असून ते पुरस्कार वितरणासाठी परीक्षक आणि प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.
ही स्पर्धा दोन वयोगटांसाठी खुली आहे – १ ते ७ वर्षे आणि ७ ते १३ वर्षे. या स्पर्धेचे विषय प्रत्येक वयोगटानुसार विचारपूर्वक ठरवलेले आहेत ते खालीलप्रमाणे.
१ ते ७ वर्षांच्या मुलांसाठीचे विषय: या वयोगटातील मुलांना सोप्या आणि आनंददायी प्रसंगांवर चित्र काढायला सांगितले जाईल, जसे की
● ड्रोवी आणि मी – आमच्या आवडत्या पाळीव प्राण्यासोबत
● ड्रोवी आणि मी – आमचे आवडते फळ खाताना
● माझ्या शाळेतील एक शिक्षक- ड्रोवी
७ ते १३ वर्षांच्या मुलांसाठीचे विषय: या वयोगटातील मुलांना कल्पक आणि सर्जनशील जगाची कल्पना करायला प्रोत्साहन दिले जाईल, जसे की
● ड्रोवी आणि मी – अवकाशात
● ड्रोवी आणि मी – आजीला मदत करताना
● ड्रोवी आणि मी – दोन सुपरहिरो रस्त्यावरील प्राण्यांना मदत करताना
विजेते तीन विभागांमधून निवडले जातील. प्रत्येक विभागात प्रत्येक वयोगटातून पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे दिली जातील.
बक्षिसांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:
विजेता: २१०० रुपये + सुवर्णपदक + प्रमाणपत्र
प्रथम उपविजेता: १५०० रुपये + रौप्यपदक + प्रमाणपत्र
द्वितीय उपविजेता: १००० रुपये + कांस्यपदक + प्रमाणपत्र
प्रत्येक स्पर्धकाला त्यांच्या प्रयत्नांबद्दल आणि सर्जनशीलतेबद्दल स्पर्धेतील सहभागाचे ई-प्रमाणपत्र दिले जाईल.
स्पर्धेची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2026 असून, निकाल 28 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर करण्यात येतील. इच्छुक स्पर्धक आपला सहभाग बालरोगतज्ज्ञांच्या दवाखान्यांमधून, रिटेल आउटलेट्समधून किंवा क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन नोंदवू शकतील.
स्पर्धक नोंदणी प्रक्रियेची माहिती मिळवण्यासाठी आणि आपला सहभाग नोंदवण्यासाठी खाली दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा किंवा व्हाट्सॲप वर 9930031582 या क्रमांकावर “Hi” असा मेसेज पाठवा.
: आई-लेकामधील हळुवार नात्याचे बंध ‘उत्तर’ 13 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी झी ५ तर्फे 13 फेब्रुवारी रोजी रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे अभिनीत ‘उत्तर’ घरोघरी पोहोचणार: आई-लेकामधील हळुवार नात्याचे बंध प्रेक्षकांच्या भेटीला
कायमच पुढे जाण्याच्या लगबगीत असलेल्या दुनियेला सातत्याने डावलल्या जाणाऱ्या प्रश्नावर विचार करायला लावणारे ‘उत्तर’. आपण कायमच ‘उद्या बघू’ म्हणून जे टाळतो त्याचे नेमके काय होते? अव्यक्त प्रेमावरील भाष्य. पुढे ढकलण्यात आलेले सत्य. क्षमाशीलतेसाठी वेळ असतो असे गृहीत धरले जाते. आपल्या शांत भावनिक प्रामाणिकपणाने चित्रपटगृहातील प्रेक्षकांच्या मनाला भिडलेला, उत्तर आता 13 फेब्रुवारी रोजी मराठी झी ५ वरील वर्ल्ड डिजिटल प्रीमिअरद्वारे देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज आहे.
मनातून अगदी खोलवर हेलावणारे आणि जिव्हाळ्याचे मानवी नाट्य, ‘उत्तर’ प्रेम, संबंध, क्षमा आणि स्वत्व या नेहमीच ‘उद्यावर’ ढकलल्या जाणाऱ्या स्थगित भावनिक मूल्यांचा शोध घेते. ही कलाकृती दैनंदिन वास्तवात रुजलेली असली तरी तिच्या प्रतिध्वनीत सार्वत्रिक असलेला हा सिनेमा त्या नाजूक क्षणांचे चित्रण करतो. वेळ आपल्या हातातून निसटून जाताना जीवन अशी उत्तरं मागते जी देण्यास आपण तयार नसतो. संवेदनशीलता, संयम आणि अस्सल भावनिक स्पष्टतेसह उत्तर सापडते. फायनल फ्रेमनंतरही बराच काळ मनात रेंगाळते. जे क्षण आपण पुढे ढकलतो आणि नात्यातील जे बंध वाट पाहतील असं आपण गृहीत धरतो; त्यावर चिंतन करण्यास आमंत्रित करते.
या कलाकृतीच्या केंद्रस्थानी प्रेम, महत्त्वाकांक्षा आणि वाढत्या मौनामुळे आकार घेतलेले एक कोमल, गुंतागुंतीचे आई-मुलाचे नाते आहे. उमा ही एक आई. जिची उबदार माया शांतपणे तिच्या कुटुंबाला एकत्र ठेवते. निनाद हा एक तरुण. घरापासून जवळजवळ नकळत दूर जात असताना जीवनात पुढे जात असताना, स्वतःचा संघर्ष बाजूला ठेवून परिस्थितीला दोष न देता भावनिक अंतर पार करण्याच्या कसरतीत दिसतो. समकालीन जीवनाच्या आणि पिढ्यांदरम्यान होणाऱ्या बदलाच्या लयबद्धतेवर आधारित, ‘उत्तर’ हे दर्शविते की नातेसंबंध अनेकदा संघर्षातून नव्हे, तर योग्य क्षणाची, योग्य शब्दांची, योग्य वेळेच्या प्रतिक्षेत कसे तुटतात!
क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित, आणि झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट निर्मित, ‘उत्तर’ मध्ये रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांच्या भूमिका अत्यंत प्रभावी आहेत. तसेच ह्रुता दुर्गुळे आणि निर्मिती सावंत यांची अदाकारी अधिकच भावनिक सखोलता जोडणारी आहे. परिस्थिती आई आणि मुलाच्या नात्याला एका वळणावर आणत असताना, प्रेम, क्षमा आणि शेवटी एकमेकांसाठी; स्वतःसाठी दाखवावे लागणारे धैर्य आत्म्याला हेलावणाऱ्या शोधात कथा उलगडतात.
या चित्रपटाबद्दलचे आपले विचार मांडताना रेणुका शहाणे म्हणाल्या, “उमाची व्यक्तिरेखा ही धैर्य, प्रेम आणि गोष्टी अखेरीस मार्गाला लागतील या अव्यक्त आशेवर आकार घेतलेले पात्र आहे. उमा साकारणे अतिशय भावूक करणारे होते. कारण तिच्या शांततेला शब्दांइतकाच आवाज होता. उत्तर आता अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल म्हणून मी आभारी आहे. जिथे मनातील भावना अगदी जवळून अनुभवल्या जाऊ शकतील”.
अभिनय बेर्डे पुढे म्हणाला, “निनाद’ हा सतत पुढे जाणाऱ्या एका पिढीचे प्रतिनिधित्व करतो. अनेकदा आपण मागे काय सोडले याचे परीक्षण करण्याइतपत वेळ निनादकडे नसतो. मी निनाद वठवताना मला महत्त्वाकांक्षा, भावनिक अंतर आणि घराचे मनातून वाटणारे आकर्षण प्रतिबिंबित करण्यास मदत झाली. ‘उत्तर’ आता झी ५ वर प्रेक्षकांच्या भेटीला येईल याचा मला आनंद आहे”.
दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी सांगितले की, “उत्तर हा नेहमीच आयुष्यासारखा वाटला. सौम्य, निराकरण न झालेला आणि सखोल मानवी. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, या उक्तीवर विश्वास ठेवून जे अमूल्य क्षण आपण पुढे ढकलतो त्या क्षणांबद्दल आहे. चित्रपटाच्या डिजिटल प्रीमिअरमुळे प्रेक्षकांना स्वत:च्या सोयीने या भावनिक गाभ्याचा वेध घेण्याची मुभा मिळते. ही कलाकृती प्रेक्षकांना आपलीशी वाटेल आणि मनात बराच काळ रेंगाळेल”.
उत्तर 13 फेब्रुवारी 2026 पासून केवळ झी ५ वर स्ट्रीम होईल
‘घूसखोर पंडत’ चित्रपटाबद्दल नीरज पांडे यांचे अधिकृत निवेदन
आमचा चित्रपट हा पूर्णपणे काल्पनिक पोलिस ड्रामा आहे. यात “पंडत” हा शब्द फक्त एका काल्पनिक पात्रासाठी वापरले गेले आहे. ही कथा एका व्यक्तीच्या कृती आणि निर्णयांवर आधारित आहे. याचा कोणत्याही जाती, धर्म किंवा समुदायाशी संबंध नाही, तसेच कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही.
एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून मी माझ्या कामाकडे मोठ्या जबाबदारीने पाहतो आणि नेहमी विचारपूर्वक आणि आदराने कथा मांडतो. हा चित्रपटही माझ्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच प्रामाणिक हेतूने आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीच तयार केला गेला आहे. चित्रपटाच्या शीर्षकामुळे काही प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, याची आम्हाला जाणीव आहे आणि आम्ही त्यांच्या भावनांचा मनापासून आदर करतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, सध्या आम्ही चित्रपटाशी संबंधित सर्व प्रचार साहित्य हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मते, हा चित्रपट पूर्ण पाहून आणि त्याची कथा समजून घेऊनच त्यावर मत द्यावे, फक्त काही भाग पाहून निष्कर्ष काढू नये. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करण्यास मी उत्सुक आहे.
https://www.instagram.com/p/DUZrQONk1Eq/?igsh=MTRvZmVmbG8yNHVwNg==
स्कोडा कायलकने एका वर्षात ५०,००० विक्रीचा विक्रमी टप्पा गाठला
जास्त व्हेरिएंट्स, अधिक पर्याय आणि अतुलनीय मूल्याद्वारे संपूर्ण श्रेणीत वैशिष्ट्ये सर्वांसाठी उपलब्ध
कायलक आता चार ते सहा व्हेरिएंट्समध्ये, एकूण ११ वेगवेगळ्या किमतींमध्ये उपलब्ध
नवीन क्लासिक प्लस व्हेरिएंट सादर; सेगमेंटमधील पूर्ण-विकसित टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक असलेली सर्वात सहज उपलब्ध कार
इलेक्ट्रिक सनरूफ, क्रूझ कंट्रोल, ऑटो IRVM, रेन-सेन्सिंग वायपर्स, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग, LED लाइट्स इत्यादी वैशिष्ट्ये स्टँडर्ड
सिग्नेचर आणि सिग्नेचर प्लस व्हेरिएंट्समध्ये आता इलेक्ट्रिक सनरूफसह अनेक अपग्रेड्स
प्रेस्टिज प्लस हा पूर्णपणे नवीन टॉप-एंड व्हेरिएंट
मर्यादित कालावधीसाठी निवडक व्हेरिएंट्सवर वर्धापनदिन ऑफर्स, सर्व्हिस पॅकेजेस आणि भेटवस्तू
कोल्हापूर, :२०२५ हे वर्ष विक्रीच्या दृष्टीने सर्वात यशस्वी ठरल्यानंतर आणि नवीन कुशाक सादर केल्यानंतर, स्कोडा ऑटो इंडिया त्यांच्या वाढत्या उत्पादन श्रेणीसह प्रगतीचा वेग कायम ठेवत आहे. कंपनीने त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कायलक मॉडेलच्या व्हेरिएंट्सची श्रेणी विस्तारत, ग्राहकांना अधिक पर्याय आणि जास्त मूल्य देण्यावर भर दिला आहे.
लाँचपासून आतापर्यंत ५०,००० हून अधिक गाड्यांची विक्री झालेली कायलक, भारतातील स्कोडा ऑटोच्या वाढीचा एक मजबूत आधारस्तंभ ठरली आहे. ब्रँडच्या भारतातील २५ व्या वर्षात, स्कोडा ऑटो इंडियाच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम विक्री कामगिरीत कायलकचे मोठे योगदान आहे.
सुरक्षा, ड्रायव्हिंग डायनॅमिक्स, आधुनिक तंत्रज्ञान आणि किफायतशीर किंमत यांचा उत्तम समतोल साधत, कायलकने सब-४ मीटर SUV सेगमेंटमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे.
‘हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’ मोहिमेद्वारे महाराष्ट्रामध्ये बनावट उत्पादनांविरोधात लढा देण्यासाठी टाटा सॉल्टची मोहीम
महाराष्ट्र: भारतातील आयोडाइज्ड मीठ विभागात 1983 पासून अग्रणी आणि बाजारातील आघाडीचा ब्रँड असलेल्या टाटा सॉल्टतर्फे ‘हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’ हा ठाम संदेश देत, बनावट मीठ पॅकविरोधात लढ्याचे नेतृत्व करण्यात येत आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असलेल्या असंघटित मीठ बाजारपेठेत आणि बनावट मीठ पॅकच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर शुद्धता व विश्वासाचे नवे मापदंड प्रस्थापित करत, ही जाहीर घोषणा टाटा सॉल्टच्या उत्कृष्ट दर्जाचे मीठ पुरवण्याच्या ठाम वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
‘हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’ या घोषणेचा उद्देश प्रत्येक केशरी रंगाचा पॅक टाटा सॉल्टचाच नसतो, याबाबत जनजागृती करण्याचा आहे. या मोहिमेद्वारे दिसायला सारख्या पण बनावट मीठ पॅकबाबत ग्राहकांचे प्रबोधन केले जाणार आहे. भेसळमुक्त, उच्च दर्जाच्या मिठाची हमी देणारा योग्य केशरी रंगाचा पॅक निवडण्याचा हा संदेश आहे. महाराष्ट्रामधील असंघटित मीठ बाजारपेठेतील आव्हानांनंतरही टाटा सॉल्ट ब्रँड हा कुटुंबांच्या आरोग्य व कल्याणासाठी विश्वासार्ह पर्याय आहे. आयोडाइज्ड, भेसळमुक्त मिठाच्या प्रत्येक पॅकद्वारे भारताच्या पोषणविषयक उद्दिष्टांमध्ये योगदान देत, त्याचे पोषणमूल्य अधोरेखित केले जाते.
टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या पॅकेज्ड फूड्स-इंडियाच्या अध्यक्ष दीपिका भान म्हणाल्या, “अलीकडील प्रयोगशाळा चाचणीत भारतभरातील 100 मिठांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये टाटा सॉल्टची शुद्धता देशातील इतर 100 मिठांपेक्षा अधिक असल्याचे सिद्ध झाले. महाराष्ट्रामधील ग्राहकांचे टाटा सॉल्ट खूप पसंतीचे आहे. मात्र, दिसायला आणि नावाने साधर्म्य असलेले बनावट ब्रँड त्यांना गोंधळात टाकतात आणि त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण करतात. ‘हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’ या मोहिमेद्वारे आम्ही ग्राहकांना आश्वस्त करू इच्छितो की, आमची प्रतिज्ञा शब्दांपुरती मर्यादित नसून, महाराष्ट्रामधील प्रत्येक घराच्या कल्याणासाठीची ती एक ठाम बांधिलकी आहे. या मोहिमेद्वारे ग्राहकांना शिक्षित करण्याचा आणि बनावट उत्पादने व मूळ टाटा सॉल्ट यातील फरक ओळखण्याचे ज्ञान देऊन त्यांना सक्षम करण्याचा आमचा उद्देश आहे.”
टाटा सॉल्ट समुदाय-केंद्रित उपक्रम आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत, पारंपरिक स्वयंपाक पद्धतींमध्ये उच्च दर्जाच्या मिठाचे महत्त्व अधोरेखित करतो व त्यामुळे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ब्रँड आपल्या मिठाच्या शुद्धतेची हमी देतो, चांगल्या जीवनशैलीला प्रोत्साहन देतो आणि प्रत्येक टप्प्यावर बनावट उत्पादनांविरोधात लढा देण्याच्या आपल्या कटिबद्धतेवर भर देतो.
बनावट मिठाविरोधातील या मोहिमेत टाटा सॉल्ट ग्राहक, समुदाय आणि सर्व संबंधित भागधारकांना’हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’ या संदेशाला पाठिंबा देण्यासाठी व अधिक आनंदी महाराष्ट्रासाठी टाटा सॉल्टची निवड करण्याकरता एकत्र येण्याचे आवाहन करतो.
फेडरल बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत – फेडरल स्किल ऍकॅडमी, कोल्हापूर ने पहिली ऍल्युमिनी मीट आयोजित केली
कोल्हापूर, भारत | 2 फेब्रुवारी 2026 – फेडरल बँकेच्या सीएसआर शाखा असलेल्या फेडरल बँक हॉरमिस मेमोरियल फाउंडेशन अंतर्गत चालवली जाणारी प्रमुख कौशल्य विकास योजना फेडरल स्किल ऍकॅडमी (एफएसए), कोल्हापूरने नागला पार्क येथील बालाजी गार्डन हॉलमध्ये आपली पहिली ऍल्युमिनी मीट (माजी विद्यार्थी मेळावा) यशस्वीरित्या आयोजित करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या कार्यक्रमात 200 पेक्षा अधिक माजी विद्यार्थी, उद्योग क्षेत्रातील नेते आणि बँकिंग व्यावसायिक एकत्र आले होते.या कार्यक्रमात एफएसएच्या पदवीधर विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला आणि रोजगारक्षमता वाढवणे आणि स्थानिक आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या संरचित कौशल्य विकासाच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मेराजखान पठाण, डीव्हीपी आणि रिजनल हेड, फेडरल बँक, कोल्हापूर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जयदीप चौगुले, चेअरमन, शिरोळी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन कोल्हापूर (एसएमएके) उपस्थित होते.
फेडरल बँकेचे उपाध्यक्ष आणि सीएसआर प्रमुख शाजी के. व्ही.म्हणाले,“ फेडरल स्किल ऍकॅडमी ही फेडरल बँक हॉरमिस मेमोरियल फाउंडेशनने अंमलबजावणी भागीदारांच्या सहकार्याने राबवलेला एक अत्यंत प्रभावशाली उपक्रम आहे. 2015 साली सुरू झालेल्या या उपक्रमाद्वारे, आम्ही 10,000 हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये दिली आहेत. कोल्हापूर येथील फेडरल स्किल ऍकॅडमी 2018 साली सुरू झाली आणि या केंद्रात आम्ही 1800 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे, ज्याचा प्लेसमेंट दर 90% आहे. ही कौशल्य ऍकॅडमी कोल्हापूर आणि आसपासच्या भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरली आहे, ज्यामुळे त्यांना करिअर घडवण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळाली आहेत.”
प्रमुख पाहुणे जयदीप चौगुले यांनी उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा आणि विविध क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी याबद्दल माहिती दिली.या बैठकीमधील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे माजी विद्यार्थ्यांसोबतचा संवाद सत्र, ज्यामध्ये माजी प्रशिक्षणार्थींनी आपला वैयक्तिक करिअरचा अनुभव सांगितला आणि एफएसएच्या व्यावहारिक, नोकरी-केंद्रित प्रशिक्षणामुळे त्यांची व्यावसायिक संधी आणि जीवनमान सुधारण्यास कशी मदत झाली, हे सांगितले.फेडरल स्किल ऍकॅडमी ही फेडरल बँकेचा एक प्रमुख उपक्रम आहे, जी एसबी ग्लोबल एज्युकेशनल रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवली जातो. ही ऍकॅडमी तरुणांना उद्योगाशी संबंधित कौशल्ये देऊन, शैक्षणिक ज्ञान आणि कामाच्या ठिकाणी लागणाऱ्या कौशल्यांमधील अंतर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करते. कोल्हापूरमध्ये, एफएसए स्थानिक उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे 13 ते 16 फेब्रुवारीला आयोजन ; खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल,
१२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय खास आकर्षण
कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे भिमा कृषी व पशु प्रदर्शन येत्या 13 ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी याही वर्षी हे भव्य कृषी प्रदर्शन मेरी वेदर मैदानावर भरविण्यात येत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. २०२६ मध्ये भरविण्यात येणाऱ्या या प्रदर्शनात खास आकर्षण कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय, अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण असणार आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी होणार आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई येणार आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी होणार आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी असणार आहेत. याचबरोबर प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना चार दिवस तज्ञ व्यक्तींकडून शेतीविषयक माहिती दिली जाणार आहे आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत ज्याद्वारे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या प्रदर्शनाविषयी अधिक माहिती देताना खासदार धनंजय महाडिक यांनी देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात आहे यामध्ये प्रॉम्प्ट इक्विपमेंट प्रा. लि., कर्नाटका सोप ॲन्ड डिटर्जंट लि., डेक्कन फार्फ ईक्विपमेंट प्रा. लि, टाटा सोलर, ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट्स, लक्ष्मी पंप्स प्रा. लि., शेरखान लिमिटेड, चितळे उद्योग समूह, राजाराम बापू सहकारी दूध संघ, सावंत ऑरगॅनिक फार्म, डीजे कोकोनट फॉर्म प्रा. लिमिटेड अश्या भरपूर नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत तसेच कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांनी देखील या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कंपन्यांची उत्पादने पाहावयास व खरेदी करता येणार आहेत. याचबरोबर या प्रदर्शनात तांदूळ महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी चोवीस, भोगावती, इंद्रायणी तसेच बाजरी, नाचणी, संद्रिय गुळ, हळद विक्रीसाठी असणार आहे.
शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती,मत्स्यपालन कसे करावे याची प्रात्यक्षिके, ए आय तंत्रज्ञान याची
माहिती मिळणार आहे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती याठिकाणी दिली जाणार आहे. विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी-बियाणे पाहावयास मिळणार आहेत असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मा. सौ. अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना दरवर्षी भिमा कृषी प्रदर्शनात संधी मिळते, यामध्ये दोनशे बचत गट आपली विविध प्रकारची उत्पादने या स्टॉलद्वारे लावतात. महिलांनी बनविलेल्या उत्पादनाला भिमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून थेट बाजारपेठ मिळवून दिली जाते. शिवाय चार दिवस भागीरथी महिला संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत झुणका-भाकरी दिली जाते.
प्रदर्शनामध्ये कृषी तज्ञांची व्याख्याने दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहेत. यात १४ फेब्रुवारी रोजी क्षारपड जमिनीची एकात्मिक सुधारणा नवी दिशा या विषयावर डॉ. संग्राम धर्माजी काळे सह प्राध्यापक, मृदा, शास्त्र ,कृषी संशोधन केंद्र, कसबा डिग्रज, जि.सांगली यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. त्याचदिवशी आंबा लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर डॉ. केशव हरी पुजारी माजी प्रमुख फलोद्यान सहयोगी अधिष्ठाता डॉ.बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे मार्गदर्शन करणार आहेत.
१५ फेब्रुवारी रोजी प्रा.ऋतुराज सयाजीराव चव्हाण तज्ञ व तांत्रिक सल्लागार हे सेंद्रिय शेतीसाठी अचूक निविष्ठांचा वापर काळाची गरज विषयावर विचार मांडणार आहेत. डॉ. श्री. सॅम लुद्रिक (पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र शासन) हे दुधाळ जनावरांची निगा व संगोपन या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत.
१६ फेब्रुवारी रोजी भाजीपाला सुधारित लागवड व परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. श्री. भरत तुकाराम पाटील भाजीपाला पैदासकर व प्रमुख फलोद्यान विभाग महात्मा फुले विद्यापीठ राहुरी, जि. अहिल्यानगर हे विचार व्यक्त करणार आहेत. तर कृषी विभागाच्या विकासात्मक योजना व वापर या विषयावर तालुका कृषी अधिकारी करवीरचे श्री. युवराज पाटील मार्गदर्शन करणार आहेत आणि तालुका कृषी अधिकारी कागलचे श्री. शेखर थोरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
भिमा कृषी प्रदर्शनामध्ये शेतीभूषण ५ पुरस्कार तर शेतीनिष्ठ शेतकरी १०, जिजामाता ५ पुरस्कार, तर युवा शेतकरी ५, आदर्श शेतकरी ५ आणि शेती तंत्रज्ञ पुरस्कार ५ दिले जाणार आहेत आणि कृषी विभागाच्या वतीने ही उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, पीक स्पर्धा, जनावरे यांच्या स्पर्धांना बक्षीसे दिली जाणार आहेत.
दररोज सायंकाळी ६ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस या ठिकाणी होणार आहेत. यात 13 फेब्रुवारी रोजी कराओके गीत गायन स्पर्धा,
१४ फेब्रुवारी रोजी राधानगरी येथील गंध महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १५ रोजी नृत्य मल्हार हा कार्यक्रम होणार आहेत. १६ फेब्रुवारी रोजी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सांगता समारंभ व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
विशेष सहकार्य असणाऱ्या वृंदावन फाउंडेशनविषयी
वृंदावन फाउंडेशनमार्फत महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न, ग्रामीण भागातील गरीब होतकरू शेतकन्यांकरीता अवजारे खरेदी करणेसाठी प्रयत्न व मदत, गरीब व होतकरू नवीन तरुण उद्योजकांसाठी व्यवसायासाठी प्रयत्न व मदत, भटक्या जनावरांसाठी अन्नदान व उपचार करीता प्रयत्न व मदत, अनाथ मुलांसाठी शिक्षणाकरिता मदत, ग्रामीण विकासासाठी प्रयत्न, सांस्कृतीक व आर्थिक विकास, स्वयंसेवी संस्थाना मदत, पर्यावरण प्रयत्न, समाजातील वंचित घटकांना उच्चाटनासाठी विविध कार्यक्रम राबवणे, आरोग्यविषयक सुवीधा पुरवणे तसेच शिबिरे आयोजीत करणे असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. वृंदावन फाउंडेशनची याच वर्षी नोंदणी झाली आहे. अशी माहिती वृंदावन फाउंडेशनच्या संचालिका सौ. गौरी सुजित चव्हाण व संचालिका जाई संजय भोसले यांच्या वतीने सुजित चव्हाण यांनी दिली.
यावर्षीच्या भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर, वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
तरी या प्रदर्शनाचा कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला डॉ. अजित शिंदे, डॉ. सुनिल काटकर, सर्जेराव धनवडे दादा, अशोक सिधनेर्ले, इंद्रजीत जाधव,जिल्हा कृषी अधीक्षक महेश मस्तोळी,जिल्हा कृषी अधीक्षक नामदेव परिट, कृषी अधिकारी युवराज पाटील,किरण रणदिवे आदी उपस्थित होते.

















